विदर्भ स्पेशल (तूर डाळ पालक) (toor dal palak recipe in marathi)

Swati Pote
Swati Pote @cook_24317961

#GA4
#वीक१३
#क्लू-तुवरतूर
#डाळभाजी(तूरडाळपालक)
पालक डाळ भाजी हा विदर्भातील स्पेशल पदार्थ आहे ही भाजी विशेषतः सणांच्या वेळी मंदिरात भंडाऱ्याच्या वेळी, घरगुती
समारंभ आणि लग्न कार्यात तर खूपच फेमस आहे. पौष्टिक आणि चवदार खतरा डाळ भाजी (तूर डाळ पालक भाजी) भाकरी, पोळी, भातासोबत खाऊ शकता.

विदर्भ स्पेशल (तूर डाळ पालक) (toor dal palak recipe in marathi)

#GA4
#वीक१३
#क्लू-तुवरतूर
#डाळभाजी(तूरडाळपालक)
पालक डाळ भाजी हा विदर्भातील स्पेशल पदार्थ आहे ही भाजी विशेषतः सणांच्या वेळी मंदिरात भंडाऱ्याच्या वेळी, घरगुती
समारंभ आणि लग्न कार्यात तर खूपच फेमस आहे. पौष्टिक आणि चवदार खतरा डाळ भाजी (तूर डाळ पालक भाजी) भाकरी, पोळी, भातासोबत खाऊ शकता.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

40 मिनिट
४ मेंबर्स
  1. साहित्य:
  2. 1पाव पालक बारीक चिरलेला
  3. 1/2 वाटीतुरीची डाळ
  4. 1 वाटीबारीक चिरलेला कांदा
  5. 1 वाटीटोमॅटो
  6. 3हिरव्या मिरच्या बारीक चिरलेल्या
  7. 8-9 लसूण पाकळ्या चिरून
  8. 1 टीस्पूनलाल तिखट
  9. 1/4 टीस्पूनहळद
  10. 1/2 टेबलस्पून शेंगदाणे भाजलेले
  11. 1/2 टीस्पूनधनेपूड
  12. 1/2 टीस्पूनजिरेपूड
  13. 1 टीस्पूनगरम मसाला
  14. मीठ, चवीप्रमाणे
  15. 2 टेबलस्पूनतेल
  16. फोडणीसाठी
  17. १/२ टीस्पून मोहरी,
  18. 1/2 टीस्पूनजिर
  19. 1/2हिंग
  20. पाणी गरजेनुसार

कुकिंग सूचना

40 मिनिट
  1. 1

    स्टेप १: कुकरमध्ये पाणी घालून डाळ शिजवून घ्या. कुकर थंड झाला कि डाळ घोटून घ्या व त्या घोटलेल्या डाळीत चिरलेला पालक टाकून रवीने परत घोटून घ्या.

  2. 2
  3. 3
  4. 4

    स्टेप २: कढईत तेल गरम करा. त्यात मोहरी जीरे घालून तडतडू द्या. नंतर लसूण फोडणीला घाला. कांदा परतून घ्या.

  5. 5

    स्टेप ३: २-३ मिनिटे कांदा आणि भाजलेले शेंगदाणे परता मग त्यात टोमॅटो हिंग हळद, लाल तिखट, धने-जिरेपूड, गरम मसाला घालून परता.

  6. 6

    स्टेप ४: घोटलेली डाळपालक घाला. मीठ आणि घालून ढवळा. डाळ पालक खूप घट्टसर असेल तर थोडेसे पाणी घालून पात्तळ करा. ५ मिनिटे उकळत ठेवा. तयार आहे विदर्भ स्पेशल चवदार, हिरवीगार,पौष्टिक,खतरा डाळ भाजी (तूर डाळ पालक)

  7. 7

    स्टेप ६: गरम गरम डाल पालक भातावर किंवा पोळी बरोबर सर्व्ह करा. कुकरमध्ये डाळीबरोबर शिजवल्यास त्यातली जीवनसत्त्वं कमी होतात. डाळ-पालक जेवायच्या खूप आधी करून ठेवले तर न झाकता तसेच ठेवा. म्हणजे पालकाचा रंग बदलणार नाही.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Swati Pote
Swati Pote @cook_24317961
रोजी

Top Search in

टिप्पण्या

Similar Recipes