लाल भोपळ्याचा हलवा

Smita Mayekar Singh
Smita Mayekar Singh @cook_20355451

कुंभाच्या आकाराचा भोपळा आणि त्यातल्या असंखय बिया हे उत्पादकतेचे , सृजनशीलतेचा प्रतीक आहे . चवीने गोड असलेला हा लाल भोपळा मिठाई बनवण्यासाठी हलवायांचा आवडता ! मग तो आग्र्याचा पेठा असो की आपले महाराष्ट्रातील खीर किंवा घारगे !
आजची गोडाची पाककृती - लाल भोपळ्याचा हलवा !

लाल भोपळ्याचा हलवा

कुंभाच्या आकाराचा भोपळा आणि त्यातल्या असंखय बिया हे उत्पादकतेचे , सृजनशीलतेचा प्रतीक आहे . चवीने गोड असलेला हा लाल भोपळा मिठाई बनवण्यासाठी हलवायांचा आवडता ! मग तो आग्र्याचा पेठा असो की आपले महाराष्ट्रातील खीर किंवा घारगे !
आजची गोडाची पाककृती - लाल भोपळ्याचा हलवा !

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

4-5 सर्व्हिंग्ज
  1. १ किलो लाल भोपळा -, साली काढून, स्वच्छ धुऊन, मोठे तुकडे
  2. १५० ग्रॅम्स खवा
  3. अर्धा कप + १ टेबलस्पून = १५० ग्रॅम्स साखर
  4. तूप गरजेनुसार
  5. २ टेबलस्पून खसखस भाजलेली
  6. १ टेबलस्पूनथोडे केशराचे धागे गरम दुधात भिजवून
  7. १ टेबलस्पून बदामाचे काप
  8. १ टेबलस्पून पिस्त्याचे तुकडे
  9. २ टेबलस्पून काजूचे तुकडे
  10. १ टेबलस्पून मनुका
  11. १ टेबलस्पून चारोळी
  12. ५-६ हिरव्या वेलचीचे दाणे जाडसर कुटून

कुकिंग सूचना

  1. 1

    सर्वप्रथम भोपळ्याला किसणीवर किसून घेऊ. भोपळा किसून झाला की एका कढईत खवा भाजून घ्यायचाय. मंद आचेवर गुलाबी रंगावर खवा परतून घेतला की त्याला एका ताटलीत काढून घ्यावे. खवा दाणेदार होईपर्यत परतू नये.

  2. 2

    त्याच कढईत मग दीड टेबलस्पून तूप गरम करून घ्यावे. या तुपात मंद आचेवर बदाम, काजू, चारोळी आणि पिस्ता मंद आचेवर परतून घ्यावे. ते जरा परतले की खमंग सुवास दरवळतो मगच त्यात मनुका घालाव्यात. कारण त्या लगेच फुलतात आणि करपू शकतात. म्हणून त्या शेवटी घालून फुलल्या की ताटलीत काढून घ्यावा.

  3. 3

    उरलेले तूप तसेच कढईत ठेवून त्यात अजून १-२ टेबलस्पून तूप घालावे. त्यात किसलेला भोपळा घालून नीट एकत्र परतून घ्यावा.
    २-३ मिनिटांनंतर केशराचे दूध घालावे. आणि आच मंद करून झाकण घालून भोपळा शिजू द्यावा. पाणी घालू नये, स्वतःच्याच पाण्यात भोपळा शिजू द्यावा.

  4. 4

    ८ मिनिटांनंतर भोपळा बऱ्यापैकी शिजतो. चमच्याने दाबून त्याला मॅश करावे म्हणजे तो एकजीव होतो. अजून थोडा वेळ झाकून शिजू देऊ.

  5. 5

    आपण पूर्ण १५ मिनिटे भोपळा शिजवून घेतलाय. आता भाजलेली खसखस घालून एकत्र करावी. साखर घालून ढवळून घ्यायचाय. साधारण ५ मिनिटे हलवा साखरेसोबत शिजून एकजीव होतो. त्यात खवा घालून एकत्र करून घ्यावा.

  6. 6

    आता सुका मेवा घालून व वेलची पावडर घालून हलवा व्यवस्थित वरखाली करून घ्यायचाय.
    सुंदर सोनसळी रंगाचा लाल भोपळ्याचा हलवा चांदीच्या वर्खाने सजवून खावयास द्यावा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Smita Mayekar Singh
Smita Mayekar Singh @cook_20355451
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes