शिल्लक खिचडीचे व्हेज कटलेट (veg cutlet recipe in marathi)

Varsha Ingole Bele
Varsha Ingole Bele @varsha_1966
Nagpur

#कटलेट #सप्टेंबर आज फ्रीजमध्ये शिल्लक असलेली खिचडी दिसली. विचार केला, आज कटलेटची रेसिपी शेअर करायचा शेवटचा दिवस आहे. तर या खिचडीचेच कटलेट बनवू या. नाहीतरी आपण कशाचेही कटलेट बनवू शकतो .

शिल्लक खिचडीचे व्हेज कटलेट (veg cutlet recipe in marathi)

#कटलेट #सप्टेंबर आज फ्रीजमध्ये शिल्लक असलेली खिचडी दिसली. विचार केला, आज कटलेटची रेसिपी शेअर करायचा शेवटचा दिवस आहे. तर या खिचडीचेच कटलेट बनवू या. नाहीतरी आपण कशाचेही कटलेट बनवू शकतो .

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

20-30 मिनीटे
2 सर्व्हिंग्ज
  1. 2-3 मेझरींग कप खिचडी तुरीची डाळ व तांदूळाची
  2. 1मध्यम आकाराचा बटाटा उकडून व मऊ करुन
  3. 2-3 मेझरींग कप ब्रेडचा चुरा
  4. 2-3हिरव्या मिरच्या बारीक चिरुन
  5. 2 टेबलस्पूनभिजलेली मुगाची डाळ
  6. 2 टेबलस्पूनगाजराचा कीस
  7. 2 टेबलस्पूनबारीक चिरलेला पालक
  8. 1 टेबलस्पूनकोथिंबीर बारीक चिरुन
  9. 1 टीस्पूनजिरे
  10. चवीनुसार मीठ
  11. तळणासाठी तेल

कुकिंग सूचना

20-30 मिनीटे
  1. 1

    प्रथम सर्व सामग्री एका ठिकाणी ठेवावी. म्हणजे वेळेवर शोधाशोध करावी लागत नाही. खिचडी आधी मिक्सरपाॕटमध्ये बारीक करुन घ्यावी.

  2. 2

    बारीक झालेली खिचडी एका भांड्यात काढून घेऊन त्यात हिरवी मिरची, बटाटा, पालक, गाजर, कोथिंबीर, मुगडाळ, 4 टेबलस्पून ब्रेडचा चुरा व चवीनुसार मीठ टाकून चांगले एकञ करुन घ्यावे.

  3. 3

    आता या तयार सारणाचे हातावर गोळा घेऊन, हाताने दाबून चपटया आकाराचे कटलेट तयार करुन घ्यावेत. एका प्लेटमध्ये ब्रेडचा चुरा घेऊन त्यात एक एक कटलेट चांगला घोळवून घ्यावा. अशाप्रकारे सर्व कटलेट तळणासाठी तयार करुन घ्यावे.

  4. 4

    गॅस सुरु करुन कढईत तेल तापवायला ठेवावे. तेल तापले की त्यात मध्यम आचेवर कटलेट खरपूस तळून घ्यावेत.

  5. 5

    अशाप्रकारे घरात उपलब्ध असलेल्या पदार्थांचा वापर करुन खुसखुशीत, पौष्टिक कटलेट तयार झालेत. आता हे कटलेट नुसतेच खाऊ शकता किंवा टोमॅटो गॅस सोबतही सर्व्ह करु शकता.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Varsha Ingole Bele
Varsha Ingole Bele @varsha_1966
रोजी
Nagpur

Similar Recipes