मँगो केशरी पुडींग आईसक्रीम (Mango Saffron Pudding Recipe in Marathi)

Priyanka Patil
Priyanka Patil @cook_23363502
Pune

मँगो केशरी पुडींग आईसक्रीम (Mango Saffron Pudding Recipe in Marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

४ सर्व्हिंग
  1. व्हॅनिला आइस्क्रीम-.500 ml दूध
  2. 250 ml फ्रेश क्रीम
  3. 1 टेबल स्पूनकॉर्न फ्लोअर
  4. 4 टेबल स्पूनसाखर
  5. 1 टेबल स्पूनव्हॅनिला इसेन्स
  6. मँगो कस्टर्ड - 5oo ml दूध
  7. 3 टेबल स्पूनसाखर
  8. 2 टेबल स्पूनमँगो कस्टर्ड पावडर
  9. मँगो ब्रेड पुडींग - 4 वाईट ब्रेड
  10. 10केसर पाकळी
  11. 2हापूस आंबा बारीक कट केलेले

कुकिंग सूचना

  1. 1

    प्रथम आपण व्हॅनिला आईस्क्रीम बनवूया.. एक पातेले मध्ये दूध उकडायला ठेवूया.. कॉर्न फ्लोअर थंडी दुधामध्ये एकत्र करूया.. हे मिश्रण दुधामध्ये टाकूया.. सतत हलवत रहा..

  2. 2

    कॉर्न फ्लोअर घट्ट होतंय.. आता त्याच्यात साखर टाकूया आणि सतत हलवत रहा.. आपलं कॉर्नफ्लोअर मिश्रण तयार झालेला आहे... हे मिश्रण ला छान थंड होऊ द्या.. थंड झाल्यानंतर फ्रेश क्रीम आणि व्हॅनिला इसेन्स टाकून मिक्सरमधून काढूया.. आपलं मिश्रण छान एकत्र झालेला आहे..

  3. 3

    मिश्रण ला एअर टाईट कंटेनरमध्ये टाकूया... ॲल्युमिनियम फाईल मध्ये रेप करूया.. केप लावून आठ ते १२ तास फ्रिजमध्ये सेट व्हायला ठेवूया.. बारा तासानंतर आपली व्हॅनिला आईस्क्रीम रेडी आहे..

  4. 4

    आता आपण मॅंगो कस्टड बनवूया... दुधाला छान उकळी येऊ द्या.. उकळी आल्यानंतर साखर टाकून कमी आचे वर ठेवूया..एक वाटी मध्ये थंड दुधात कस्टर्ड पावडर एकत्र करून.. दुधात टाकूया.. घट्ट झाल्या पर्यंत होऊ द्या.. आपल्या छान मँगो कस्टर्ड घट्ट रेडी झालेला आहे.. दोन तासासाठी फ्रिजमध्ये थंड होऊ द्या..

  5. 5

    मॅंगो ब्रेड पुडिंग बनवूया...ब्रेडचे कॉर्नर कट करू या... बाऊलमध्ये गरम दुधात केसर पाकळ्या भिजत घालूया.. ब्रेडला केसर दुधात छान सॉफ्ट करूया..

  6. 6

    सॉफ्ट झालेल्या केसरी ब्रेडमध्ये.. आंब्या चे काप टाकून राऊंड शेप तयार करूया.. आपला मॅंगो ब्रेड पुडिंग तयार झालेला आहे..

  7. 7

    मँगो केशरी पुडींग आईसक्रीम रेडी करूया...1 बाउल मध्ये थंड झालेला मॅंगो कस्टर्ड टाकून.. त्याच्यावरती मॅंगो ब्रेड पुडिंग टाकून.. व्हॅनिला आईस्क्रीम टाकूया..

  8. 8

    त्याच्यावरती आंब्याचे काप टाकून.. केसरी दूध टाकूया.. थोडी वेळेसाठी फ्रीजमध्ये थंड होऊ द्या.. आपली छान डिलिशियस मँगो केशरी पुडींग आईसक्रीम रेडी झालेली आहे..

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Priyanka Patil
Priyanka Patil @cook_23363502
रोजी
Pune

Similar Recipes