खोबरे डाळ्याची चटणी (Khobre Dalyachi Chutney Recipe In Marathi)

rucha dachewar
rucha dachewar @cook_26177680

आपल्या महाराष्ट्रात जेवणामध्ये चटणी,कोशिंबीर, सलाद जेवणामध्ये ठेवायची पद्धत आहे. जेवणामध्ये चटण्या नसेल तर जेवणाची प्लेट चांगली वाटत नाही.आज मी सुके खोबरे आणि दलिया ची चटणी दही टाकून करत आहे. ही चटणी,डोसे, वडे,इडली, आप्पे किंवा कोणत्याही पराठ्या बरोबर खायला देता येते. व बनायला पण खूप सोपी आहे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

20  मिनिटे
3 सर्व्हिंग्ज
  1. 1 वाटीडाळ्या
  2. 1 वाटीसुके खोबरे
  3. 1 वाटीदही
  4. 4पाच हिरव्या मिरच्या
  5. 1/2 वाटीकोथिंबीर
  6. 1 टेबलस्पूनजीरे
  7. 1 टेबलस्पूनमोहरी
  8. चवीपुरतं मीठ
  9. चिमुटभर हिंग
  10. 2-3कढीपत्त्याची पाने
  11. 1 टेबलस्पूनतेल
  12. चिमुटभर साखर

कुकिंग सूचना

20  मिनिटे
  1. 1

    प्रथम चटणी साठी लागणारे सर्व साहित्य एकत्र ठेवावे. कढई मध्ये थोडे तेल टाकून सुके खोबरे,जीरे पूड,मीठ,कोथिंबीर, मिरच्या दलिया भाजून घ्यावा.

  2. 2

    वरील सर्व साहित्य भाजून झाल्यावर थंड होण्या करिता प्लेट मध्ये काढून घ्यावे. व मिक्सर मध्ये वाटून घ्यावे.

  3. 3

    कढई मध्ये तेल गरम करायला ठेवावे. तेल गरम झाल्यावर मोहरी टाकावी.मोहरी तडतडल्यावर हिंग टाकावे आणि कडीपत्ता टाकावा.

  4. 4

    मिक्सर मध्ये चटणी वाटून झाल्यावर.चटणी बाउल मध्ये काढून घ्यावी. व चटणी मध्ये थोडे दही व किंचित साखर टाकावी.गरम केलेल्या तेलाचा तडका थोडा थंड झाल्यावर चटणी वर टाकावा. खोबरे दलियाची चटणी डोसे,इडली,वडे, आप्पे या सोबत खाण्यासाठी सर्व्ह करता येईल.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
rucha dachewar
rucha dachewar @cook_26177680
रोजी

Similar Recipes