शेजवान हक्का नुडल्स (Schezwan hakka noodles recipe in marathi)

Vrushali Patil Gawand
Vrushali Patil Gawand @cook_19754070

#आई .... शेजवान हक्का नुडल्स ( on demand of my son to his beloved Nani ) माझ्या लेकाने सांगितले की आईसाठी पोस्ट आहे ना मग तिच्यासाठी नुडल्स बनव .मग काय आपली आज्ञा शिरसावंद्य म्हणत आधी सामान चेक केले सगळं आणि बनवले . लाॅकडाऊन संपल्यावर ये गं आई घरी परत बनवेन मी तुझ्यासाठी

शेजवान हक्का नुडल्स (Schezwan hakka noodles recipe in marathi)

#आई .... शेजवान हक्का नुडल्स ( on demand of my son to his beloved Nani ) माझ्या लेकाने सांगितले की आईसाठी पोस्ट आहे ना मग तिच्यासाठी नुडल्स बनव .मग काय आपली आज्ञा शिरसावंद्य म्हणत आधी सामान चेक केले सगळं आणि बनवले . लाॅकडाऊन संपल्यावर ये गं आई घरी परत बनवेन मी तुझ्यासाठी

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. 2पॅकेट नूडल्स
  2. 2गाजरं
  3. 2जुडी कांद्याची पात
  4. 2 कपकोबी उभा चिरून
  5. 1 कपसिमला मिरची उभी चिरून
  6. 4 टेबलस्पूनसोयासॉस
  7. 4 टेबलस्पूनटोमॅटो सॉस
  8. 3 टेबलस्पूनरेड चिली सॉस
  9. 2 टीस्पूनशेजवान सॉस
  10. 1मॅगी सीजनिंग क्यूब
  11. मीठ चवीनुसार

कुकिंग सूचना

  1. 1

    नूडल्स शिजवण्यासाठी जवळ-जवळ १२-१३ कप पाणी एका कढईत उकळत ठेवा.पाण्यात १/२ टीस्पून मीठ घालून पाण्याला उकळी आली की त्यात नूडल्स न तोडता घालावेत मध्यम ते मोठ्या आचेवर. २ मिनिटात नुडल्स नरम होतात आणि पाण्यावर तरंगू लागतात.अजून काही वेळ शिजवावेत पण पूर्ण मऊ होईपर्यंत शिजवू नये साधारणतः दाताखाली एक बाईट मिळेपर्यंत शिजवावेत त्यानंतर ते एका चाळणीत काढून थंड पाण्याखाली धुऊन घ्यावेत म्हणजे त्यातला एक्स्ट्रा निघून जाईल नूडल्स एका थाळीत पसरवून थंड करायला ठेवावे.

  2. 2

    नूडल्स थंड होईपर्यंत कोबी,सिमला मिरची गाजर लांब पातळ चिरून घ्यावेत, कांद्याची पात बारीक करून घ्या आणि त्याचा कांदा उभा चिरून घ्या लसूण पण बारीक कापा.एका छोट्या वाटीत सोया सॉस रेड चिली सॉस टोमॅटो सॉस आणि मॅगी एकत्र करुन मिक्स करून घ्यावे झाला आपला शेजवान फ्राईड मसाला तयार

  3. 3

    आता एका पातेल्यात तेल गरम करून घ्यावे लसूण घालून तो परतून कांदा घालून नरम होईपर्यंत परतावे नंतर सिमला मिरची कोबी गाजर त्यात परतूनच शिजवुन घ्या. फार शिजेपर्यंत नाहीतर जरा क्रंन्चीनेस ठेवावा त्यात.आता कांद्याची पात आणि तयार केलेला शेजवान फ्राईड मसाला घाला आणि चवीपुरते मीठ घालून नीट एकत्र मिसळून घ्या. शिजवलेले नूडल्स फोर्कच्या मदतीने भाज्यां सोबत एकत्र घालून दोन-तीन मिनिटे मोठ्या आचेवर परतून घेऊन गॅस बंद करा. शेजवान चटणी सोबत गरम गरम नूडल्स हमारा तयार हो गया.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Vrushali Patil Gawand
Vrushali Patil Gawand @cook_19754070
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes