कैरी डाळ (KAIRI DAL RECIPE IN MARATHI)

Pallavii Bhosale
Pallavii Bhosale @cook_19703115

#फॅमिली .... हो फॅमिली म्हंटले की घर आणि घरात राहणारे रक्ताची नाती.....त्यातल्या त्यात आई वडील म्हणजे आपला एक अविभाज्य घटक....आजची रेसिपी कैरी डाळ ही माझ्या फॅमिली साठी बनविली आहे त्यांना डेडीकेटेड आहे....👩🏻‍🍳💯👍🏼

कैरी डाळ (KAIRI DAL RECIPE IN MARATHI)

#फॅमिली .... हो फॅमिली म्हंटले की घर आणि घरात राहणारे रक्ताची नाती.....त्यातल्या त्यात आई वडील म्हणजे आपला एक अविभाज्य घटक....आजची रेसिपी कैरी डाळ ही माझ्या फॅमिली साठी बनविली आहे त्यांना डेडीकेटेड आहे....👩🏻‍🍳💯👍🏼

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

३० मिनिटे
३-४ जणांसाठी
  1. ५० ग्रॅम मूग डाळ
  2. ५० ग्रॅम तूर डाळ
  3. 1छोटी कैरी
  4. १मोठा कांदा
  5. 1 टेबलस्पूनआलें लसूण पेस्ट
  6. 5-6कडीपत्ता पाने
  7. 1 टीस्पूनमोहरी
  8. 1 टीस्पूनजिर
  9. 1टोमॅटो
  10. 2 टीस्पूनघरचा मसाला
  11. 1 टीस्पूनहळद
  12. आवडीनुसार कोथिंबीर
  13. चवीनुसारमिठ
  14. 2 टेबलस्पूनतेल

कुकिंग सूचना

३० मिनिटे
  1. 1

    प्रथम तूर डाळ आणि मुग डाळ स्वच्छ साफ करून धुवून कूकर भांड्यात घ्या....त्यात एक बारीक चिरलेला टोमॅटो, आणि ५-६ बारीक आकाराच्या कैरी च्या फोडी घाला....त्यात २ ग्लास पाणी घालून कूकर ला ४-५ शिट्ट्या घ्या....कूकर नैसर्गिक रित्या मध्यम आचेवर असू द्यावा...💯👩🏻‍🍳

  2. 2

    कूकर वरील शिट्ट्या झाल्यावर कूकर नैसर्गिक रित्या घाई न करता थंड होऊ द्या....आता त्यातील शिजलेली डाळ बाहेर काढून हाटून घ्या....

  3. 3

    आता कढई मध्ये, २ चमचे तेल घेऊन त्यात मोहरी, जिरे, कडीपत्ता यांची फोडणी करा.....हे सर्व जिन्नस तडतडले की त्यात, एक बारीक चिरलेला कांदा घालून गुलाबी होईपर्यंत फ्राय करून घ्या.....त्यात आता घरचा रोजचा वापरावयाचा मसाला, मीठ, हळद, आणि थोडी पुन्हा कैरी चिरून घाला....त्यात आले लसूण पेस्ट घालून सर्व मसाले एकजीव करून घ्या....आणि मग त्यात आपली शिजवलेली हटलेली डाळ त्यात घाला....

  4. 4

    वरून कोथिंबीर पेरून गरम गरम टेस्टी चविष्ट आणि आंबट तिखट अशी कैरी डाळ हिला दणकून उकळी घेऊन गरम गरम भात, पोळी (चपाती), भाकरी सोबत सर्व्ह करा....💯👩🏻‍🍳

  5. 5

    आपली सुंदर चविष्ट कैरी डाळ तयार💯👩🏻‍🍳👍🏼

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Pallavii Bhosale
Pallavii Bhosale @cook_19703115
रोजी

Similar Recipes