कांदा बटाटा काचऱ्या (kanda batata kachrya recipe in marathi)

Shama Mangale
Shama Mangale @cook_26566429
Vashi

#काचऱ्या
कांदा बटाटा काचऱ्या घरी कोणती भाजी नसली की झटपट काचऱ्या करते. सर्वांच्या आवडत्या. त्यात पाऊस पडत असला की गरमगरम वरणभात आणि झणझणीत काचऱ्या. मस्त दबवायच्या आणि पांघरण घेऊन झोपायच.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

15 मिनिटे
4जणांसाठी
  1. 4मोठे बटाटे
  2. 2मोठे कांदे
  3. 2 टेबलस्पूनलाल तिखट
  4. 1 टेबलस्पूनहळद
  5. 1 टेबलस्पूनमीठ
  6. 4 टेबलस्पूनतेल

कुकिंग सूचना

15 मिनिटे
  1. 1

    बटाटे स्वच्छ धुऊन साल काढून त्याच्या गोल काचऱ्या कापून घ्याव्यात.

  2. 2

    कांदे सोलून स्वच्छ धुऊन त्याच्याही गोल काचऱ्या कापून घ्याव्यात

  3. 3

    बटाट्याच्या काचऱ्यांना तिखट,हळद, मीठ लावून चोळून घ्यावे.

  4. 4

    गॅसवर पसरट पॅन मध्ये तेल घेऊन तेल गरम झाल्यावर त्यात कांदा घालून परतुन घ्यावे.

  5. 5

    कांदा परतला की त्यात तिखट मीठ लावलेल्या बटाट्याच्या काचऱ्या घालाव्यात. हलवून घ्यावे. गॅस मंद ठेवावा. पॅन वर झाकण ठेवून त्यावर पाणी घालावे. दहा मिनिटांनी झाकण काढून पहावे. बटाटे शिजले की काचऱ्या उतरवून ठेवाव्यात.

  6. 6

    कांदा बटाटा काचऱ्या तयार. वरण भाता बरोबर. पोळी बरोबर सर्व्ह करावे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Shama Mangale
Shama Mangale @cook_26566429
रोजी
Vashi
मला पदार्थ बनवायला आणि खिलवायला आवडते.
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes