फराळी कचोरी आप्पे (farali kachori recipe in marathi)

Sudha Kunkalienkar
Sudha Kunkalienkar @cook_19609542

#रेसिपीबुक #week11

उपासाच्या दिवशी फराळी कचोरी खायला मिळाली तर उपास छान साजरा होतो. काही उपाहारगृहात याला फराळी पॅटिस असंही म्हणतात.  पण तळलेली कचोरी खाणं नकोसं वाटतं. म्हणून मी ही कचोरी आप्पे पॅन मध्ये करते. अगदी कमी तेल/तूप लागतं आणि चवही छान येते. आवरणासाठी बटाटे कुस्करून त्यात साबुदाण्याचं पीठ घालते (तुम्ही उपासाची भाजणी किंवा वरी, राजगिरा पीठ घालू शकता). सारण खरवडलेला नारळ, कोथिंबीर, हिरवी मिरची, आमचूर, मीठ, साखर घालून करते. गरमगरम कचोरी नारळाच्या चटणी सोबत अगदी चविष्ट लागते. आणि तळलेली नसल्यामुळे अगदी चिंता न करता खाता येते.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

60 मिनिटे
4 सर्व्हिंग्ज
  1. १४-१५बटाटे मध्यम
  2. ४-५ टेबलस्पूनसाबुदाणा पीठ (बटाट्याच्या चिकटपणानुसार कमी /जास्त लागेल)
  3. 2 कपखवलेला नारळ
  4. 3 टेबलस्पूनचिरलेली कोथिंबीर
  5. 1 टीस्पूनमिरची ठेचून
  6. 1/2 टीस्पूनआमचूर
  7. 1 टीस्पूनसाखर
  8. चवीनुसार मीठ
  9. गरजेनुसार तेल / तूप आप्पे पॅन मध्ये घालायला

कुकिंग सूचना

60 मिनिटे
  1. 1

    बटाटे धुवून उकडून घ्या.

  2. 2

    गार झाल्यावर बटाटे सोलून किसून घ्या.

  3. 3

    थोडं थोडं साबुदाणा पीठ घालून मध्यम सैल पीठ भिजवून घ्या. लागल्यास थोडे तेल/तूप घाला.

  4. 4

    सारणासाठी एका वाडग्यात नारळ, कोथिंबीर, साखर, मिरची, आमचूर, मीठ एकत्र करा. सारण तयार झाले.

  5. 5

    पिठाचे लिंबाच्या आकाराचे गोळे करून त्यात चमचाभर सारण भरून गोळा नीट बंद करा.तुमच्या आप्पे पॅन च्या आकारानुसार कचोरी बनवा. 

  6. 6

    आप्पे पॅन गरम करून प्रत्येक खाचेत २ थेम्ब तेल / तूप घाला. प्रत्येक खाचेत एक एक कचोरी ठेवून वरून २ थेम्ब तेल / तूप घाला.

  7. 7

    झाकण ठेवून मध्यम आचेवर २-३ मिनिटं भाजा. आता कचोरी परतून दुसरी बाजूही छान सोनेरी रंगावर भाजून घ्या.

  8. 8

    गरम गरम कचोरी नारळाच्या चटणी सोबत खायला द्या.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Sudha Kunkalienkar
Sudha Kunkalienkar @cook_19609542
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes