गव्हाच्या पिठाच्या कापण्या  (gavhachya pethache kapnya recipe in marathi)

Vrushali Bagul
Vrushali Bagul @cook_21034901

#रेसिपीबुक
आम्ही लहान असताना आई नेहमी आषाढ महिन्यात या गव्हाच्या पिठाच्या कापण्या करायची. ह्या कापण्या चहा सोबत खाण्याची मजाच काही वेगळी होती. पण आता गावापासून दूर राहताना आईची आठवण येत होती. आणि त्यातच कुकपॅडने गावाची आठवण थीम ठेवली म्हणून आईची आठवण, गावाची आठवण आणि आषाढी स्पेशल सर्व योग जुळवून या कापण्या केल्या..

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

40-45 मिनिटे
  1. 2 वाट्यागव्हाचं पीठ
  2. 2 वाटीगुळ
  3. 2 चमचेबेसन
  4. 2 चमचेरवा
  5. 2 चमचेतांदळाचे पीठ
  6. 2 चमचेतीळ
  7. 1 चमचाबडीशेप (कुटुन घेतलेली)
  8. चिमुटभरमीठ
  9. 1/2 चमचावेलची पूड
  10. 2 चमचेतेल मोहनासाठी
  11. 1 वाटीतेल तळण्यासाठी
  12. 1 वाटीपाणी

कुकिंग सूचना

40-45 मिनिटे
  1. 1

    प्रथम एक वाटी पाण्यात गुळ टाकून पाण्याला उकळी काढून गुळाचे पाणी गाळून घ्यावे. आता गव्हाच्या पिठात बेसन पीठ,तांदुळाचे पीठ, रवा,कुटलेली बडीशेप, वेलचीपूड आणि मीठ घालून मिक्स करून घ्यावं.

  2. 2

    आता पीठात दोन चमचे थंड तेल घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यावं आणि गुळाचे पाणी घालून घट्टसर गोळा मळून हा गोळा दहा मिनिटांसाठी झाकून ठेवावा.

  3. 3

    आता तयार गोळा परत दोन मिनिटांसाठी मळून त्याचे समान भाग करून घ्यावे. व जाडसर पोळी लाटून त्यावर तीळ लावून घ्यावी. हलक्या हाताने तिळ व्यवस्थित प्रेस करून घ्यावी. आणि याला सुरीने हव्या त्या आकारात कट करून घ्यावं आणि आणि मध्यम आचेवर खरपूस अश्या कापण्या तळून घ्याव्यात.

  4. 4

    तयार कापण्या चहा सोबत, मधल्या वेळेत लागणाऱ्या छोट्या भुकेसाठी किंवा मुलांच्या टिफिन मध्ये देण्यासाठी अगदी उत्तम पर्याय आहे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Vrushali Bagul
Vrushali Bagul @cook_21034901
रोजी

Similar Recipes