बटाटा भाजी (सात्विक भाजी) (Batata Bhaji Recipe In Marathi)

Sujata Kulkarni
Sujata Kulkarni @Sujata_Kulkarni
Thane

बटाटा भाजी (सात्विक भाजी) (Batata Bhaji Recipe In Marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

25 मिनिटे
3 सर्व्हिंग्ज
  1. 5बटाटे
  2. 1 टीस्पूनमोहरी
  3. 1 टीस्पूनजीरे
  4. 1/2 टीस्पूनहळद
  5. 1/4 टीस्पूनहिंग
  6. 4हिरव्या मिरच्या
  7. 1 टीस्पूनसाखर
  8. 1 टीस्पूनमीठ चवीप्रमाणे
  9. 1/4लिंबू
  10. 4 टेबलस्पूनतेल
  11. 8कढीपत्ता पाने

कुकिंग सूचना

25 मिनिटे
  1. 1

    सर्वप्रथम बटाटे 5 शिट्ट्या देऊन कुकरमध्ये उकडून घ्यावे. त्यानंतर बाकीचे साहित्याची तयारी करावी. बटाटे उकडून गार झाल्यावर त्याच्या छोट्या छोट्या फोडी कराव्या.

  2. 2

    आता गॅसवर कढई ठेवावी आणि त्यामध्ये तेल घालून ते गरम करून घ्यावे. आता तेलामध्ये मोहरी- जीरे ची फोडणी द्यावी. त्यानंतर कढीपत्ता मिरची घालावी. आता हिंग, हळद घालून थोडे परतावून घावे आणि लगेचच बटाट्याच्या फोडी घालाव्यात आणि चांगले परतून घ्यावे.

  3. 3

    त्यानंतर मीठ, साखर आणि लिंबू मिळून घालावे आणि थोडे परतून घ्यावे. आता आपली बटाट्याची भाजी तयार झाली त्यावर तुम्ही कोथिंबीर घालावी.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Sujata Kulkarni
Sujata Kulkarni @Sujata_Kulkarni
रोजी
Thane

Similar Recipes