पनीर बिर्याणी (paneer biryani recipe in marathi)

" पनीर बिर्याणी"
पनीर ची कोणतीही रेसिपी मला खुप आवडते... आणि माझ्या मिस्टरांना पनीर आवडत नाही त्यामुळे पनीर रेसिपी बनवली की त्यांच्यासाठी वेगळे काहीतरी करावे लागते, नाहीतर मग...मग काय भांडण...😂
बिर्याणी शिजल्याबरोबर पतंग बसली.. त्यामुळे सर्व्ह केलेल्या जाळीचा फोटो नाही काढता आला..
पनीर बिर्याणी (paneer biryani recipe in marathi)
" पनीर बिर्याणी"
पनीर ची कोणतीही रेसिपी मला खुप आवडते... आणि माझ्या मिस्टरांना पनीर आवडत नाही त्यामुळे पनीर रेसिपी बनवली की त्यांच्यासाठी वेगळे काहीतरी करावे लागते, नाहीतर मग...मग काय भांडण...😂
बिर्याणी शिजल्याबरोबर पतंग बसली.. त्यामुळे सर्व्ह केलेल्या जाळीचा फोटो नाही काढता आला..
कुकिंग सूचना
- 1
पॅनमध्ये थोडे तूप घालून काजू सोनेरी रंगावर तळून घ्यावे...व उभा कापलेल्या कांद्याचे काप सोनेरी रंगावर, कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यावेत
- 2
पनीर मॅरिनिट करून घ्यावे.. एक कप दही, दोन तीन उभ्या कापलेल्या हिरव्या मिरच्या,एक टीस्पून बिर्याणी मसाला, हळद अर्धा टीस्पून, धनेपूड एक टीस्पून,मीठ चवीनुसार, कसुरी मेथी, बारीक चिरलेली कोथिंबीर, पुदीना बारीक तुकडे करून,तळलेला कांदा थोडासा कुस्करून, एक टीस्पून लाल तिखट, एक टेबलस्पून तेल घालून हे जिन्नस सगळे मिक्स करावे व त्यात पनीर घालून चांगले मिक्स करावे..व अर्धा तास झाकून ठेवावे..
- 3
पातेल्यात दोन टेबलस्पून साजूक तूप घालून जिरं घालावं व कांदा घालून परतून घ्यावा... बिर्याणी मसाला घालून एक मिनीटभर परतुनी घ्यावे.टाॅमेटो चिरलेले, एक टेबलस्पून धनेपूड, दोन हिरव्या मिरच्या उभ्या कापलेल्या, हळद,आलेलसुण पेस्ट,लाल तिखट हे सगळे जिन्नस एकत्र मिसळून घ्यावे.. पाणी घालावे आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालावी.. मीठ घालून दोन तीन मिनिटे शिजवुन घ्यावे..
- 4
बासमती तांदूळ धुवून अर्धा तास भिजवून घ्या.. एका पॅनमध्ये पाणी घालून एक टेबलस्पून तूप घालावे,काळीमिरी, लवंग दालचिनी,चक्रीफुल,तेजपत्ता, चवीनुसार मीठ घालून त्यात भिजवलेला तांदूळ घालून तो सत्तर टक्के शिजवून घ्यावा...व नंतर उपसुन परातीमध्ये काढून घ्यावे..
- 5
पातेल्यातील ग्रेव्ही गॅसवर ठेवून त्यात आधी भाताची लेअर लावावी.त्यावर एक टीस्पून तुप घालून त्यावर मॅरिनिट केलेल्या पनीर ची लेअर लावावी..परत उरलेल्या भाताची लेअर लावावी..व कोथिंबीर,तुप,तळलेला कांदा हे घालून केशर दुध घालावे....भात शिजवलेले उरलेले पाणी चार पाच टेबलस्पून घालून वर काजु घालावे आणि पाच मिनिटे मिडीयम गॅसवर शिजू द्यावे व नंतर अर्धा तास मंद आचेवर शिजू द्यावे...
- 6
गरमागरम तय्यार बिर्याणी सर्व्ह करावी
Similar Recipes
-
पनीर बिर्याणी (paneer biryani recipe in marathi)
#brशाकाहारी जेवणामध्ये पनीर हा त्याचा एक अविभाज्य घटक झाला आहे पनीर पासून खूप सगळे पदार्थ बनवता येतात मी आज पनीर बिर्याणीची रेसिपी दाखवणार आहेव्हेज बिर्याणी मध्ये पनीर बिर्याणी माझी फेवरेट आहे अचानक पाहुणे आल्यावर ही पटकन बनवता येते घरच्या साहित्यातून झटपट बनवता येणारी ही पनीर बिर्याणी ची रेसिपी मी तुम्हाला सांगणार आहे Smita Kiran Patil -
पनीर बिर्याणी (paneer biryani recipe in marathi)
#br बिर्याणी स्पेशलअंडा बिर्याणी, चिकन बिर्याणी माझी करून झाली.म्हणून मी आज पनीर बिर्याणी केली. खूप छान झालेली.तुम्ही नक्की करून बघा. Sujata Gengaje -
-
पनीर बिर्याणी (paneer biryani recipe in marathi)
#br बिर्याणी रेसिपी कॉन्टेस्ट साठी चिकन बिर्याणी, मटण बिर्याणी, एग बिर्याणी, वेज बिर्याणी आणि पनीर बिर्याणी. यातील मी आज पनीर बिर्याणी ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
पनीर बिर्याणी (paneer biryani recipe in marathi)
#br बिर्याणी आणि ती पण कोळस्याचा स्मोकी फ्लेवर दिलेली पनीर बिर्याणी फारच छान लागते 😋 Rajashri Deodhar -
पनीर मखनी दम बिर्याणी (paneer makhani dum biryani recipe in marathi)
#brबिर्याणीच्या असंख्य प्रकारपैकी ,वेज बिर्याणी मधील माझी ही आवडती बिर्याणी .😊 पनीर मखनीच्या लाजवाब ग्रेव्हीचं काॅम्बिनेशन असलेली ही बिर्याणी चवीला खूपच रूचकर लागते ...😋😋पाहूयात रेसिपी. Deepti Padiyar -
पनीर बिर्याणी(paneer biryani recipe in marathi)
#बिर्याणीया आठवड्याची थीम आली & विचार केला व्हेज बिर्याणी त नवीन काय ??? पनीर घरात होते...विचार केला चिकन मॅरीनेट करून करतात तसे पनीर मॅरिनेट करून बिर्याणी करून पाहू...मग काय लगेच काम सुरू...फक्त पनीरच वापरणार पण मला फ्लाॅवर आवडतो...म्हणून तो पण वापरला...बिर्याणी खुप छान झाली...एखादा पदार्थ करावा & घरच्यांनी मनसोक्त खावा...यासारखे समाधान नाही. Shubhangee Kumbhar -
पनीर बिर्याणी (Paneer Biryani Recipe In Marathi)
पटकन व अतिशय टेस्टी होणारी पनीर बिर्याणी सगळ्यांनाच आवडेल Charusheela Prabhu -
तंदुरी पनीर बिर्याणी (tandoori paneer biryani recipe in marathi)
#br बिर्याणी म्हटल्यावर प्रत्येकाच्या तोंडाला पाणी सुटतच बिर्याणी व्हेज नॉनव्हेज दोन्ही प्रकाराने केल्या जातात आज मी तुम्हाला तंदुरी पनीर बिर्याणी कशी बनवायची त्याची रेसिपी दाखवते चला तर बघुया Chhaya Paradhi -
पनीर दम बिर्याणी (paneer dum biryani recipe in marathi)
#br आज मी तुमच्या बरोबर पनीर दम बिर्याणी ची रेसिपी शेअर करतेय. ही रेसिपी माझ्या दोन्ही मुलांची खूप आवडते आहे. तरी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते नक्की सांगा🙏🥰Dipali Kathare
-
शाही स्मोकी पनीर बिर्याणी (shahi smoky paneer biryani recipe in marathi)
बिर्याणी मग ती व्हेज असो किंवा नॉनव्हेज सगळेच आवडीने खातात.आज मी शाही पनीर बिर्याणी केली आहे. ही बिर्याणी चवीला खूपच छान लागते आणि स्मोक दिल्यामुळे तर तिच्या चवीत अजूनच भर पडते.रेसिपी बघुयात😊 Sanskruti Gaonkar -
पनीर दम बिर्याणी (paneer dum biryani recipe in marathi)
#brहैदराबादी स्पेशल पनीर दम बिर्याणी..!!! kalpana Koturkar -
हॉटेल स्टाईल पनीर दम बिर्याणी (hotel style paneer dum biryani recipe in marathi)
#brहॉटेल प्रमाणे ही बिर्याणी खूप सुंदर होते. तर चला पाहू आपण हॉटेल स्टाईल पनीर दम बिर्याणी... Mrs. Snehal Rohidas Rawool -
व्हेज बिर्याणी (veg biryani recipe in marathi)
मला बिर्याणी खुप आवडते,मग ती व्हेज असो वा नाॅनव्हेज.कुकपॅडमुळे खुप नवीन काहीतरी शिकायला मिळाले. Anjali Tendulkar -
मटण बिर्याणी (mutton biryani recipe in marathi)
#cpm8week 8कूकपॅड रेसिपी मॅगझीनसाठी दिलेल्या "मटण बिर्याणी" या कीवर्डच्या निमित्ताने मी "मटण बिर्याणी" बनविली. माझ्या लहानपणी आमच्या शेजारी मुस्लिम, साऊथ इंडियन, ख्रिस्ती आणि आम्ही मराठी असे एकमेकांचे शेजारी होतो. त्यामुळे जवळपास एकमेकांच्या पदार्थांची देवाणघेवाण होत असे. आमचे शेजारी मुस्लिम असून देखील त्यांच्या मुलांना माझ्या आईची पुरणपोळी, साबुदाणा खिचडी, कांदेपोहे आणि असे बरेच आपले महाराष्ट्रयीन पदार्थ खूप आवडत. त्यामुळे त्या भाभीनी ते पदार्थ माझ्या आईकडून शिकून घेतले. आणि आमच्याकडे मटण बिर्याणी बनवायची असली की, मग भाभीचा मोठा पुढाकार असे. सुरीने कांदा पातळ चिरण्यापासून, गर्निशिंगसाठी फ्राय केलेला कांदा आणि बिर्याणी फोडणीला टाकण्याची सर्व जबाबदारी त्या भाभीचीच असे. तश्या भाभी माझ्या आईच्याच वयाच्या. पण सगळ्या लहान - थोर मंडळींची त्या भाभी होत्या. कालांतराने सर्वांची घरे बदलली पण अजूनही त्यांची बिर्याणी आणि त्या स्मरणात आहेत. 😊 अजूनही आम्ही एकमेकांनची विचारपूस करतो. असो...तर त्या भाभी करत असलेली सोपी व चविष्ट"मटण बिर्याणी" मी शेअर करत आहे. Manisha Satish Dubal -
शाही मटर पनीर बिर्याणी(shahi mutter paneer biryani recipe in marathi)
#बिर्याणीबिर्याणी आमच्या घरी सर्वाच्या आवडीची म्हणून आज पनीर बिर्याणी. Nilan Raje -
आलू बिर्याणी (aloo biryani recipe in marathi)
#GA4 #Week16Biryani या क्लूनुसार मी आलू बिर्याणी ही रेसिपी पोस्ट केली आहे. Rajashri Deodhar -
शाही एग बिर्याणी (Shahi Egg Biryani Recipe In Marathi)
अतिशय चमचमीत व टेस्टी पौष्टिक अशी ही बिर्याणी आहे Charusheela Prabhu -
प्रॉन्स बिर्याणी (Prawns Biryani Recipe In Marathi)
प्रॉन्स बिर्याणी अर्थातच घरातील सर्वांना आवडणारी. नेहमीच पूर्ण जेवण करण्यापेक्षा एक रेसिपी अशी आहे की जी परिपूर्ण मेजवानीचा आस्वाद घडवते. Anushri Pai -
कोळंबी बिर्याणी (kolambi biryani recipe in marathi)
#wdrसंडे वीकएंड म्हंटला कि घरातले सगळेच काहीतरी चमचमीत आणि झणझणीत बनव म्हणून फर्माईश करतात. म्हणूनच वीकएंड स्पेशल म्हणून कोलंबी बिर्याणी चा बेत केला. खूप छान झाली बिर्याणी. रेसिपी खाली देत आहे. Poonam Pandav -
पनीर मखनी दम बिर्याणी (paneer makhani dum biryani recipe in marathi)
#बिर्याणीआज शुक्रवार असला तरी वटपौर्णिमा असल्याने शाकाहारी मेनू बनविण्याचे ठरले. ताजे पनीर घरात आणलेले होते त्याची पनीर बिर्याणी करायचे असे ठरवले. या रेसिपीला सुरुवात करणार इतक्यात cookpad वर बिर्याणीची थीम आली. बिर्याणी हा मुख्यतः मटण अथवा चिकन सोबत केला जाणारा पदार्थ आहे. परंतु या मोगलाई डिशला अस्सल भारतीय टच देऊन अतिशय चविष्ट अशी शाकाहारी बिर्याणी सुद्धा आपण करू शकतो.पनीर मखनी दम बिर्याणीची रेसिपी आपल्या समोर माझ्या पद्धतीने सादर करीत आहे. Ashwini Vaibhav Raut -
अंडा बिर्याणी (anda biryani recipe in marathi)
#br बिर्याणी हा आवडीचा पदार्थ .मग ते व्हेज बिर्याणी असो किंवा नॉनव्हेज बिर्याणी असो कोणतीही बिर्याणी असली तरी आवडतेच. Reshma Sachin Durgude -
व्हेज बिर्याणी - वेजिटेबल बिर्याणी (Vegetable Biryani recipe in marathi)
व्हेज बिर्याणी हा एक अतिशय चवदार पदार्थ आहे . बिर्याणी बनवण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत ,पण मी आज तुम्हाला माझी सर्वात सोपी आणि झटपट व्हेज बिर्याणी रेसिपी सांगणार आहे.त्याचबरोबर मी काही टिप्स सुद्धा सांगणार आहे .चला तर मग सुरु करूया व्हेज बिर्याणी रेसिपी. Riya Vidyadhar Gharkar -
झटपट - स्टुडंट्स साठी खास - मिक्स व्हेज पनीर बिर्याणी (Mix Veg Paneer Biryani Recipe In Marathi)
#RDRराईस/डाळ रेसिपीस#स्टुडंट्स#students#मिक्स व्हेज पनीर बिर्याणी#बिर्याणी#पनीर Sampada Shrungarpure -
व्हेज दम बिर्याणी (veg dum biryani recipe in marathi)
#brबिर्याणी संपूर्ण लोकप्रिय आहे भारतीय उपखंडात , तसेच अफगाणिस्तान , इराण आणि इराक यासारख्या भागांतही ही तयार केली जाते . तांदूळ, भाज्या आणि मसाले असणारी बिर्याणीची एक हंडी स्वत: मध्ये एक संपूर्ण जेवण आहे. मग ते औपचारिक मेळावा असो किंवा मित्रांमधील अनौपचारिक भेट असो, बिर्याणी पुरेशी आहे. या पारंपारिक डिशचा प्रत्येक चमचा सुगंधित मसाले आणि समृद्ध स्वादांसह वापरला जातो. Sapna Sawaji -
-
पनीर बिर्याणी (paneer biryani recipe in marathi)
#brबिर्याणी हा पदार्थ लांब तादूंळ ,भरपूर मसाला , बरिस्ता, स्मोक अशा पद्धती वापरून बनवीले जाते. स्वादिष्ट अशी बिर्याणी चला बनवूयात. Supriya Devkar -
पनीर बिर्याणी (paneer biryani recipe in marathi)
#बिर्याणी आमची आवडती बिर्याणी आहे. हेल्दी आहे अतिशय. खरे करायला वेळ लागतो तितकीच यम्मी व टेस्टी ही लागते. मग एन्जॉय करूया ही बिर्याणी. Sanhita Kand -
कोळंबी बिर्याणी (kolambi biryani recipe in marathi)
#cookpadह्या कोरोना मुळे माहेरी जाता नाही आले पण खरचं आज खूप दिवसांनी का होईना योग आला माहेरी यायला खूप छान वाटल मग काय आता लाडच लाड मग आज आई च्या हातचं मस्त खायला भेटलं मग मस्त आई ने कोळंबी बिर्याणी केली मस्त खाल्ली खूप छान वाटल खरचं आईच्या हातची चव ती चव माहेरी आल्याचं सुखं म्हणजे म्हणतात ना ते हे love you aai.माझ्या आईच्या हातची मस्त कोळंबी बिर्याणी Supriya Gurav -
More Recipes
टिप्पण्या