फोडणीचे वरण (phondniche varan recipe in marathi)

Pooja Katake Vyas
Pooja Katake Vyas @pooja_cookbook
Mumbai

#dr
वरण आपल्या जेवणातील अविभाज्य घटक आहे, ज्याच्या शिवाय आपले जेवण पूर्णच होत नाही,प्रथिने व अनेक पोषक घटक असलेली डाळ आपल्या जेवणात असायलाच हवी.म्हणून या थीम मध्ये मी रोज घरी बनवले जाणारे फोडणीचे वरण बनवले आहे,तर मग बघुयात कसे करायचे हे वरण

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30 मिनिटे
4 सर्व्हिंग्ज
  1. 1/2 वाटीमूग डाळ
  2. 1/2 वाटीतूर डाळ
  3. 2हिरव्या मिरच्या
  4. 5-6 कडीपत्ता पाने
  5. 2 चमचेकोथिंबीर
  6. 1/2 टीस्पूनहळद
  7. मीठ चवीनुसार
  8. 1/2 चमचासाखर
  9. फोडणीसाठी तेल,हिंग,जीरे ,मोहरी
  10. पाणी आवश्यकतेनुसार

कुकिंग सूचना

30 मिनिटे
  1. 1

    प्रथम दोन्ही डाळी निवडून धुवून घ्या,मग कुकर मध्ये डाळीच्या डबल पाणी,हळद,1/2 चमचा तेल घालून डाळ शिजवायला ठेवा 3 शिट्या करून घ्या

  2. 2

    शिट्या झालेवर कुकर बंद करून कुकर थंड झालेवर डाळ रवीच्या साहाय्याने घोटून घ्या,मग एक कढई गॅसवर ठेवून तेल,हिंग,जीरे,मोहरी, कडीपत्ता, मिरची घालून फोडणी करून घ्या व ती फोडणी वरण मध्ये ओता,मीठ व साखर घाला मग सगळं एकसारखं ढवळून घ्या व एक उकळी काढा झाले मग तयार फोडणीचे वरण

  3. 3

    वरण वरून कोथिंबीर घालून गरमागरम सर्व्ह करा,चपाती-भाकरी-भात सोबत हे वरण खूप छान लागते

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Pooja Katake Vyas
Pooja Katake Vyas @pooja_cookbook
रोजी
Mumbai

टिप्पण्या

Similar Recipes