श्रीखंड तिरामिसू (shrikhand tiramisu recipe in marathi)

#रेसीपीबुक #week9
.....फ्युजन रेसीपी
श्रीखंड तिरामिसू (shrikhand tiramisu recipe in marathi)
#रेसीपीबुक #week9
.....फ्युजन रेसीपी
कुकिंग सूचना
- 1
प्रथम दही चार-पाच तास सुती कपड्यात बांधून ते टांगून ठेवावे. चक्का तयार होतो. केसर थोड्या कोमट दूधात भिजत ठेवावे. काजू बदाम पिस्त्याचे काप करून घ्यावे. वेलची जायफळ ची पूड करून घ्यावी.
- 2
एका भांड्यामध्ये तयार चक्का साखर एकत्र करून चांगले मिक्स करून घ्या त्यामध्ये थोडे दूध घातले तरी चालेल चांगले एकत्र मिक्सर झाले की त्याचे दोन भाग करा एका भागामध्ये केसर मिश्रित दूध घाला आणि एका भागांमध्ये जायफळ वेलची पूड घाला दोन वेगवेगळ्या फ्लेवरचे श्रीखंड तयार होतात
- 3
नंतर काचेच्या ग्लासमध्ये दुधात बुडवून घेतलेले कुकीज खाली तळाशी ठेवा. त्यावर जायफळ, वेलची पूड घालून केलेले श्रीखंड घालून घ्या. नंतर त्यावर काजू बदाम घाला. परत त्यावर कुकीज ठेवून श्रीखंड घालून घ्या. त्यावर गुलाबाच्या पाकळ्या घालून घ्या. परत काजू बदाम घालून नंतर त्यावर केशर मिश्रित श्रीखंड घालून घ्या. वरतून केसर आणि पिस्ता ने सजवून घ्या.
- 4
अशा पद्धतीने सजवून ते ग्लास एक-दोन तासासाठी फ्रीजमध्ये सेट करायला ठेवा. नंतर ते सर्व करा. चवीला अतिशय उत्कृष्ट असा हा पदार्थ तयार होतो. फ्युजन असला तरी खूप छान लागतो नक्की करून बघा. "फ्युजन श्रिखंड तिरामिसू".....
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
-
श्रीखंड(Shrikhand recipe in marathi)
#GPRगुढी पाडवा म्हणून खास श्रीखंड हि रेसिपी केली Sushma pedgaonkar -
जायफळ युक्त श्रीखंड (Jaiphal yukt Shrikhand recipe in marathi)
#GPRक्रिमी भरपूर ड्रायफ्रुट्स आणि जायफळ असलेलं केशरयुक्त हे श्रीखंड पुरी बरोबर खाण्यामध्ये गुढीपाडव्याच्या दिवशी काही मजा औरच असते Charusheela Prabhu -
श्रीखंड (Shrikhand recipe in marathi)
#GPR#गुढीपाडवा स्पेशल रेसिपीज चॅलेजगुढीपाडवा हा मराठी नवीन वर्षाची सुरुवात असते कोणाकडे गुढी उभारली जाते पुरणपोळी, वेगवेगळ्या पध्दतीने गोडाचे पदार्थ करून नैवेद्य दाखवतात मी आज श्रीखंडचा बेत केला 😋😋😋 #श्रीखंड Madhuri Watekar -
केसर वेलची जायफळ श्रीखंड (kesar elaichi jayfal shrikhand recipe in marathi)
#gp सण म्हणजे गोड पदार्थ हवाच त्यात गुढीपाडवा हा उन्हाळ्यात येणार सण उष्णतेपासुन शरीराला थंडावा व आराम मिळावा म्हणुन श्रीखंडाचे सेवन केले तर शरीर ताजेतवाने होते. श्रीखंडातील दही, ड्रायफ्रुट, केसर, वेलची, जायफळ हे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहेत त्यातील कॅल्शियम दात मजबुत व निरोगी करतात. हाडे मजबुत होतात. " बी" जिवनसत्वामुळे चांगली झोप, नितळ त्वचा, मऊ लवचिक त्वचा, केसांची निगा, वजन कमी करण्यात फायदेशीर, इम्युनिटी वाढते. रोगप्रतिकार शक्ति वाढते. ड्रायफ्रुट ने शरीराला प्रोटीन मिळते. वारंवार भूक लागत नाही असे अनेक फायद्यामुळे ह्या दिवसात दही, श्रीखंड खाणे आवश्यकच आहे. चला तर अशा केसरयुक्त श्रीखंड कसे बनवायचे ते आपण बघुया Chhaya Paradhi -
राजभोग श्रीखंड (Rajbhog Shrikhand Recipe In Marathi)
#वीकेंड रेसिपी चॅलेंजउन्हाळ्यात गर्मीतून थंडावा मिळण्यासाठी श्रीखंड हा एक चांगला पर्याय आहे. त्या ड्रायफ्रूट घालून केलेलं राजभोग श्रीखंड आमच्याकडे सर्वांनाच आवडत. Shama Mangale -
श्रीखंड (shrikhand recipe in marathi)
#gp सणा सुदीला आपण घरी गोड धोड नक्कीच करतो त्यातून गुढीपाडवा मंटले की नवीन वर्षाची सुुरवात मग कोणी पुरण पोळी चा घाट घालते तर कोणी बासुंदी पूरी श्रीखंड, मी नेहमी घरीच श्रीखंड बनवते , एकदम फ्रेश मी आज घरच्या घरी कसे श्रीखंड बनवायचे दाखवणार आहे Smita Kiran Patil -
शेवई श्रीखंड कटोरी (shewai shrikhand katori recipe in marathi)
#रेसिपीबुक #week9 ह्या वीक मध्ये फ्युजन रेसिपी आहे काय करावं विचार करत होते..लक्षात आलं की बाहेरच्या देशातील पदार्थ व आपले पदार्थ मिक्स करून फ्युजन रेसिपी करण्या पेक्षा आपल्याच पदार्थ वापरून फ्युजन रेसिपी करूयात..श्रीखंड व शेवई आपल्या भारतात सर्व्ह च राज्यात करतात त्याचेच फ्युजन करून एक नवीन रेसिपी करण्याचा प्रयत्न केला आहे.. Mansi Patwari -
राजभोग श्रीखंड (raj bhogh shrikhand recipe in marathi)
#gp # ही माझी 200 वी रेसिपी आहे. म्हणून मला ही सादर करायला खुप आनंद होतोय. श्रीखंड महाराष्ट्र आणि गुजरात मधील पारंपरिक आणि लोकप्रिय पदार्थ आहे. सणासुदीला, विशेष समारंभाला श्रीखंड असतंच. श्रीखंड अनेक प्रकारची असतात. आज मी राजभोग श्रीखंड बनवलं आहे. ह्यात केशर, पिस्ता, बदाम भरपूर प्रमाणात घालायचे. Shama Mangale -
मसाला दूध (Masala dudh recipe in marathi)
#Cooksnapकोजागिरी पौर्णिमा म्हटलं तर छान चंद्राच्या मंद प्रकाशात गुलाबी अशा थंडीत गरमागरम असा मसाला दुधाचा ग्लास...... वाह काहीतरी मज्जाच वेगळी आहे. चला तर पाहूया हे सुमधुर केशरयुक्त दूध कस बनवतात. Deveshri Bagul -
श्रीखंड (Shrikhand recipe in marathi)
#gprगुडीपाडवा स्पेशल रेसीपी चॅलेंज बदाम पिस्ताकेशर श्रीखंड Shobha Deshmukh -
-
बदाम केसर श्रीखंड (badam kesar shrikhand recipe in marathi)
#gp #गूडीपाढवा स्पेशल ..होळीला पूळण पोळी झाली की बहूतेक ठीकाणी गूडीपाडव्याला श्रीखंड ,आमरस ,पूरी हा बेत असतो ....श्रीखंड बनवतांना त्याचा एक बेस बनवला की अनेक फ्लेवर मधे श्रीखंड बनवल जात ...मँगो फ्लेमवर ,सीताफळ फ्लेवर ,रताळी ,केशर पिस्ता, बदाम केशर अनेक प्रकारे ....मी बनवलेल श्रीखंड घरी बांधलेल्या गोड दह्याचा चक्का याचे आहे... Varsha Deshpande -
-
श्रीखंड (केशर पिस्ता वेलची) (Shrikhand recipe in marathi)
#GPR# श्रीखंड: आज मी गुडी पाडवा निमित्ते केशर युक्त पिस्ता वेलची श्रीखंड बनवले आहे Varsha S M -
राजेशाही श्रीखंड (Rajeshahi shrikhand recipe in marathi)
#GPR गुढीपाडवा रेसिपी चॅलेंज..."चैत्र पालवी फुटली दारी ,गुढीपाडव्याच्या पदार्थाची रंगत न्यारी."... खूपच छान...नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा ...श्रीखंड हा पदार्थ महाराष्ट्रात जास्त प्रसिद्ध आहे. Mangal Shah -
श्रीखंड वडी (shrikhand vadi recipe in marathi)
#gpमी आज गुढीपाडवा स्पेशल श्रीखंड वडी बनवली आहेमस्त आंबट गोड अशी श्रीखंड वडी खूप छान लागते.आणि अगदी कमी साहित्यात पटकन अशी होणारी रेसिपी आहे शिवाय तेल-तूप विरहित आहे.चला तर मग बघुया श्रीखंड वडी Sapna Sawaji -
श्रीखंड (Shrikhand Recipe In Marathi)
#GPRदसरा म्हटलं की छान रवाळ श्रीखंड हे समिकरण ठरलेलं आहे.छान घट्ट घरी बनवलेलं श्रीखंड जेव्हा जिभेवर येतं, तेव्हा केलेल्या मेहनतीचा आणि संयमाचे चीज होतं. Anushri Pai -
केशर पिस्ता श्रीखंड (Kesar pista shrikhand recipe in marathi)
#GPR#गुढी_पाडवा_रेसिपीज#गुढीपाडवा..🚩🎊🎉🌹#नूतन_वर्षाभिनंदन..😊💐🌹🙏उत्सव चैत्र चाहूलीचा..🚩नववर्षातील सोनेरी पानाचा..📝आनंदरुपी मांगल्याच्या विजयगुढीचा..⛳सुखरुपी आशेच्या गोड गाठीचा...🍭कडूआठवणींचे पाचन करणार्या कडुनिंबाचा...🌿कोरोनारुपी रावणावर मात केलेल्या आंतरिक उर्जेचा...⚡⭐ नवचैतन्यरुपी आम्र चैत्रपालवीचा...🌱कोकिळेच्या अलौकिक सुरांचा...🎵🎶🎼सुगंध आणि टवटवी देणार्या मोगर्याचा...🌼निराशेचा अंधार दूर करुन तेजोमयप्रकाश पसरवणाऱ्या सोनेरी किरणांचा...🌤️☀️वर्तमानातील क्षण भरभरुन जगण्याचा...🎊🎉भविष्यवाटांवर सुखसमृद्धी ,शांती,निरामय आयुरारोग्यरुपी गुढी उभारण्याचा...🧘🚩सकारात्मकतेच्या संकल्पाने नकारात्मक मळभावर मात करण्याचा...🏹🎯एकूणच मन सदैव उमेदीच्या,उत्साहाच्या जीवनरसाने काठोकाठ भरुन ठेवण्याचा..🌅🌟🤩---©® भाग्यश्री लेले*हिंदूनुतनवर्षाभिनंदन !**चैत्र शुध्द प्रतिपदा , गुढीपाडवा**आपणांस आणि आपल्या कुटुंबियांस हे नवीन वर्ष सुखाचे, समृद्धीचे, आणि भरभराटीचे जावो !**नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा !.🙏🏻🌹💐🌷🙏 Bhagyashree Lele -
-
श्रीखंड (Shrikhand Recipe In Marathi)
#CHOOSETOCOOKही एक पारंपारीक रेसीपी आहे व सगळ्यांना आवडणारी , कमी साहीत्य व सोपी अशी ही रेसीपी करुया. Shobha Deshmukh -
-
-
गुढीपाडवा विशेष - थंडाई व आम्रखंड श्रीखंड पुरी (thandai v amrakhand shrikhand puri recipe in marathi
#gpसर्व प्रथम कुकपॉडवरील सर्व सदस्यांना गुढीपाडवा व मराठी नववर्षाच्या मंगलमयशुभेच्छा!!🌹🌹🙏🙏🌷🌷🌼👣🚩भारतीय सण हे आपल्या समृद्ध परंपरेचे प्रतीक आहेत. आपण आपले सण खूप मोठ्या उत्साहात साजरे करतो. हे सण आपल्यामध्ये एकोपा निर्माण करण्यास मदत करतात.गुढी पाडवा हा सण हिंदू धर्मातील एक पवित्र आणि सौख्यदायक सण म्हणून साजरा केला जातो. गुढीपाडवा भारतामध्ये मुख्यतः महाराष्ट्रामध्ये अतिशय उत्साहाने साजरा केला जातो. गुढीपाडवा सण वेगवेगळ्या नावांनी संपूर्ण भारतात साजरा केला जातो.गुढीपाडव्याच्या दिवशी श्री ब्रम्हाने ह्या सृष्टीची निर्मिती केली होती. दुसऱ्या एका कथेनुसार गुढीपाडव्याच्या दिवशी राम चौदा वर्षे वनवास भोगून आणि रावणाचा पराभव करून अयोध्येत परतले होते. त्यावेळी अयोध्येतील जनतेने गुढ्या, तोरणे उभारून रामचे स्वागत केले होते. गुढीपाडव्याचा अजून एक इतिहास असा कि शालिवाहन नावाच्या कुंभाराच्या मुलाने शकांना पराभूत करण्यासाठी सहा हजार मातीच्या सैनिकांचे पुतळे तयार केले. त्या पुतळ्यांमध्ये प्राण निर्माण करून त्यांच्या साहाय्याने शकांचा प्रभाव केला. आणि ह्याच शालिवाहन राजाच्या नावाने नवीन कालगणना ज्याला शालिवाहन शक म्हणून ओळखले जाते त्याची सुरुवात करण्यात आली. गुढीपाडव्याचा इतिहास हा समृद्ध आणि पवित्र मानला जातो.याच पवित्र सणाच्या दिवशी मी आम्रखंड व थंडाई श्रीखंड पुरीचा बेत केला आहे .पाहूयात रेसिपी...😊 Deepti Padiyar -
-
-
शाही मसाले दूध (shahi masala dudh recipe in marathi)
"शाही मसाले दूध" कौजागरी म्हणजेच शरद पौर्णिमा,अर्थातच कोजागिरी पौर्णिमा म्हणजे जागरण....!!कोजागिरी पौर्णिमेच्या व्रतामध्ये मध्यरात्री लक्ष्मी देवीची आणि ऐरावतावर बसलेल्या इंद्र देवाची पूजा केली जाते. या दिवशी मध्यरात्री लक्ष्मी देवी चंद्रलोकातून भूतलावर अवतरते. आणि जागरण करणाऱ्या लोकांवर आपली प्रसन्नता व आशीर्वाद बरसवते. आणि सर्वांना उत्तम आरोग्य व धनसंपत्ती लाभो असा आशीर्वाद देते. शरद ऋतुमध्ये मसाला दूध आरोग्याला चांगले असते, असे आयुर्वेदात सांगितले आहे. त्यामुळे कोजागरीच्या दिवशी मसाला दूध पिण्याची प्रथा आहे. तर, या दिवशी चंद्र पृथ्वीच्या सर्वांत जवळ म्हणजे कोजागरी पर्वतालगत आलेला असतो. म्हणून आजच्या या मंगलदिनी आज मसाले दूध तर बनलेच पाहिजे नाही का....👌👌 Shital Siddhesh Raut -
केशरयुक्त बादशाही श्रीखंड (kesaryukt baad shahi shrikhand recipe in marathi)
#gp सर्व मैत्रिणी व कूकपॅड च्या परिवारास गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा ...."चैत्राची सोनेरी पहाट, नव्या स्वप्नांची नवी लाट..नवा आरंभ, नवा विश्वास, नव्या वर्षाची हीच तर खरी सुरुवात " .....गुढीपाडवा म्हणजे सृष्टीचा जन्मदिवस. ब्रह्मदेवाने या दिवशी सृष्टीची रचना केली अशी मान्यता हिंदू संस्कृतीत आहे .म्हणूनच दक्षिण भारतात हा सण उगादी म्हणून साजरा करतात. उगादी म्हणजेच युगाची सुरुवात.… गुढीपाडवा हा आनंदाचा ,विजयाचा, स्वागताचा पर्व... साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त . चैत्र महिन्यातील प्रतिपदेला हा सण साजरा केला जातो. विशेष करून महाराष्ट्रात या दिवसापासून नवीन वर्षाची सुरुवात होते. कुटुंबातील नातेवाईकांसोबत आनंदात गुढी उभी केली जाते व पूजा ही होते.साधारणपणे- या विशेष दिवशी पुरणाची पोळी आणि श्रीखंड बनवले जाते. सूर्योदयाला ,गुढीला, भगवान ब्रह्माला गोड-धोडाचे नैवेद्य दाखवला जातो. मी येथे केशरयुक्त बादशाही श्रीखंड बनवले आहे. कसे बनवायचे ते पाहूयात... Mangal Shah -
मसाला दूध (Masala Dudh Recipe In Marathi)
#ChooseToCook .. माझी आवडती रेसिपीकोजागिरीच्या निमित्ताने केलेले मसाला दूध.. मलाच काय, आमच्या घरी सर्वानाच आवडणारे Varsha Ingole Bele -
शाही तुकडा (shahi tukda recipe in marathi)
#cooksnap #कुकपॅड वरची 200 वी रेसिपी म्हणून काहीतरी गोड करावे मैत्रीणी साठी म्हणून चारूशीला प्रभू यांची रेसिपी cooksnap केली आहे.खुपच अप्रतिम झाली चारू रेसिपी.अर्थात थोडा बदल केला आहे फक्त मिल्कमेड ऐवजी जरा दुध जास्त आठवले नि पेढे टाकले त्यात. Hema Wane
More Recipes
टिप्पण्या