मिसळपाव (misalpav recipe in marathi)

Vrushali Bagul
Vrushali Bagul @cook_21034901

  #रेसिपीबुक Post 2 रेसिपी बुक साठी गोडाने सुरुवात केली. म्हणून गोडानंतर काही झणझणीत आणि चमचमीत हवंच. म्हणून आजची ही मिसळ पाव थाली मिसळ. हा पदार्थ क्वचितच कुणाला आवडत नसेल आणि नाशिकच्या लोकांचा मिसळ म्हणजे जीव की प्राण.. आणि मी ही नाशिकची असल्यामुळे अर्थातच मी ही यात तूसभर मागे नाही.. मी ही तितकीच मिसळपाववर ताव मारणारी.. आणि घरी केलेल्या गरमागरम मिसळपाववर ताव मारायची मजाही काही वेगळीच..

मिसळपाव (misalpav recipe in marathi)

  #रेसिपीबुक Post 2 रेसिपी बुक साठी गोडाने सुरुवात केली. म्हणून गोडानंतर काही झणझणीत आणि चमचमीत हवंच. म्हणून आजची ही मिसळ पाव थाली मिसळ. हा पदार्थ क्वचितच कुणाला आवडत नसेल आणि नाशिकच्या लोकांचा मिसळ म्हणजे जीव की प्राण.. आणि मी ही नाशिकची असल्यामुळे अर्थातच मी ही यात तूसभर मागे नाही.. मी ही तितकीच मिसळपाववर ताव मारणारी.. आणि घरी केलेल्या गरमागरम मिसळपाववर ताव मारायची मजाही काही वेगळीच..

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

40-50 मिनिटे
5 जणांसाठी
  1. 250 ग्रॅममोड आलेली मटकी
  2. 2मध्यम आकाराचे कांदे
  3. 1मोठ्या आकाराचा टोमॅटो
  4. 10-12लसूण पाकळ्या
  5. 1 टी स्पूनमोहरी
  6. 1 इंचअद्रक
  7. 1 टीस्पूनजिरे
  8. 1 टी स्पूनधने
  9. 2 टी स्पूनखोबरे
  10. 1 टी स्पूनलाल तिखट
  11. 1 1/2 टी स्पूनगरम मसाला
  12. 1 1/2 टी स्पूनकांदा लसूण मसाला
  13. 1/2 टी स्पूनहळद
  14. चवीनुसारमीठ
  15. 1 टेबलस्पूनकोथिंबीर
  16. 12पाव
  17. 10-12कढीपत्ता
  18. चिमुटभरहिंग
  19. फरसाण

कुकिंग सूचना

40-50 मिनिटे
  1. 1

    प्रथम मटकी स्वच्छ धुऊन कुकरमध्ये मटकी एक ग्लास पाणी, हळद आणि चवीनुसार मीठ घालून एक शिट्टी काढून घ्यावी. आता कढईत एक चमचा तेल गरम करून त्यात जिरे धने खोबरं भाजून घ्यावं. धने जिरे खोबरे भाजून झाल्यावर त्यात आलं-लसूण उभा चिरलेला कांदा आणि टोमॅटो घालून छान परतून घ्यावे. परतलेल मिश्रण थंड करून मिक्सरला फिरवून घ्यावं.

  2. 2

    आता कढईत परत चार ते पाच चमचे तेल गरम करून कढीपत्ता व चिमूटभर हिंग जिरे, मोहरी ची फोडणी करावी. आता मिक्सरला फिरवून घेतलेलं कांदा टोमॅटो चे मिश्रण घालून तेल सुटेपर्यंत परतून घ्यावे. साधारण चार पाच मिनिटानंतर मिश्रणाला छान तेल सुटल्यानंतर त्यात हळद गरम मसाला लाल तिखट आणि कांदा लसूण मसाला घालून परत एकदा दोन-तीन मिनिटासाठी परतून घ्यावे. कुकरला शिजवलेली मटकी घालून घ्यावी.

  3. 3

    कितपत कट हवा आहे त्यानुसार पाणी घालावे. चवीनुसार मीठ आणि कोथिंबीर घालून छान दोन तीन मिनिटांसाठी उकळून घ्यावे. गरमागरम मिसळ फरसाण, बारीक चिरलेला कांदा,लिंबू आणि पावासोबत फस्त करावी.

  4. 4

    अशा पद्धतीने चमचमीत आणि झणझणीत मिसळचा
    दही, एखादा गोड पदार्थासोबत घरबसल्या आस्वाद घ्यावा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Vrushali Bagul
Vrushali Bagul @cook_21034901
रोजी

Similar Recipes