बनाना लाडोब (banana ladoba recipe in marathi)

Devyani Pande
Devyani Pande @cook_22433392
नागपुर

#रेसिपीबुक #week13
इंटरनॅशनल रेसिपीज
माझ्या स्वप्नातील बेट सेशेल्स!! या बेटा बद्दल ऐकून मनात कुतूहल निर्माण झाले, सुंदर असे निळे शांत समुद्राचे पाणी,पांढरी शुभ्र किनारपट्टी, सगळी कडे दाट हिरवळ,प्रूदषणा चा कुठे लवलेशही नाही अशा निसर्गरम्य शांत ठिकाणी आमच्या लग्नाचा पंचविसावा वाढदिवस साजरा करावा अशी माझी मनापासून इच्छा आहे.
जिथे आपल्याला जायचे असते तिथली आपण घेतोच. परदेशी कुठे गेले की शक्योतोवर मी नॉन व्हेज टाळते,मग आपली व्हेज पदार्थांची शोध मोहीम सुर होते ती व्हेज पदार्थांमाहितीसाठीची भटकंती आज मी थांबवणार आहे.
माझी मुलगी होटेल मैनेजमेंट करतेय तिच्या वर्गातील काही स्टूडेंटस सेशेल्स ला इंटर्नशिप करायला गेले होते त्यांच्या कडूनच मला बनाना लाडोब ही रेसिपी समजली. साधी,सरळ ,सोपी व घरी उपलब्ध असलेल्या सामग्रीतूनच हि रेसेपी बनते.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

25 मिनिट
3 सर्व्हिंग्ज
  1. 5केळी
  2. 50 ग्रॅमसाखर किंवा ब्राउन साखर
  3. 100 ग्रॅमनारळाचे दुध
  4. 1/4 टीस्पूनवेलची पूड
  5. 1/4 टीस्पूनजायफळ पावडर
  6. 1 टीस्पूनव्हॅनिला इसेन्स
  7. 2-3कॉफ़ी बीन्स (ऑप्शनल)

कुकिंग सूचना

25 मिनिट
  1. 1

    प्रथम सर्व सामग्री एका जागी करुन घ्या. केळाचे लांब दोन व परत दोन असे चार भाग करुन घ्या. आता एका खोल भण्ड्यात कापलेले केळी घेउन गैस वर ठेवा.

  2. 2

    अत्ता त्यात बाकी सामग्री एक एक करुन घाला साखर, वेलची व जायफळ पूड, कॉफ़ी बीन्स, दालचीनी पावडर किंवा स्टिक, व्हॅनिला इसेन्स घालुन साखर विर्घळे पर्यंत उकळून घ्या.

  3. 3

    साखर विर्घ्ल्यावर त्यात नारळाचे दुध घालुन एक दोन उकळी काढुन घ्या व थंड झाले की डैज़र्ट म्हणून सर्व्ह करावे बनाना लाडोब. ब्राउन शुगर घातली की रंग छान ब्राउन येतो (मला बाजारत ब्राउन शुगर न मिळाल्याने साधी साखरघातली).

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Devyani Pande
Devyani Pande @cook_22433392
रोजी
नागपुर

Similar Recipes