ड्राय फ्रूट चिक्की (dry fruit chikki recipe in marathi)

Mangala Bhamburkar
Mangala Bhamburkar @cook_26659112
Amravati

#GA4
#week18
#chikki
सकाळची सुरुवात जर ड्रायफ्रूट्स ने केली तर शरीरासाठी ते फार उपयुक्त असते. ताज्या फळांपेक्षा सुके मेवे अधिक पौष्टिक असतात. त्यात आवश्यक विटामिन व खनिजे असतात ते कित्येक आजारांवर रामबाण उपाय आहेत. डाएट मध्ये ड्रायफ्रूट्स चा मुख्य रोल आहे. एक मूठभर ड्रायफ्रूट खाण्याने आपल्याला भरपूर दिवसभर टिकणारी एनर्जी मिळते, वजन कमी करण्यास काजू फार फायदेमंद असतो तसेच काजूमुळे स्मरणशक्ती वाढते काजू आयरन, मॅग्नेशियम, झिंग चा उत्तम स्त्रोत आहे, त्यामध्ये कमी कॅलरीज असतात.पिस्ता सेवनाने अर्टरीज कडक न होता मुलायम राहतात व त्यामुळे हार्ट अटॅकचा धोका कमी होतो तसेच त्यामध्ये विटॅमिन ई असते जे शरीरासाठी फार उपयुक्त आहे बदाम हा विटामिन ई चा स्त्रोत आहे व त्यामध्ये शक्तिशाली एंटीऑक्सीडेंट भरपूर असतात, वजन कमी करण्यास मदत होते तसेच बदामामुळे आपली इम्युनिटी वाढते अख्रोट मुळे वजन कमी होते तसेच एंटीऑक्सीडेंट, ओमेगा थ्री फॅटी ऍसिड भरपूर प्रमाणात असतात.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

३० मिन.
२२ pieces
  1. 100 ग्रॅमबदाम
  2. 100 ग्रॅमकाजू
  3. 25 ग्रामपिस्ता
  4. 50 ग्रामअखरोट
  5. 1 टेबलस्पूनसाजूक तूप
  6. 200 ग्रामगूळ
  7. 1/4 कपपाणी
  8. 1/4 टीस्पूनवेलची पूड

कुकिंग सूचना

३० मिन.
  1. 1

    प्रथम कढईत तीन चतुर्थांश कप बदाम (१००gm), तीन चतुर्थांश कप (१००gm)काजू,दोन टेबलस्पून (२५gm) पिस्त्या,अखरोट चे तुकडे घ्या

  2. 2

    मंद आचेवर वरील सर्व सुके मेवे दहा मिनिट पर्यंत किंवा सुके मेवे कुरकुरीत होईपर्यंत भाजा व बाजूला ठेवा

  3. 3

    नंतर कढईत एक एक टीस्पून साजूक तूप, एक कप गूळ (200 ग्राम) आणि १/४ कप पाणी घ्या

  4. 4

    गुळ पूर्णपणे विरघळेपर्यंत व्यवस्थित ढवळत रहा, सहा ते सात मिनिट पर्यंत उकळा त्यानंतर मिक्चर फेसाळ होईल

  5. 5

    नंतर पाक झाला की नाही हे थंड पाण्यात पाकाचा थेंब टाकून चेक करा तो जर लगेच गोळा बनला व कुरकुरीत झाला तरच पाक झाला असे समजावे

  6. 6

    पाक झाल्यावर मंद आचेवरच भाजलेले सुके मेवें व वेलची पूड घाला

  7. 7

    गुळाचा पाक सर्व ड्रायफ्रुट्स ला व्यवस्थित चीपकला की लगेच मिक्स्चर तूप लावलेला ओट्यावर पसरवा व गरम असतानाच लाटण्याने एकसारखे पातळ लाटून घ्या

  8. 8

    गरम असतानाच पाहिजे त्या आकारात कापून घ्या

  9. 9

    ड्रायफ्रूट्स चिक्की पूर्णपणे थंड झाली की हवाबंद डब्यात स्टोअर करा महिन्याभरात पर्यंत ती तशीच राहील.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Mangala Bhamburkar
Mangala Bhamburkar @cook_26659112
रोजी
Amravati

टिप्पण्या

Similar Recipes