"उपवासाचे साबुदाणा थालीपीठ" (upwasache sabudana thalipeeth recipe in marathi)

लता धानापुने
लता धानापुने @lata22

#fr
"उपवासाचे साबुदाणा थालीपीठ"

"उपवासाचे साबुदाणा थालीपीठ" (upwasache sabudana thalipeeth recipe in marathi)

#fr
"उपवासाचे साबुदाणा थालीपीठ"

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

पंधरा मिनिटे
एक जणासाठी
  1. 1उकडलेला बटाटा
  2. 1/4 कपमऊसुत भिजलेले साबुदाणे
  3. 1 टेबलस्पूनहिरवी मिरची आले ठेचा.
  4. 3 टेबलस्पूनभाजलेल्या शेंगदाण्याचे कूट
  5. 1/2 टीस्पूनजीरे
  6. चवीनुसारमीठ
  7. आवडीनुसार कोथिंबीर
  8. 2 टीस्पूनतुप
  9. 1/2 टीस्पूनकाळीमिरी पावडर
  10. उपवासाला तुम्हाला कोथिंबीर चालत असेल तर घालावी.

कुकिंग सूचना

पंधरा मिनिटे
  1. 1

    साबुदाणे पाच सहा तास भिजत ठेवावे म्हणजे मऊ सुत भिजतील.. वाटी मध्ये बटाटा किसून घ्यावा..

  2. 2

    साबुदाणे,आले, मिरची ठेचा, मीठ, जीरे, काळीमिरी पावडर, शेंगदाणे कूट या सगळ्या जिन्नस घालून मिश्रण एकजीव करून घ्यावे..

  3. 3

    गॅस वर तवा तापत ठेवा.पोळीपाटावर एक प्लास्टिक कागद ठेवा,थोडा तुपाचा हात लावून घ्यावे.. त्यावर मिश्रणाचा छोटा गोळा ठेवून हाताने हलकेच दाबुन घ्यावे..त्यावर दुसरा कागद ठेवून मस्त हवे तेवढे पातळ हाताने पसरवून घ्यावे..

  4. 4

    गॅस बारीक असावा.. तव्यावर तुप लावून घ्यावे.थालिपीठच्या वरचा कागद काढून घ्यावा व खालचा कागद उचलून थालिपीठ अलगद हातावर घेऊन तव्यावर ठेवावे... सगळ्या बाजूंनी तुप सोडावे.दोन मिनिटांनंतर पलटुन दुसरी बाजू ही चांगली खरपुस भाजुन घ्यावी..

  5. 5

    सगळे थालिपीठ खरपूस भाजून झाले की सर्व्हिंग प्लेटमध्ये काढून दह्यासोबत सर्व्ह करावे..सोबत थोडे वेफर्स घ्यावेत..... खुप छान लागतात..

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
लता धानापुने
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes