नॉर्थ इंडियन स्टाईल फणस भाजी (fanas bhaaji recipe in marathi)

Priyanka Patil
Priyanka Patil @cook_23363502
Pune

#दिपाली पाटील

नॉर्थ इंडियन स्टाईल फणस भाजी (fanas bhaaji recipe in marathi)

#दिपाली पाटील

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

1 तास
4 सर्व्हिंग
  1. 300 ग्रामफणस
  2. 1 कपतेल
  3. 1 टी स्पूनशाह जिरा
  4. 1 इंचदालचिनी
  5. 1हिरवी इलायची
  6. 1/2मोठी इलायची
  7. 3लोंग
  8. 3काळीमिरी
  9. 1चक्रिफूल
  10. 2तेज पान
  11. 10कडीपत्ता पान
  12. 2कांदा
  13. 1टोमॅटो
  14. 1 इंचआला
  15. 10लहसून पाकळी
  16. 1 टेबल स्पूनलाल तिखट
  17. 1 टेबल स्पूनधणी पुड
  18. 1 टी स्पूनहळद
  19. 1 टी स्पूनगरम मसाला
  20. 1 टेबल स्पूनकसूरी मेथी
  21. 2 कपपाणी
  22. चवीप्रमाणेमीठ

कुकिंग सूचना

1 तास
  1. 1

    चाकू आणि हाताला तेल लावून.. फणस चे मोठे मोठे काप करू या.. आणि त्याची साल काढूया.. फणस कट झाल्यानंतर त्याला स्वच्छ पाण्याने धून घेऊ. कांद्याचे पेस्ट करूया.. आलं-लसूण टोमॅटो छान पेस्ट करूया..

  2. 2

    कढाई मध्ये तेल टाकून फणस ला छान शॅलोफ्राय करूया.. आपला फणस छान गोल्डन ब्राऊन कलरचा झालेला आहे...

  3. 3

    उरलेले तेल मध्ये शाह जिरे आणि तेजपत्ता छान लाल होऊ देऊ..आता त्यात लॉंग, कालिमिरी, दालचिनी, मोठी इलायची, हिरवी इलायची, दालचिनी, चक्रीफुल घालून कढीपत्ता टाकूया..

  4. 4

    आपली कांद्याची पेस्ट टाकून कमी आचीवर होऊ देऊ.. अधून मधून हलवत राहा.. दहा मिनिटापर्यंत छान कांद्याची पेस्ट झालेली आहे.. त्यात आता टोमॅटो लसूण आलंची पेस्ट घालूया.. त्याला पण कमी आचीवर होऊ देऊ..

  5. 5

    थोडं थोडं पाणी टाकून.. मसाला आणखी होऊ द्या..पाणी टाकल्यानंतर मसाले चा कलर पांढरा दिसेल.. पांढरे कलर ला आपण थोडं थोडं पाणी टाकून छान लाल करूया.. लाल झाल्यानंतर कसुरी मेथी टाकून थोडी वेळ अजून होऊ देऊ.. आता आपण लाल तिखट, धना पुड, हळद, गरम मसाला टाकून होऊ देऊ... थोडं पाणी टाकून पाच मिनिटापर्यंत होऊ देऊ...

  6. 6

    मसाल्यात मीठ टाकून.. फणस टाकूया आणि छान एकत्र करून थोडे वर होऊ देऊ.. पाणी टाकून झाकण ठेवून.. दहा मिनिटापर्यंत शिजवून घेऊन.. भाजी ला आपले प्रमाणे घट्ट करू शकता..

  7. 7

    आपण सगळे मसाले कच्चा वापरतोय.. त्यामुळे आपल्याला जास्त वेळ भाजी शिजवायला लागत आहे.. नोर्थ इंडियन स्टाईल फणस ची भाजी आपली तयार झाली आहे.. मी फ्रेश क्रीम घालून सर्व केलेला आहे.. आपली फनस ची भाजी नॉनव्हेजला कॉम्पिटिशन देते.. झणझणीत फणस ची भाजी रेडी आहे..

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Priyanka Patil
Priyanka Patil @cook_23363502
रोजी
Pune

Similar Recipes