मस्तानी चाट (mastani chat recipe in marathi)

Devyani Pande
Devyani Pande @cook_22433392
नागपुर

#GA4#week6
मी चाट हा क्लू घेउन ही रेसिपी तैयार केली...
हिरव्या कंच रंगानी आछद्लेले हा विड्याचा वेल जर तूम्हाला सारखा आकर्षित करत असेल तर माझ्या मधल्या शेफ ला कसे राहवणार..तसे ही मी विड्या च्या पानांची बरीच हट्के रेसिपी करुन दाखवल्या आहेत तर मग आज त्याच पानांचा उपयोग चाट मधे कसा करते ते पहा...

मस्तानी चाट (mastani chat recipe in marathi)

#GA4#week6
मी चाट हा क्लू घेउन ही रेसिपी तैयार केली...
हिरव्या कंच रंगानी आछद्लेले हा विड्याचा वेल जर तूम्हाला सारखा आकर्षित करत असेल तर माझ्या मधल्या शेफ ला कसे राहवणार..तसे ही मी विड्या च्या पानांची बरीच हट्के रेसिपी करुन दाखवल्या आहेत तर मग आज त्याच पानांचा उपयोग चाट मधे कसा करते ते पहा...

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30 मिनीटे
4 सर्व्हिंग्ज
  1. 250 ग्रॅमबेसन
  2. 2उकडलेले बटाटे
  3. 15विड्याची पानं
  4. 1बारीक चिरलेला कांदा
  5. 1 टेबलस्पूनकोथींबीर
  6. 1 टीस्पूनतिखट
  7. 1/2 टीस्पूनचाट मसाला
  8. 1 टीस्पूनमीठ
  9. 2 टेबलस्पूनगोड चटनी
  10. 2 टेबलस्पूनपुदीना चटनी
  11. 2 टेबलस्पूनगोड दही
  12. 2 टेबलस्पूनबारिक शेव
  13. 300 ग्रॅमतेल तळण्यासाठी
  14. पाणी

कुकिंग सूचना

30 मिनीटे
  1. 1

    प्रथम विड्या ची पानं धूऊन पुसुन घ्या. उकडलेला बटाटा स्मश करुन त्यात तिखट मीठ कोथींबीर घालुन बटाटा मसाला करुन घ्या.

  2. 2

    गैस वर कढई ठेऊन त्यात तेल गरम करण्यास ठेवावे. व एकीकडे आत्ता विड्याचे पान घेउन त्याचे देठ काढुन देठाचा भाग बाहेर येईल असा कोन करावा व त्यामधे बटाटा मसाला भरावा व तूथपिक नी फोटोत दाखवल्या प्रमाणे बन्द करा. आत्ता बेसन मधे थोडी हळद व मीठ घालुन घट्ट बैटर बनवून त्या मधे ते स्टफ केलेले विड्याचे पान डिप करुन तेलात सोडून तळून घ्यावे.

  3. 3

    ह्या तळलेल्या विड्याचे हवे तसे काप करुन घ्या (तूथपिक काढायला विसरु नक्का). आत्ता जसे आपण दही चाट किंवा पापडी चाट सर्व्ह करतो तसे करावे.. प्रथम मी एक साडेच विड्याचे पान भज्या सारखे तळून घेतले होते ते प्लेट मधे खाली ठेवले. मग त्यावर कापलेले स्टफड विड्याचे कापलेले भाग ठेवावा व त्या वर दही, गोड चटनी, पूदिना चटनी, कांदा, कोथंबीर, चाट मसाला,तिखट, मीठ घालुन वरुन शेव भुरभुरावी व आलेल्या पाहुण्यांना ही मस्तानी चाट खाऊ घालुन आश्चर्यचकित करावे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Devyani Pande
Devyani Pande @cook_22433392
रोजी
नागपुर

Similar Recipes