कुळीथ पिठी (kulith pithi recipe in marathi)

सुप्रिया घुडे
सुप्रिया घुडे @cook_SupriyaGhude97
वसई

#KS1 महाराष्ट्राचे Kitchen स्टार चॅलेंज - थीम : कोकण साठी मी हि दुसरी पाककृती पोस्ट करत आहे. :)

कुळीथ पिठी. सिंधुदुर्गात याला "पिठलं" असं न संबोधता "पिठी" असं संबोधलं जातं. :)
कोकणांतली लोकं खाण्याच्या बाबतीत अजिबात बडेजाव न करता जे पेज-भाकरी-पिठी असेल त्यात पोट भरून तृप्त असतात.
त्यातलाच एक घराघरात सहज उपलब्ध असलेला, सहज बनणारा पदार्थ म्हणजे - कुळथाची पिठी.

कुळीथ (अथवा हुलगा) ही भारतात उगवणारी एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती व एक प्रकारचे कडधान्य आहे.
पीक काढणीला वेळ झाल्यास कुळीथ(हुलगा) टरफल फुटून बाहेर सांडतो आणि शेतात विखुरतो, परिणामी नुकसान होते. त्यामुळे हे कडधान्य जवळजवळ नामशेष झाले आहे.
कुळीथ या कडधान्यात भरपूर लोह असते. कुळीथामुळे वात व कफ कमी होतो. कुळीथ मुतखड्यावर औषधाप्रमाणे काम करतात. मेद वाढला असता, सूज आली असता, जंत झाले असता हितकर असतात.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

अर्धा तास
2 सर्व्हिंग्ज
  1. 1/2 वाटीकुळीथ पीठ
  2. 1 वाटीचिरलेला टोमॅटो
  3. 1 वाटीचिरलेला कांदा
  4. 1हिरवी तिखट मिरची ~ बारीक चिरून
  5. 3-4लसूण पाकळ्या ~ बारीक चिरून
  6. 1 इंचआलं ~ बारीक चिरून
  7. 4-5कढीपत्ता पाने
  8. 4-5आमसुलं
  9. चवीपुरतं मीठ
  10. 2 चमचेखाद्यतेल
  11. 2-3 चमचेकिसलेले खोबरं
  12. 1 चमचाघरचा लाल मसाला
  13. 1/4 चमचाहळद
  14. चिमूटभरहिंग
  15. जिरं - मोहरी

कुकिंग सूचना

अर्धा तास
  1. 1

    अर्धी वाटी कुळीथ पीठ पाण्यात भिजत ठेवलं. टोमॅटो, कांदा, १ हिरवी तिखट मिरची, ३-४ लसूण पाकळ्या, १ इंच आलं बारीक चिरून घेतले.

  2. 2

    कढई मध्ये २ चमचे खाद्यतेल गरम केले. मोहरी - जिरं, हिंग, कढीपत्ता, हळद टाकून फोडणी दिली.

  3. 3

    लसूण, आलं, मिरची त्यात परतून घेतली. कांदा गुलाबीसर होईपर्यंत परतला. टोमॅटो मऊ पडेपर्यंत परतला. २-३ चमचे किसलेले खोबरं, चवीपुरतं मीठ, १ चमचा घरचा लाल मसाला, आणि पाव चमचा पिठलं मसाला (ऐच्छिक) घालून मिश्रण एकजीव करून झाकण ठेवून एक मिनिटासाठी मुरू दिलं.

  4. 4

    मिश्रण एकजीव झालं कि त्यात पाण्यात भिजवलेलं कुळीथ पीठ ऍड केलं, वाटल्यास अजून पाणी वाढवलं. ४-५ आमसुलं टाकली. ३-४ उकळी मध्ये पिठी घट्ट होते. चाखून मिठाचं प्रमाण व्यवस्थित करायचं. आणि कोथिंबीर घालून गॅस बंद करून झाकण ठेवून द्यायचं.

  5. 5

    गरम गरम पिठी ऊन ऊन हातसडीच्या भातासोबत वाढायची. तोंडाला कैरीचं लोणचं आणि तांदुळाचा पापड असेल तर स्वर्गच :)
    ~ सुप्रिया घुडे

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
सुप्रिया घुडे
रोजी
वसई
🇮🇳👰Independent Women👩🏻‍💻Software Programmer👯Traveller👸Explorer👰Foodie👱Artist📖Book Lover / Reader📝Lifetime Learner🇮🇳
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes