मका पीठाचे पानगे (maka pithache pange recipe in marathi)

Bhaik Anjali
Bhaik Anjali @cook_19425386

#रेसिपीबुक
#week1
लहानपणी पणजीच्या हातचे चुलीवरचे पानगे खाल्ल्याची आठवण अजुनही ताजी आहे कारणही तसेच तो चुलीवरच्या पदार्थांचा गंध, शुद्ध सकस पण मर्यादित साहित्य, महत्वाचे म्हणजे नात्यांचे अतुट बंध ..
म्हणुन आज पानगे बनवले ती दुध वापरत असे मी दुध पावडर वापरले , पणजीच्या आठवणीत , आम्ही तीला प्रेमाने काकी म्हणत असु .

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

25 मिनिट
3 ते 4 सर्व्हिंग्ज
  1. 250 ग्रॅममक्याचे पीठ
  2. 1 कपदूध पावडर
  3. 1 टी स्पूनओवा
  4. 1 टी स्पूनजिरे
  5. 2 टी स्पूनपिठीसाखर
  6. तळण्यासाठीतेल तळण व मोहनासाठी
  7. 1 पिंचहळद

कुकिंग सूचना

25 मिनिट
  1. 1

    प्रथम पराती मध्ये मक्याचे पीठ घेऊन त्यामध्ये हळद,मीठ,ओवा,जिरे,पिठीसाखर, दूध पावडर व तेलाचे मोहन घेऊन एकत्र करावे व पाणी घालून घट्ट गोळा मळून पाच मिनिटे बाजूला ठेवावा.

  2. 2

    पानगे आपल्याला वाफवायचे आहेत त्यामुळे इडली कुकर मध्ये पाणी घालून गरम करायला ठेवावे त्यावर इडलीची प्लेट ठेवून असल्यास केळीचे पाने घेऊन त्यावर फोटोमध्ये दाखवल्या नुसार पानगे लावून कुकर वर झाकण ठेवून दहा मिनिटासाठी वाफवायला ठेवावे. दहा मिनिटांनी गॅस बंद करून हे पानगे बाहेर काढून ठेवावे.

  3. 3

    चाकूने एका पानग्या चे चार काप करून खमंग तळून घ्यावे. कुठल्याही खीरी सोबत,आम रसासोबत किंवा आमटी सोबत हे पानगे सर्व्ह करावे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Bhaik Anjali
Bhaik Anjali @cook_19425386
रोजी

Similar Recipes