फुलकोबी-हिरवी मेथी भाजी (fulgobi methi bhaji recipe in marathi)

Dilip Bele
Dilip Bele @dilip_0104

#पौष्टिक भाजी#हिरवी मेथी व फुलकोबी एकञित केलेली भाजी जीभेला वेगळी चव देते.जेवणात रंगत येते .आपण सुध्दा ही भाजी करून जेवणाचा आनंद घ्यावा .

फुलकोबी-हिरवी मेथी भाजी (fulgobi methi bhaji recipe in marathi)

#पौष्टिक भाजी#हिरवी मेथी व फुलकोबी एकञित केलेली भाजी जीभेला वेगळी चव देते.जेवणात रंगत येते .आपण सुध्दा ही भाजी करून जेवणाचा आनंद घ्यावा .

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

20 मिनीट
2 सर्व्हिंग्ज
  1. 200 ग्रॅम फुलकोबी
  2. 100 ग्रॅम हिरवी मेथी भाजी
  3. 1कांदा
  4. 1.5 टिस्पून लसूण अद्रक पेस्ट
  5. 1 टेबलस्पूनकोथिंबीर
  6. 1 टिस्पून लाल मिरची पावडर
  7. 1 टिस्पून धने पावडर
  8. 1/4 टिस्पून गरम मसाला
  9. 1/2 टिस्पून गुळ
  10. चवीनुसार मीठ
  11. 1.5 टेबलस्पूनतेल
  12. 50 मिली पाणी
  13. 1टोमॅटो

कुकिंग सूचना

20 मिनीट
  1. 1

    भाजी साठी लागणाऱ्या भाज्या बारीक चिरून घ्यावेत.भाजीला लागणारे इतर घटक एकाठिकाणी एकत्र करावे.

  2. 2

    मंद गॕसवर कढई ठेवावी.त्यात तेल टाकून गरम झाल्यानंतर कांदा टाकावा ब्राऊन झाल्यानंतर लसूण अद्रक पेस्ट तिखट हळद धने पावडर मसाला मीठ टाकावे.एकत्र परतून घ्यावे.

  3. 3

    कढईतील मिश्रणात मेथी व गुळ टाकावा.50 मिली पाणी टाकून एक उकळी येऊ ध्यावी.

  4. 4

    कढईत टोमॅटो व फुलकोबी टाकावी. चांगल्या प्रकारे परतून घ्यावे. झाकण ठेवून शिजू ध्यावे.

  5. 5

    भाजी शिजल्यावर पाॕटमध्ये काढावी. कोथिंबीर टाकून सर्व्ह करावी.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Dilip Bele
Dilip Bele @dilip_0104
रोजी

Similar Recipes