मेथीतले ज्वारीच्या पिठाचे फळ (methiche jowarichya pithache faad recipe in marathi)

Mangala Bhamburkar
Mangala Bhamburkar @cook_26659112
Amravati

#GA4
#week19
#methi
मेथी ही आयुर्वेदातील फार उपयोगी जडीबुटी आहे . मेथीच्या स्वादामुळे ती स्वयंपाक घरात नेहमीच वापरली जाते. मेथीची भाजी, मेथीचे मुटके असे बरेच पदार्थ आपण नेहमीच करीत असतो तसेच ज्वारीची भाकरी ही नेहमीच करत असतो. आजची आपली रेसिपी थोडी वेगळी चविष्ट व पौष्टिक आहे. मेथी मुळे हृदयविकाराचा धोका टळतो तसेच कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहते, बद्धकोष्टता मेथी सेवनाने होत नाही. थंडीमध्ये आपण मेथीचे उपयोग भरपूर करीत असतो तसेच मेथीमुळे संधिवात होत नाही डायबिटीस नियंत्रणात राहतो, वजन कमी करण्यास मदत होते व मेथी मध्ये असलेल्या पाचक enzymes मुळे पचनशक्ती सुधारते. ज्वारीची भाकरी आपण नेहमीच खात असतो ती थोडी गोडसर चवीची तसेच ज्वारी मध्ये प्रथिनांचे प्रमाण जास्त असते, पिष्टमय घटक असतात ,खनिजद्रव्ये अधिकतम आढळतात. ज्वारीच्या दाण्यात आर्डता, प्रथिने, तंतुमय घटक, खनिज द्रव्ये भरपूर असतात तसेच प्रो विटामिन किंवा कॅरोटीन, थायमिन असतात ,ज्वारी मुळे हार्मोनल बॅलन्स राखल्या जातो शरीरास पटकन ऊर्जा मिळते व किडनी स्टोनचा त्रास टाळता येतो तर आजची रेसिपी आपण ज्वारी पीठ व मेथी भाजी पासून बनविणार आहोत

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

३० मिन.
२ व्यक्ती
  1. 1मोठी वाटी बारीक चिरलेली मेथी
  2. 1मोठी वाटी ज्वारीचे पीठ
  3. 2हिरव्या मिरच्या
  4. 5सहा लसूण पाकळ्या
  5. 2-3लाल सुकी मिरची
  6. 2मोठे कांदे
  7. 1/2 टीस्पूनहळद
  8. 2 टेबलस्पूनतेल
  9. 1मोठी वाटी पाणी
  10. 1/2 टीस्पूनहिंग
  11. मीठ चवीनुसार

कुकिंग सूचना

३० मिन.
  1. 1

    प्रथम मेथी स्वच्छ धुऊन कोरडी करावी व बारीक चिरून घ्यावी. कांदा, सुक्या मिरच्या, हिरव्या मिरच्या सर्व चिरून घ्यावे, लसूण सोलून घ्यावा

  2. 2

    कढईत एक वाटी पाणी गरम करण्यास ठेवावे त्यात एक टीस्पून तेल व मीठ टाकावे व पिठाची उकड काढावी पिठाची उकड झाकून ठेवावी.

  3. 3

    नंतर मेथीची भाजी करावी. दोन टेबलस्पून तेलात जिर, मोहरी तडतडू द्यावी, त्यात लसूण पाकळ्या ठेचून घालाव्यात हिरवी मिरची व लाल मिरची घालावी व एक मिनिट पर्यंत होऊ द्याव. नंतर त्यात कापलेला कांदा चांगला तांबूस होईपर्यंत परतावांवा व अर्धा टीस्पून हळद घालावी व मेथी टाकावी, टोमॅटोही घातला तरी चालतो, चवीनुसार मीठ घालावे व मिक्स करावं

  4. 4

    नंतर कढईच्या साईडला पिठाचे फळ थोडा तेलाचा हात घेऊन चिकटवावे म्हणजे मध्ये मेथीची भाजी व साईटला पिठाचे फळ असे राहील व झाकण ठेवून शिजवावे पिठाची उकड घेतली असल्यामुळे फार वेळ फळ शिजायला लागत नाही

  5. 5

    मध्ये मध्ये भाजी परतावावीर व एक साईड झा, पिठाचे फळ परवावे व परत झाकण ठेवून शिजवावे

  6. 6

    ह्या फळांना मेथीच्या भाजीचा छान स्वाद लागतो व फार रुचकर लागतात ते मेथीच्या भाजी सोबत किंवा नुसते ही खाऊ शकता

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Mangala Bhamburkar
Mangala Bhamburkar @cook_26659112
रोजी
Amravati

टिप्पण्या

Similar Recipes