बेसन घालून सिमला मिरचीची भाजी (Besan Shimla Mirchichi Bhaji Recipe In Marathi)

#BHR
बेसन घालून इतर अनेक भाजी करतो त्याचप्रमाणे सिमला मिरचीची बेसन घातलेली भाजी किंवा सिमला मिरचीचा झुणका अतिशय रुचकर लागतो. सिमला मिरचीचा विशेष असा एक वास असतो आणि तो कुठल्याही भाजीला अतिशय चव आणतो, सुगंध आणतो आणि म्हणून सिमला मिरची आणि बेसन ची भाजी किंवा झुणकाही अतिशय सुंदर लागतो.
बेसन घालून सिमला मिरचीची भाजी (Besan Shimla Mirchichi Bhaji Recipe In Marathi)
#BHR
बेसन घालून इतर अनेक भाजी करतो त्याचप्रमाणे सिमला मिरचीची बेसन घातलेली भाजी किंवा सिमला मिरचीचा झुणका अतिशय रुचकर लागतो. सिमला मिरचीचा विशेष असा एक वास असतो आणि तो कुठल्याही भाजीला अतिशय चव आणतो, सुगंध आणतो आणि म्हणून सिमला मिरची आणि बेसन ची भाजी किंवा झुणकाही अतिशय सुंदर लागतो.
Steps
- 1
प्रथम सिमला मिरची स्वच्छ धुऊन त्यातील बिया काढून आणि लांबट आकारात चिरून घ्यावी. त्याचप्रमाणे कांदा ही लांबट आकारात चिरून घ्यावा. आणि लसणीच्या पाकळ्या ठेचून घ्याव्यात.
- 2
बेसन कोरडेच कढईमध्ये खमंग भाजून घ्यावे
- 3
नंतर नेहमीप्रमाणे तेल गरम करून,राई तडतडल्यावरती, लसूण पाकळ्या तांबूस कलरच्या झाल्यावर,त्यात कांदा घालावा, आणि कांदा गुलाबी रंगाचा परतून झाल्यावर त्यात हळद आणि मिरची पावडर घालून नीट परतून घ्यावे व सिमला मिरची घालावी गरजेप्रमाणे मीठ घालून मंद आचेवर दोन मिनिट फक्त झाकून ठेवावे
- 4
सिमला मिरची अर्धी कच्ची झाल्यावर त्यात भाजून घेतलेले बेसन घालावे आणि नीट मिक्स करून कढई झाकून त्याच्या झाकणावरती पाणी घालून मंद गॅसवर पाच मिनिटे ठेवून द्यावे. मध्ये दोनदा उघडून त्यावर पाण्याचा शिडकावा करावा.
- 5
अशा तऱ्हेने पाच मिनिटानंतर आपला सिमला मिरचीचा खमंग असा झुणका तयार होतो, त्यावर मस्त बारीक चिरलेली हिरवीगार कोथिंबीर पसरून बाजरीच्या भाकरी बरोबर खाण्यास अतिशय मजा येते.
Similar Recipes
More Recipes
-

Pilau and Pilipili ya Kukaanga
Cindy Juliet
-

Ifeoma Obianagha
-

Surhaan Tahir Wafai
-

Chef Lucas
-

Chef Lucas
-

🍅 Ruby Crown Pav Bhaji Masala Rice | No Onion, No Garlic
Krishna Dholakia
-

Lakshmi Sridharan Ph D
-

Gabriel Ivarsson
-

Baked Honey Nut Chicken Breasts
Chris Gan
-

Autumn Farmer
-

Greyson Devane
-

CHILEAN BEEF CARBONADA SOUP. JON STYLE
Jon Michelena
-

Choco custard with sago dana twist 🍪🍪🍨🍨
Kulsoom Bukhari
-

Saima Shahzad
-

আইসক্রিম সন্দেশ - জন্মাষ্টমী স্পেশাল।
Debalina Banerjee
-

कंटोली (Kantoli Recipe In Marathi)
Anushri Pai
-

Jayashree Kumbhakar
-

MJ's Kitchen
-

Potato stuffed idly (shallow fried)
Dr ss goutham chakravarthy
-

skunkmonkey101
-

skunkmonkey101
-

Jayashree Kumbhakar













Comments