"पारंपरिक पद्धतीने तांदळाची खीर" (Tandalachi kheer Recipe In Marathi)

लता धानापुने
लता धानापुने @lata22

"पारंपरिक पद्धतीने तांदळाची खीर"
#PRR

आमच्या गावाकडे पितृपक्ष पंधरवड्यात प्रत्येकाच्या तिथी प्रमाणे दररोज कोणाकडे ना कोणाकडे जेवणाच आमंत्रण सगळ्यांना दिले जाते.. पन्नास साठ माणसांचे जेवण घरच्या घरी बनवले जायचे आणि अजूनही खूप जण घरीच एवढ्या माणसांचे जेवण बनवतात.. आता काही लोक ठराविक जेवण घरी बनवून बाकीचे बाहेरून मागवतात.. भला मोठ पातेल्यात भात शिजवून त्याची खीर बनवली जाते.. ती रेसिपी मी शेअर करत आहे.. मस्त भन्नाट होते..

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

चाळीस मिनिटे
दोन तीन
  1. 1/2 कपशिजवलेला भात
  2. 3/4 लिटरदूध
  3. 1/4 कपसाखर
  4. 1 टेबलस्पूनकाजू बदाम पिस्त्याचे काप प्रत्येकी
  5. 1 टेबलस्पूनमनुका
  6. 1 टेबलस्पूनखसखस
  7. 1/2 टीस्पूनवेलचीपूड
  8. 10केशराचे तुकडे
  9. 2 टेबलस्पूनतूप

कुकिंग सूचना

चाळीस मिनिटे
  1. 1

    शिजवलेला भात एका बाऊल मध्ये काढून स्मॅशरने स्मॅश करून घ्या.. काजू बदाम पिस्त्याचे काप करून घ्या..

  2. 2

    कढईत तूप घालून त्यात काजू बदाम पिस्त्याचे काप तळून घ्या खसखस, मनुका घालून तळून घ्या..

  3. 3

    त्यात तापवलेले दूध,केशर काड्या घालून उकळी आल्यावर शिजवून स्मॅश केलेला भात घालून मिक्स करा..व दहा मिनिटे मिडियम गॅसवर शिजू द्या..

  4. 4

    साखर घालून उकळी आल्यावर वेलची पूड घालावी व पाच मिनिटे शिजू द्या.. बस खीर खाण्यासाठी तयार..

  5. 5

    सर्व्हिंग बाऊल मध्ये काढून वरून आवडीनुसार ड्रायफ्रुट्स,केशर घालून सर्व्ह करा..

  6. 6

    श्राद्ध थाळी मध्ये खीर तर हवीच...

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
लता धानापुने
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes