स्पेशल सावजी पाटोडी रस्सा (patodi rassa recipe in marathi)

Sarita B.
Sarita B. @cook_23569819

#रेसिपीबुक विदर्भातील स्पेशल झणझणीत सावजी स्टाईल पाटोडी रस्सा ची रेसिपी.

स्पेशल सावजी पाटोडी रस्सा (patodi rassa recipe in marathi)

#रेसिपीबुक विदर्भातील स्पेशल झणझणीत सावजी स्टाईल पाटोडी रस्सा ची रेसिपी.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

20-25 मिनिटे
4-5 सर्व्हिंग्ज
  1. 1 वाटीबेसन
  2. 1मध्यम आकाराचा बारीक चिरलेेला कांदा
  3. 2-3 चम्मचतिखट
  4. 1 चम्मचहळद
  5. 1 चम्मचआले लसूण पेस्ट
  6. चवीनुसारमीठ
  7. 1 चम्मचगरम मसाला
  8. 2 वाटीतेल
  9. कोथिंबीर गार्निश करण्यासाठी

कुकिंग सूचना

20-25 मिनिटे
  1. 1

    सर्वंप्रथम बेसनमध्ये हळद, तिखट, मीठ, थोडं तेल आणि पाणी घालून मिश्रण थोडे घट्ट भिजवून त्याचा गोळा बनवावा. बनविलेला गोळा पोळपाटावर लाटून त्याची वडी तयार करून घ्यावी.

  2. 2

    आता गॅसवर एका मोठया गंजात तेल तापत ठेवावे. तेल गरम झाल्यावर कापून ठेवलेल्या वड्या तेलात तळून घ्यावे आणि बाजूला ठेवावे.

  3. 3

    उरलेल्या तेलात बारिक चिरलेला कांदा घालावा. कांदा थोडा गुलाबी झाल्यावर त्यात आले-लसूण ची पेस्ट, तिखट, मीठ, हळद आणि थोडे पाणी घालून त्याची ग्रेव्ही बनवून घ्यावी. 5 मिनिटे ग्रेव्ही ला उकळी येऊ द्यावी.

  4. 4

    ग्रेव्हीला उकळी आल्यावर त्यात बेसनाच्या बनविलेल्या वड्या सोडयाव्यात. चवीनुसार मीठ आणि गरम मसाला टाकून गंजावर झाकण ठेवून 5 मिनिटे भाजी शिजू द्यावी. वरून कोथिंबीर घालून गरमागरम सर्व्ह करावी.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Sarita B.
Sarita B. @cook_23569819
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes