"चपाती /पोळी बनवण्यासाठी पीठ कसे भिजवावे" (Dough For Chapati Recipe In Marathi)

लता धानापुने
लता धानापुने @lata22

#मऊसूत चपाती बनवण्यासाठी पीठ कसे भिजवावे..

"चपाती /पोळी बनवण्यासाठी पीठ कसे भिजवावे" (Dough For Chapati Recipe In Marathi)

#मऊसूत चपाती बनवण्यासाठी पीठ कसे भिजवावे..

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

वीस मिनिटे
दोन
  1. दिड कप गव्हाचे पीठ
  2. 1/4 टीस्पूनमीठ
  3. 1 टीस्पूनतेल
  4. आवश्यकतेनुसार पाणी

कुकिंग सूचना

वीस मिनिटे
  1. 1

    परातीत किंवा वाटी मध्ये अर्धा कप पाणी घालून त्यात मीठ घालून मिक्स करा. आता पीठ घालून मिक्स करा व लागेल तसे पाणी घालून जास्त घट्ट नाही आणि जास्त सैल नाही असे पीठ मळून घ्या

  2. 2

    थोडे सुके पीठ घेऊन परात ला चिकटलेले ओले पीठ काढून घ्या व एक टीस्पून पाणी घालून ते सर्व एकत्र मळून घ्या

  3. 3

    एक टीस्पून तेल पीठावर घालून पीठ चांगले मळून घ्या.. एक दोन वेळा उचलून परात मध्ये आपटा.. छान मऊसूत पीठ होते..चिकट पणा येतो पीठाला.. त्यामुळे चपाती मस्त मऊसूत आणि पांढरीशुभ्र होते.. पीठ रेस्ट करण्यासाठी ठेवण्याची गरज नाही.. लगेचच चपाती बनवायला घेऊ शकता

  4. 4

    तवा तापत ठेवा आणि पोळी पाटावर चपाती लाटून घ्या. तव्यावर चपाती घाला लगेच, चपाती फुगून वर येते.. गॅस मिडीयम ठेवा..

  5. 5

    लगेच पलटी करून घ्या. मस्त दुसऱ्या बाजूने सुद्धा टम्म फुगून वर येते.. दोन्ही बाजूंनी छान भाजून घ्या तेल, तूप लावून घ्या.

  6. 6

    अशाप्रकारे सर्व चपाती बनवून घ्या.. सर्व छान लुसलुशीत होतात.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
लता धानापुने
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes