भेंडी ग्रेव्ही मसाला

Prajakta Patil
Prajakta Patil @cook_19647252

लेडी फिंगर म्हणून ओळख असणारी हिरवी भाजी भेंडी , भाज्यांमध्ये बर्‍याच लोकांना पसंत येते, तर त्याला नापसंत करणारे लोक देखील असतात. पण भेंडी चे खूप सारे फायदे आहेत.भेंडीची भाजी सहज उपलब्ध होत असल्याने ती सर्वत्र खाल्ली जाते. भेंडीची भाजी चिकट आणि बुळबुळीत असली तरी ती चविष्ट व पोषक असते. भेंडीचे भेंडी फ्राय, भेंडी मसाला असे वेगवेगळे प्रकार करून खाल्ले जातात. कोवळी भेंडी कच्ची खाणेही आरोग्यासाठी चांगले असते.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. 250 ग्राम भेंडी(मिडीयम तुकडे केलेले)
  2. 50 ग्रॅम तेल
  3. 1 टीस्पूनमोहरी
  4. चिमूटभरहिंग
  5. 1कांदा उभा चिरलेला
  6. 1टोमॅटो उभा चिरलेला
  7. 1 टीस्पूनहळद
  8. 2 टीस्पूनलाल तिखट
  9. 1 टीस्पूनआले लसूण पेस्ट
  10. चवीनुसारमीठ
  11. कोथिंबीर बारीक चिरलेली
  12. 2लाल मिरच्या
  13. थोडासा ओला नारळ
  14. 1 टीस्पूनचिंचेचा कोळ
  15. कडीपत्ता

कुकिंग सूचना

  1. 1

    भेंडी स्वच्छ पुसून घ्या. आडवी कापून त्याला ऊभे चिर द्या.

  2. 2

    गॅसवर एका कढईत तेल गरम करत ठेवा. तेल गरम झाल्यावर मोहरीची फोडणी द्या.हिंग घाला.

  3. 3

    आता उभा चिरलेला कांदा व मिरची घाला.कडीपत्ता घाला.

  4. 4

    कांदा हलका सोनेरी झाल्यावर टोमॅटो टाका.टोमॅटो मऊ शिजल्यावर आले लसूण पेस्ट, हळद, तिखट,मीठ मिक्स करा.

  5. 5

    आता थोडासा खवलेला ओला नारळ घाला. नारळ मसाल्यात मिक्स करून घ्या.

  6. 6

    आता ह्या मिश्रणात भेंडी घाला. भेंडी मसाल्यात चांगली एकजीव करून घ्या.भेंडी मसाल्यात मध्यम आचेवर शिजवा.

  7. 7

    आता भेंडीवर थोडासा चिंचेचा कोळ किंवा पाणी घाला. तुम्हाला ग्रेव्ही पातळ हवी की घट्ट ह्या प्रमाणावर.हवं असल्यास थोडासा गुळ घालू शकता. आंबट गोड चवी नुसार.

  8. 8

    ग्रेव्ही ला उकळी आली की मीठ घाला.झाकण ठेवून वाफ काढा.

  9. 9

    वरून छान कोथिंबीर पेरा. भातासोबत गरमागरम सर्व्ह करा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Prajakta Patil
Prajakta Patil @cook_19647252
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes