चिकन ग्रेव्ही मसाला (chicken gravy masala recipe in marathi)

Dilip Bele
Dilip Bele @dilip_0104

आज चिकन ग्रेव्ही मसाला खाण्याची ईच्छा झाली.चला तर मग बनवू या.

चिकन ग्रेव्ही मसाला (chicken gravy masala recipe in marathi)

आज चिकन ग्रेव्ही मसाला खाण्याची ईच्छा झाली.चला तर मग बनवू या.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

1 तास
2 सर्व्हिंग्ज
  1. 500 ग्रॅमचिकन
  2. 2 टेबलस्पूनदही
  3. 1/2 टीस्पूनहळद
  4. 1 टीस्पूनलाल तिखट
  5. 1 टीस्पूनधने पावडर
  6. 1 टीस्पूनशाही चिकन ग्रेव्ही मसाला
  7. 4 टेबलस्पूनतेल
  8. 1-2 तुकडेतेजपान
  9. चवीनुसारमीठ
  10. आवश्यकतेनुसार पाणी
  11. 4-5पालकची पाने
  12. 2-3 कोथिंबीर काड्या
  13. 7-8सोललेल्या लसूण पाकळ्या
  14. 1 1/2दिड इंच अद्रक
  15. 2-3 लहानफोडी केलेले कांदे
  16. 1टोमॅटो फोडी केलेले
  17. 1 टीस्पूनजीरे
  18. 1/2 टीस्पूनजीरे पावडर
  19. 1/2काश्मिरी लाल तिखट
  20. कस्तुरी मेथी
  21. चाट मसाला
  22. 1 टीस्पूनमोहरी

कुकिंग सूचना

1 तास
  1. 1

    चिकन स्वच्छ धुऊन घेतले.मॕरीनेट करण्यासाठी हळद व तिखट टाकले.

  2. 2

    धने पावडर शाही मसाला व दही टाकले.

  3. 3

    1 टेबलस्पून तेल टाकले व चांगले मिक्स करून घेतले.30-40 मिनीट झाकण ठेवले.मिक्सर पाॕट मध्ये लसूण अद्रक पालक जीरे कोथिंबीर कांद्याच्या व टोमॅटोच्या फोडी टाकून चोपडे होईल असे फिरवून घेतले.

  4. 4

    गॕसवर कढई ठेवून त्यात तेल ओतले व गॕस सुरू केला.तेल गरम झाल्यावर मोहरी व बारीक चिरलेला कांदा टाकला.नंतर मिक्सर मधील मिश्रण कढईत टाकले.

  5. 5

    कस्तुरी मेथी चाट मसाला जीरे पावडर काश्मिरी तिखट व मीठ घेतले.पेस्ट तेलात जवळजवळ 10 मि. होऊ दिल्यावर गॕस कमी करून कढईत जीरे पावडर चाट मसाला काश्मिरी तिखट हे सर्व 1/2 टिस्पून टाकले व 2 टेबलस्पून कस्तुरी मेथी टाकली.चवीनुसार मीठ टाकले व चांगले मिक्स करून 3-4 मि. झाकण ठेऊन मध्यम गॕसवर होवू दिले.

  6. 6

    कढईत मॕरीनेट झालेले चिकन टाकले.चमच्याने चांगल्याप्रकारे मसाल्यात मिक्स करून घेतले व झाकण ठेऊन 10 मि. होऊ दिले.

  7. 7

    झाकण काढल्यावर पाणी टाकले व मिक्स करून झाकण ठेऊन 25-30 मि. शिजू दिले.गॕस बंद केला. जेवणासाठी सर्व्ह करायला चिकन तयार झाले.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Dilip Bele
Dilip Bele @dilip_0104
रोजी

Similar Recipes