आलुबोंडा तर्री(alubonda tarri recipe in marathi)

Devyani Pande
Devyani Pande @cook_22433392
नागपुर

#रेसिपीबुक
*गावाकडची आठवण *
शांत,सुंदर व ऐतिहासीक वारसा लाभलेले अशी आमच्या शहराची ख्याती;
अमरावती शहरातील एका थिएटर जवळ असलेले मामा जिलेबीवाला यांची जिलेबी अत्यंत फेमस होती त्याच प्रमाणे शहरात कुणीही बाहेरून आले तर त्यांना राजकमल चौकातील गड्डा होटेल मधील झणझणीत आलूबोंडा तर्री व मिसळ भुरळ पाडल्याशिवाय राहत नसे, अमरावतीला आल्यावर गड्डा हाॅटेल ची मिसळ आणि आलूबोंडा न खाता जाणारा क्वचितच सापडेल, राजकमल चौकात असलेल्या या हाॅटेल मध्ये तळमजल्यावर चार पाच टेबल व त्यावर च्या माळ्यावर तीन चार टेबल असे मोजकेच टेबल होते तळ मजल्यात (गड्यात) असल्यानेच बहुदा त्याला गड्डा हाॅटेल हे नाव पडले असावे.
हाॅटेल मध्ये प्रवेश करताच हाॅटेल चे मालक हसतमुखाने सर्व ग्राहकचे स्वागत करायचे व आग्रहाने आलूबोंडा दे रे तिथे असे फर्मान सोडयचे..त्यांच्या या स्वभावामुळेच गड्ढा हाॅटेल हे बऱ्याच जणांना आपल्या हक्काचे चर्चेचे ठिकाण वाटायचे,अनेक राजकारण्यांपासून तर काॅलेजचे युवक युवतींपर्यंत सर्वांचे हे आवडते हाॅटेल.तिथे मोठ्यांसोबत येणाऱ्या लहानांना आवर्जून जिलेबीची प्लेट मिळत असे व त्या जिलेबीचे पैसे कधीही घेतले जात नसत.
असे हे आपुलकीचे ठिकाण गड्ढा हाॅटेल आज काळाच्या आड गेले पण त्या हाॅटेलमधली झणझणीत आलूबोंडा तर्री, व मिसळ ज्यांनी खाल्ली त्यांच्या जिभेवर ती चव ईतक्या वर्षांनतरही तशीच ताजी असेल यात शंकाच नाही.गावाकडील या आठवणीत गड्ढा हॉटेल आज काळाच्या आड गेले पण त्या हाॅटेलमधली झणझणीत आलूबोंडा तर्री, व मिसळ ज्यांनी खाल्ली त्यांच्या जिभेवर ती चव ईतक्या वर्षांनतरही आजही कायम आहे.,तर तीच झणझणीत आलूबोंडा तर्री ची चव मी पुन्हा आणण्याचा प्रयत्न करते.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30 मिनीट
3 सर्व्हिंग्ज
  1. 250 ग्रॅमउकडलेले बटाटे
  2. 1 वाटीचणे भिजवुन उकडलेले
  3. 1कांदा बारिक चिरलेला
  4. 8कधिपात्त ची पानं
  5. 2हिरवी मिरची बारिक चिरलेली
  6. 1 टीस्पूनहळद
  7. 1 टीस्पूनहिंग
  8. 1 टीस्पूनमीठ
  9. 3 टेबलस्पूनआल कांदा लसूण पेस्ट
  10. 1टोमैटो बारिक चिरलेला
  11. 2 टीस्पूनतिखट
  12. 1/2 टीस्पूनहळद
  13. 1 टीस्पूनमीठ
  14. 1/2 टीस्पूनहिंग
  15. 1 टीस्पूनमोहरी जीरे
  16. 1 टीस्पूनगरम मसाला
  17. तेल
  18. 1 टेबलस्पूनकोथिंबिर
  19. 150 ग्रॅमबेसन

कुकिंग सूचना

30 मिनीट
  1. 1

    प्रथम कढईत तेल घेउन गरम झाले की मोहरी जीरे घाला ते तडतडले की हिंग मिर्ची कढीपत्ता व कांदा घालुन परता आत्ता हळद मीठ ब बटाटे कुस्करून घाला व सुकी भाजी करुन घ्या

  2. 2

    दुसरीकडे पातेल्यात 3 टेबलस्पून तेल घेउन गरम करा व मोहरी जीरे हिंग आल लसुण कांदा पेस्ट घालुन खमंग परतावे मग टोमेटो तिखट हळद गरम मसाला घालुन परता तेल हलके सुटे पर्यंत. मग त्यात उकडलेले चणे घालुन मिक्स करा व गरम पाणी सोडा जितकी पातळ तर्री हवी असेल तितके व छान उकळू द्या. थोडे चणे कुस्करून घातले की तर्री थोडी घट्ट होते.

  3. 3

    बेसन मधे चवी प्रमाणे मीठ हळद हिँग घालुन पाण्याने घट्ट असे मिश्रण तैय्यार करा. भाजी थंडी झाली की त्याचे गोळे करुन तेलातून तळून काढा

  4. 4

    सर्व्ह करतांना आलुबोंडा प्लेट मधे ठेऊन त्यावर गरम गरम तर्री ओतावी कोथींबीर शेव व चिरलेला टोमेटो घालुन सर्व्ह करावे... माझ्या अमरावातीची आठवण.. आलुबोंडा तर्री..

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Devyani Pande
Devyani Pande @cook_22433392
रोजी
नागपुर

टिप्पण्या

Similar Recipes