राजस्थानी शाही समोसा (shahi samosa recipe in marathi)

Supriya Thengadi
Supriya Thengadi @cook_25492002
Mumbai

#पश्चिम #राजस्थान

राजस्थान म्हटले की डोळ्यासमोर येते अगदी रंगबेरंगी वातावरण ...त्यांच्या रंगीत चणिया चोळी पासून तर वेगवेगळ्या रंगसंगती असलेल्या डिशेस पर्यंत...आणि आजकाल तर सगळीकडेच सघळे राजस्थानी पदार्थ मिळतात.
तर असाच राजस्थान चा स्पेशल फेमस शाही समोसा...तर या शाही समोस्याची रेसिपी मी सांगते आहे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

45मिनिटे
4 सर्व्हिंग्ज
  1. 2 वाटीमैदा
  2. 6बटाटे उकडलेले
  3. 1 चमचाजिरे,ओवा,सोप,धणे
  4. 2चमचेआले मिरची लसूण पेस्ट
  5. 1 चमचाआमचूर पावडर
  6. 1 चमचागरम मसाला
  7. 1 चमचाहळद
  8. 2 चमचेतिखट
  9. चविनुसार मीठ
  10. तळण्याकरता तेल
  11. 2 चमचेतेल किवा डलडा मोहन करीता
  12. 3 चमचेथोडे काजू,बदाम,किसमिस

कुकिंग सूचना

45मिनिटे
  1. 1

    प्रथम सगळे साहीत्य काढून घ्यावे.

  2. 2

    आता मैदा घेऊन त्यात ओवा,जिरे मीठ व तेल orडालड्याचे मोहन घालावे.

  3. 3

    आता याचा घट्टसर गोळा भिजवून घ्यावा.व दहा मिनिटे ठेऊन द्यावा.

  4. 4

    आता भाजी साठी कढईत तेल गरम करुन त्यात जिरे,आले मिरची पेस्ट,धणे,सोप,तिखट,हळद घालून फोडणी करुन घ्यावी.व या फोडणीत उकडलेले बटाटे घालून भाजी करुन घ्यावी.

  5. 5

    आता या भाजित मीठ,आमचूर पावडर,गरम मसाला,काजू,बदाम,किसमिस घालावे.व एक छान वाफ येउ द्यावि.वरून लिंबाचा रस घालावा.

  6. 6

    आता भाजी झाल्यानंतर आपण समोस्याचे वरचे कव्हर करायला घेउ.आता मैदाचा एक लिंबाएवढा गोळा घेऊन त्याला लाटून मधून कापून दोन समान भाग करावे.

  7. 7

    आता या लाटलेल्या पारीचा त्रिकोणी आकार करून त्यात भाजी भरून त्याला समोस्याचा आकार द्या.

  8. 8

    आता सगळे समोसे तयार झाल्यावर गरम तेलात मंद आचेवर खूसखूशित तळून घ्यायचे.

  9. 9

    आता आपले सगळे शाही समोसे तळून तयार आहेत.

  10. 10

    आता छान गरम गरम समोसे सर्व्ह करा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Supriya Thengadi
Supriya Thengadi @cook_25492002
रोजी
Mumbai

टिप्पण्या

Similar Recipes