भेंडी मसाला (bhendi masala recipe in marathi)

Rajashri Deodhar
Rajashri Deodhar @RBD12072012

#rr
रेस्टॉरंट स्टाईल भेंडी मसाला चवीला एकदम मस्त आणि लवकर तयार होणारी भाजी...

भेंडी मसाला (bhendi masala recipe in marathi)

#rr
रेस्टॉरंट स्टाईल भेंडी मसाला चवीला एकदम मस्त आणि लवकर तयार होणारी भाजी...

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

1/2 तास
2-3 सर्व्हिंग्ज
  1. 250 ग्रॅमभेंडी
  2. 4 टेबलस्पूनतेल
  3. 1 कपचिरलेला कांदा
  4. 2 टीस्पूनचिरलेला आलं
  5. 2 टीस्पूनचिरलेला लसूण
  6. 1हिरवी मिरची
  7. 2-3टोमॅटो
  8. चवीनुसारमीठ
  9. 1 टीस्पूनतिखट
  10. 1 टीस्पूनधने पावडर
  11. 1 टीस्पूनजीरे पावडर
  12. 1/4 टीस्पूनहळद
  13. 1तमालपत्र
  14. 2लवंग
  15. 1दालचिनीचा तुकडा
  16. 1/2 कपदही
  17. 1 टीस्पूनसाखर
  18. चिरलेली कोथिंबीर
  19. 1 टेबलस्पूनकसुरी मेथी

कुकिंग सूचना

1/2 तास
  1. 1

    भेंडी स्वच्छ धुवून पुसून घ्यावी देठं काढून 1 इंचाचे तुकडे करून घ्यावे पॅनमध्ये 2 टेबलस्पून तेल गरम करून त्यावर भेंडी लाईट गोल्डन ब्राऊन कलर पर्यंत परतून घ्यावी मीठ घालून मिक्स करावे आणि बाजूला काढून ठेवावी. कांदा लसूण आलं मिरची बारीक चिरून घ्यावे टोमॅटो मिक्सरमध्ये बारीक वाटून प्युरी करून घ्यावी.खडा मसाला काढून ठेवावा.

  2. 2

    पॅनमध्ये 2 टेबलस्पून तेल घालून त्यावर खडा मसाला घालावा त्यानंतर कांदा घालून 2 मिनिटे परतून घ्यावे. आल लसुण मिरची घालून परतून घ्यावे. टोमॅटो प्युरी घालून मिक्स करावे.

  3. 3

    मसाला परतून त्यावर तिखट हळद धने-जीरे पावडर घालून एकत्र करावे.दही फेटुन घ्यावे आणि पॅनमध्ये घालावे.मसाल्याचे तेल सुटेपर्यंत परतावे.1 कप पाणी घालून मिक्स करावे.

  4. 4

    उकळी आली की बाजूला काढून ठेवलेली भेंडी गरम मसाला साखर कोथिंबीर घालून मिक्स करावे 10 मिनिटे झाकण ठेवून शिजवावे.कसुरी मेथी घालून मिक्स करावे आणि गॅस बंद करावा.

  5. 5

    चिरलेली कोथिंबीर घालून भाजी पोळी भाताबरोबर सर्व्ह करावी.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Rajashri Deodhar
Rajashri Deodhar @RBD12072012
रोजी
I Love cooking.. 😋
पुढे वाचा

Similar Recipes