सुरती उंधियो (undhiyo recipe in marathi)

सुरती उंधियो (undhiyo recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
उंधियु साठी लागणार्या सर्व भाज्या एकत्र एके ठिकाणी जमा करून घ्या. नंतर स्वच्छ धुऊन घ्या आणि कोरड्या करून सर्व भाज्या निवडून ठेवा,एकीकडे लसूण पात आलं मिरची कोथिंबीर यांची पेस्ट करून ठेवा. थोडी पात वेगळी काढून ठेवा. आपल्याला भाजीत घालायची आहे. ओलं खोबरं कोथिंबीर आलं लसूण मिरची,साखर, लिंबूरस आणि तीळ यांची देखील मिक्सर मधून बारीक पेस्ट करून ठेवा.या पेस्टमध्ये धणे जीरे पूड,गरम मसाला, तिखट,मीठ घालून व्यवस्थित एकजीव करा..हा झाला आपला भाज्यांना मॅरिनेट करायचा मसाला..
- 2
पापडी सुरती पापडी वालाच्या शेंगा मटार पावटा हरभरे यांना थोडे तेल आणि खायचा सोडा लावून ठेवावे. पंधरा ते वीस मिनिटांनी या सर्व भाज्या कुकरमध्ये शिटी न लावता बारीक गॅसवर दहा ते बारा मिनिटे उकडून घ्याव्यात आणि नंतर या भाज्यांना थोडा मसाला लावून ठेवावा.
- 3
बटाटे सुरण रताळी कोनफळ त्यांची साले काढून मोठ्या फोडी करून घ्याव्यात आणि तळून घ्यावेत आणि थोडा मसाला लावून मॅरिनेट करून ठेवा.वांगी मध्ये चीर देऊन चिरून ठेवावी त्यात मसाला, बारीक चिरलेली लसूणपात भरून ठेवा थोड्या तेलावर शिजवून ठेवा..केळी मध्यम आकाराची चिरावीत.. तेलामध्ये थोडी तळून घ्या..
- 4
आता एका पातेल्यातकिंवा प्रेशर पॅनमध्ये भाज्या तळलेले तेल घ्या. त्यात ओवा आले लसूण पेस्ट हळद घालून खमंग फोडणी करून घ्या. आता प्रथम फोडणीवर उकडलेल्या पापडी शेंगा सर्व दाणे घालावेत थोडे परतावे यावर ओला मसाला मीठ घालून एक ते दोन वाफा काढाव्यात.
- 5
नंतर यावर बटाटे सुरण कोनफळ रताळी या मसाला लावलेल्या भाज्यांचा दुसरा थर घालावा आणि थोडं परतून त्यावर मसाल्याचे वाटण मीठ व पाणी घालावे आणि भाजीला एक दोन वाफा आणाव्यात वरून तळलेल्या केळ्याच्या फोडी घालाव्यात त्यावर मसाला घालावा पुन्हा एक दोन वाफा काढाव्यात आणि भाजी व्यवस्थित मिक्स करून घ्यावी.
- 6
आता सर्वात शेवटी भरलेली वांगी घालावी आणि उरलेले मसाल्याचे वाटण मीठ, पाणी घालून भाजी व्यवस्थित मिक्स करा आणि मीठाचा अंदाज घेऊन गरज असल्यास पुन्हा मीठ घाला आणि भाजी व्यवस्थित तळापासून ढवळा. वरून तळलेले मेथीचे मुठिया घाला..8-10मुठिया कुस्करुन घाला. चिरलेली कोथिंबीर घाला..आणि झाकण ठेवून 15 ते 20 मिनिटे मंद आचेवर सुरती उंधियु शिजण्यास ठेवावा.भाज्या शिजताना भाज्या,मसाले, मुठिया यांचा हळूहळू घरभर सुगंध असा पसरत जातो की बास..भूक चाळवली गेलीच पाहिजे..
- 7
तयार झाला आपला खमंग, चमचमीत, स्वादिष्ट सुगंधाचा,चवीचा सुरती उंधियु..
- 8
असा हा गरमागरम सूरती उंधियु गरमागरम फुलका,पोळी,तीळ चटणी,गाजर हलवा बरोबर सर्व्ह करा..किंवा नुसताच खाऊन या स्वर्गीय चवीचा मनमुराद डोळे मिटून आस्वाद घेत रहा..
- 9
- 10
Similar Recipes
-
सुरती उंधियो (undhiyo recipe in marathi)
#EB9 #W9उंधियो आणि थंडी यांचही अतूट नातं आहे बरं का!उंधियु ही गुजरातची खास भाजी.गुजराती शब्द उंधु म्हणजे वरची बाजू खाली....कारण पारंपारिक गुजराती उंधियु हा जमिनिखाली खड्डा करुन मातीच्या मडक्यात (माटलु-गुजराती शब्द)वरची बाजू खाली करुन वरुन खालून धग लावून खूप वेळ शिजवून केलेला असतो.आपण करताना मोठी कढई किंवा प्रेशरकुकरही वापरु शकतो.आपल्याकडे संक्रांतीच्या भोगीला लेकुरवाळी भाजी करतो तशीच ही सुद्धा एक मिक्स व्हेजच म्हणा ना!खरंतर सगळ्यांचाच हा खूप आवडता पदार्थ.गेली अनेक वर्ष आमच्याकडे थंडीत उंधियो ठरलेलाच आहे.आणि करतेही खूप प्रमाणात.मी करायला तयार आणि खवैय्ये खायला तयार😋😋अथक तयारी करुन सगळ्या रंगीबेरंगी भाज्या ओट्यावर जमवल्या की एक फेज पार पडले...☘️🌱🍆🥔🥥 अप्रतिम काॅंबिनेशन पाहून नेत्रसुखद आनंद मिळतो तो कॅमेरा बंद करायलाच हवा😃बाकी पुढेही क्लिष्ट काम म्हणजे भाज्या तळणे,मसाले करणे,भरणे,मुठीया करणे म्हणजे खमंग वासांनीच रसना तृप्ती!😃जेव्हा पातेल्यात/कुकरमधे शेवटी या भाज्यांचे थर उतरतात तेव्हा कार्यसमाप्तीची जाणिव होऊ लागते आणि भरपूर ओवा आणि मसाल्यांचा दरवळ सुटू लागला की हुश्श करत जरा डायनिंग टेबलाच्या खुर्चीवर टेकायचे!!🤣 आपल्या भोगीच्या भाजीचे जसे संक्रांतीला महत्त्व तसे गुजरातेत उंधियुचे!आणि चव वर्षभर जीभेवर रेंगाळणारी....करायला खूपच किचकट आणि वेळखाऊ,चिराचिरी,सोलणे,निवडणे,धुणे यासाठी १-२दिवस पूर्वतयारी आवश्यक!....इतका त्रास असतानाही तो करण्याची मजा औरच....माझा सर्वात आवडता पदार्थ!!पण एकदा केला की २-३दिवस सहज खाता येतो...अर्थात फ्रीजमधे ठेवून..लागेल तसा गरम करुनच...थंडीत तर गरमागरम उंधियोचा स्वाद तर घ्यायलाच हवा! Sushama Y. Kulkarni -
उंधियो (Undhiyo recipe in marathi)
थंडी च्या दिवसात बाजारात खुप साऱ्या रंगीबेरंगी भाज्या मिळतात.. या काही भाज्या मिळून केलेली मिक्स भाजी म्हणजेच उंधियोगुजराथ मधील स्पेशल डिश...मी हा कुकरमधे झटपट उंधियो केला आहे#EB9 #W9 Sushama Potdar -
-
-
-
उंधियो (Undhiyo recipe in marathi)
#EB9 #W9मोस्ट fav आहे,संक्रांतीचा वाट बघून भाज्या मिळाल्या की 4ते 5वेळा होताच,माझ्या मुलाला खूप आवडते Charusheela Prabhu -
-
उंधियु (Undhiyu Recipe In Marathi)
#BWR1थंडी म्हटलं की फक्त उंधीयो ही सर्व भाज्यांचा समावेश असलेली रेसिपी डोळ्यासमोर येते. एका थंडीच्या सिझनमध्ये सुगरण गृहिणी किमान चार वेळा तरी उंधीयो करतच असेल, इतकी ती चविष्ट आणि घरातील सर्व मेंबरना आवडणारी अशी रेसिपी आहे. हा एक गोष्ट खरी, उंधियो बनवताना खूप कष्ट आहे, वेळ लागतो, पण म्हणतात ना सबुरी असेल तर त्याचा फळ नक्कीच गोड असतं. त्याप्रमाणेच उंधियो ही भाजी अतिशय चविष्ट लागते. त्यामुळे या थंडीला बाय-बाय करताना उंधियो ही रेसिपी मी केली. Anushri Pai -
-
उंधियो (undhiyu recipe in marathi)
#EB9 #W9गुजरात मधील पारंपरिक असा हा पदार्थ.यात अनेक प्रकारच्या भाज्या एकत्र घालून ही भाजी तयार होते.:-) Anjita Mahajan -
उंधियु (undhiyu recipe in marathi)
#EB9 #W9हिवाळ्याला सुरुवात झाली की प्रसिद्ध गुजराती उंधियु च्या भाज्या मार्केटमध्ये दिसायला लागतात. दरवर्षी या सीझनमध्ये किमान दोन वेळा तरी उंधियु केला जातो. उंधियो करण्याच्या अनेक पद्धती आहेत मी झटपट होणारी कुकर मधली उंधियोची रेसिपी आज दाखवणार आहे. या रेसिपीला वेळही कमी लागतो आणि तेलाचे प्रमाणही यांमध्ये कमी असते. नोकरी करणाऱ्या स्त्रियांसाठी ही रेसिपी खूपच सोपी पडेल असे मला वाटते.Pradnya Purandare
-
-
भोगीची भाजी (bhogichi bhaji recipe in marathi)
#EB9 #W9: ई बुक चेलेंज करिता मी भोगीची भाजी बनवली.हिवाळ्यात अशी पौष्टिक भाजी शक्ती वर्धक आहे. Varsha S M -
उंधियो (Undhiyo recipe in marathi)
#EB9 #W9उंदियो हा हा गुजराती पदार्थ असून भोगीच्या भाजी प्रमाणेच हा बनवला जातो मात्र यामध्ये वैशिष्ट्य म्हणजे यात मेथी किंवा कोणतेही भाजी चे मुटके बनवा ऊन घातले जातात चला तर मग आज आपण बनवण्यात पण देऊ उंधियु बनवण्यासाठी पूर्वतयारी खूप महत्त्वाचे आहे कारण याला बरेच साहित्य लागत Supriya Devkar -
-
उंधियो (Undhiyo recipe in marathi)
#EB9#week9#खर तर ही गुजराथी फेमस रेसिपी पण एकदा म्हणजे यु.ट्युब नव्हते तेव्हा अशीच डोक लढवून केला उंधियो नि घरातले नि बाहेरची ही मंडळी (ऑफिस मधील नि मैत्रीणी )एकदम माझ्या उंधियो च्या प्रेमातच पडली.मग काय दरवर्षी दोनदा तिनदा तरी करतेच .मी मोठ्या प्रमाणात करते पण तुम्हाला त्यातल्या त्यात लहान प्रमाणात देण्याचा प्रयत्न केला आहे गोड मानून घ्या.खुपच छान होतो . Hema Wane -
-
उंधियो (Undhiyu Recipe In Marathi)
#कुकस्नॅप चॅलेंज#कढई रेसिपीभाग्यश्री लेले ताईंच्या रेसिपी वरून कुकस्नॅप केली. ताई प्रथमच उंधियो बनवला पण खुप छान झाला. धन्यवाद. Sumedha Joshi -
-
सर्वश्रेष्ठ स्वादिष्ट उंधियो (undhiyo recipe in marathi)
#KDही रेसिपी मी माझे शेजारी राहणारी गुजराती आंटीकडे पहिली वेळा टेस्ट केली होती ,लगेच त्यांना रेसिपी पूर्ण विचारून मोकळी झाली , आणि त्यांचा घरी संक्रांतीला उंधियो पहिली वेळा टेस्ट केली होती आणि त्या उभ्या उभ्या मला याची रेसिपी सांगितल्या आणि मी प्रयत्न केले .😌 घरी मुलांना आणि सगळ्यांना ही रेसिपी फार फार आवडती😋😋😋😋 झाली त्यानंतर प्रत्येक संक्रांतल ही हमखास बनवते 😊. चला मग आता तुम्ही पूर्ण प्रयत्न करा आणि मला तुमचा अनुभव नक्की सांगा !!!!!! Asha Bithane -
-
सुरती उंधियो (surti undhiyo recipe in marathi)
#मकरमेहनतीचं पण रुचकर अशी ही मिक्स भाजी गुजराती पद्धतीने केलेली सर्व भाज्यानी परिपूर्ण अशी ही भाजी एकदम टेस्टी व पौष्टीक असते सर्व रुचिनी भरपूर अशी हे सुरती उंधियो तुम्हाला आवडेल ,तुम्हीही नक्कीच try करा Charusheela Prabhu -
उंधियो (Undhiyu Recipe In Marathi)
थंडीमध्ये बाजारात मिळणाऱ्या सर्व भाज्या उंधियो या रेसिपी मध्ये अतिशय स्वादिष्ट स्वरूपात समोर येतात. उंधियो ही रेसिपी थंडीच्या दिवसातच छान बनवता येते कारण काही भाज्या फक्त थंडीतच मिळतात.उदाहरणार्थ सुरती पापडी ,लसणीची पात.चला तर आज पारंपारिक पद्धतीने उंधियो कसा करतात हे बघूया! Anushri Pai -
सुरती उंधीयु पुरी (Surti Undhiyu Puri Recipe In Marathi)
#BWR#बाय_बाय_विंटर_रेसिपीसयावर्षीच्या थंडीला बाय बाय करताना मस्त असा "सुरती उंधीयु पुरी" चा बेत केला होता. गुजरात राजस्थान मधे फेमस असलेली ही उंधीयु भाजी थोड्या फार वेगळ्या प्रकारे केली जाते. आमच्या कडे सगळ्यांना ही सुरती उंधीयु भाजी बरोबर पुरी खायला खूप आवडते. या भाजीमधे जरा तेल जास्त लागतं. तसंच उंधीयु मधल्या मुठिया तळण्यासाठी पण तेल लागतं. थंडी मधे जरा तेल तुपाचे पदार्थ खायला चांगले पण एकदा उन्हाळा सुरू झाला की तेलकट पदार्थ तब्येतीला पण चांगले नाहीत. म्हणूनच सरत्या थंडीला बाय बाय करताना मस्त अशी उंधीयु पुरी बनवली. ह्या मधे खूप वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या घालतात. त्यामुळे सगळ्या भाज्या पोटात जातात. ही आवडते ती नको असे करु शकत नाही. म्हणून मला अशी मिक्स भाजी करायला आणि खायला पण खूप आवडते. उंधीयु मधे खूप वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या घालतात, त्यामुळे त्या भाज्या निवडायला आणि बनवायला पण जरा वेळ लागतो. पण एकदा का उंधीयु भाजी तयार झाली की त्याचा सुगंध घरभर दरवळत असतो. खायला एकदम मस्तच लागते. या उंधीयु भाजीची रेसिपी पुढे देत आहे. Ujwala Rangnekar -
उकडहंडी/ उकरांडी/ संक्रांतीची वाडवळी पद्धतीची मिक्स भाजी (ukadhandi mix bhaji recipe in marathi)
#EB9#W9 Komal Jayadeep Save -
-
-
-
-
More Recipes
टिप्पण्या