बटरस्टॉक्ट नानखटाई (butterscotch nankhatai recipe in marathi)

Jyoti Gawankar
Jyoti Gawankar @cook_22245176
मुंबई

#नानखटाई #सप्टेंबर #week4
नानकटाई म्हटलं की लहानपणाच्या आठवणी जाग्या होतात. माझी आई लहानपणी नान खटाई चे पीठ घरात बनवायची. दुपारच्या वेळेस किचनच्या खिडकीमधून खूप छान ऊन घरात यायचं मग त्या वेळेला मम्मी लोणी आणि साखर पराती मध्ये ठेवून मिक्स करत बसायचे कारण नान खटई खूप खुसखुशीतहोण्यासाठी पहिलं लोणी खूप छान फेटून घ्यायला लागायचे. घरात आमच्याकडे तेव्हा अशी कुठलीही सुविधा नव्हती की ज्यात आम्ही नान खटाई घरात बेक करू शकत होतो. पण आमच्याकडे बोरिवली स्टेशनला त्या वेळेला एक बेकरी होती, तिकडे आम्ही पीठ तयार करून घेऊन जायचं आणि मग तो बेकरी वाला आम्हाला ट्रे घ्यायचा आणि मग त्यावर आम्ही पिठाचे छोटे छोटे गोळे करून ठेवायचं खूप मज्जा यायची तेव्हा मम्मी बरोबर जायला आणि तिथे उभे राहून नानकटाई करायला. आजही नान खटाई करताना पहिला फोन मम्मीला केला आणि मग नानकटाई करायला घेतली. दोघींना ते जुने दिवस आठवताना खूप मज्जा आली.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

35 मिनिटे
4 माणसे
  1. 130 ग्रॅममैदा
  2. 60 ग्रॅमबेसन
  3. 30 ग्रॅमबारीक रवा
  4. 80 ग्रॅमसाखर
  5. चिमुटभर मीठ
  6. 115 ग्रॅमतूप
  7. 2 टेबलस्पूनबटरस्कॉच नट्स
  8. 1/2 टीस्पूनबटरस्कॉच ईसेन्स

कुकिंग सूचना

35 मिनिटे
  1. 1

    सर्वप्रथम गॅस वर कडाई मध्ये खाली मीठ टाका, स्टँड ठेवून झाकण लावून दहा मिनिटं कडे छान गरम होऊ द्यावी. आता एका बाऊल मध्ये तूप आणि साखर एकत्र मिळून एक पाच मिनिटात छान फेटून घ्या. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही तूप थोडे वितळून घेऊ शकता.

  2. 2

    तूप साखर एकत्र मिक्स झाले की मग चाळणी मध्ये मैदा बेसन चाळून घ्या त्यामध्ये रवा मिक्स करा. तुमचा रवा जर जाड असेल तर मिक्सरला थोडा वाटून घ्या आणि त्याची पावडर करून घ्या. मग त्यामध्ये साखर बटरस्कॉच इसेन्स आणि बटर स्कॉच नट्स छा चुरा मिक्स करा.हाताने छान पीठ मळून घ्या तुम्हाला जर पिठाचा गोळा होत नसेल तर थोडे अधिक तूप टाकून त्याचा छान गोळा बनवून घ्या.

  3. 3

    त्या गोळ्याचे आपल्या आवडीनुसार छोटे छोटे गोळे करून घ्या हातावर थोडे दाबून त्यावर केलेला चुरा थोडा थोडा लावून घ्या म्हणजे ते खाताना दाताखाली थोडं नटी आणिा क्रची लागेल. प्लेटमध्ये थोडे तूप लावून नान खटाई त्यामध्ये थोड्या अंतरावर ठेवून 30 ते 35 मिनिटं कढईमध्ये अगदी मंद आचेवर ती छान शिजू द्यावे. पस्तीस मिनिटानंतर झाकण उघडून पाहावे झाले आहेत की नाही ते आणि थंड करून सर्व्ह करावे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Jyoti Gawankar
Jyoti Gawankar @cook_22245176
रोजी
मुंबई

टिप्पण्या

Similar Recipes