चायनीज पोटली (chinese potali recipe in marathi)

Shweta Amle
Shweta Amle @cook_22142786
रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

पंचवीस मिनिटे
6 पोटली
  1. पोटली तयार करण्यासाठी
  2. 200 ग्रॅममैदा
  3. 1 टीस्पूनमीठ
  4. 50 मिली तेल
  5. स्टफिंगसाठी
  6. 2 कपउकळलेले नूडल्स
  7. 1/2 कपबारीक चिरलेला कांदा
  8. 1/2 कपबारीक चिरलेले गाजर
  9. 1/2 कपबारीक चिरलेली शिमला मिरची
  10. 1/2 कपबारीक चिरलेली पत्ताकोबी
  11. 1/2 कपबारीक चिरलेल्या फरसबीच्या शेंगा
  12. 1चतुर्थांश कप टोमॅटो केचप
  13. 1 टेबलस्पूनविनेगर
  14. 1 टेबलस्पूनरेड चिली सॉस
  15. 1 टेबलस्पूनसोया सॉस
  16. 1 टेबलस्पूनतेल
  17. 1 टीस्पूनमीरे पावडर
  18. 1 टीस्पूनमीठ

कुकिंग सूचना

पंचवीस मिनिटे
  1. 1

    सर्वप्रथम मैद्यामध्ये मीठ व तेल टाकून मैदा छान मळून घ्यावा जेणेकरून मूठ बांधल्यावर त्याचा असा गोळा तयार होईल. मग थोडं थोडं पाणी टाकून मैदा छान मळून त्याचा गोळा तयार करून घ्यावा व त्याला झाकून ठेवावे.

  2. 2

    आता एका भांड्यामध्ये पाणी तेल व मीठ टाकून नूडल्स तीन-चार मिनिटे उकडून घ्यावेत.

  3. 3

    मग नूडल्सला चाळणीमध्ये टाकून पाणी काढून निथळून घ्यावे व त्यावर परत थंड पाणी टाकून घ्यावे म्हणजे नूडल्स मोकळे होतील. आता सर्व भाज्या बारीक बारीक चिरून घ्याव्यात.

  4. 4

    आता एका पॅन मध्ये तेल टाकून त्यामध्ये सर्व भाज्या क्रमाक्रमाने टाकाव्यात. नंतर मीठ, चिली फ्लेक्स,मिरे पावडर टाकून झाकण ठेवून दोन-तीन मिनिटं भाज्या शिजू द्याव्यात. भाज्या पूर्ण शिजू देऊ नये.भाज्यांमध्ये क्रंचीपणा असायला पाहिजे. भाज्या शिजून झाल्या की त्यामध्ये नूडल्स टाकावेत.

  5. 5

    नूडल्स टाकले की त्यामध्ये चिली सॉस, सोया सॉस टोमॅटो सॉस व थोडसं मीठ टाकून मिक्स करून घ्यावे. आता आपलं स्टफिंग रेडी आहे.नुडल्स चे छोटे छोटे तुकडे करून घ्यावेत.नूडल्स करतानाही तुम्ही नूडल्स चे छोटे छोटे तुकडे करून स्टफिंग तयार करू शकता.

  6. 6

    आता आपण तयार केलेल्या मैद्याच्या गोळ्याच्या लिंबाएवढ्या लाट्या करून घ्याव्यात. आता त्या गोळ्याची पातळसर पारी लाटून घ्यावी. त्यामध्ये नूडल्स स्टफिंग भराव.

  7. 7

    आता या पारीची फोटोत दाखवल्याप्रमाणे पोटली तयार करून घ्यावी. अशाच प्रकारे सर्व पोटल्या तयार करून घ्याव्यात.

  8. 8

    आता एका कढईमध्ये तेल गरम करायला ठेवावे. तेल गरम झाले की पोटलीला तेलामध्ये तळून घ्यावे. खालचा भाग तळून झाला की, पलटवून वरचा भाग पण तळून घ्यावा. अशाप्रकारे सगळ्या पोटल्या तळून घ्याव्यात.

  9. 9

    आता पोटलीला डेकोरेशन साठी म्हणून कांद्याच्या पातीला तेलामध्ये डुबून पोटली ला बांधून घ्यावे. तेलात डुबवल्याने कांद्याची पात नरम होते.आता आपली चायनीज पोटली खाण्यासाठी रेडी आहे. तुम्ही हिला टोमॅटो सॉस किंवा हिरवी चटणी, शेजवान चटणीसोबत पण खाऊन आनंद घेऊ शकता. तर नक्की करून बघा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Shweta Amle
Shweta Amle @cook_22142786
रोजी

Similar Recipes