व्हॅनिला ड्राय फ्रूट केक (vanilla dry fruit cake recipe in marathi)

Ashwinii Raut
Ashwinii Raut @cook_25215530
Pune

व्हॅनिला ड्राय फ्रूट केक (vanilla dry fruit cake recipe in marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

35 मिनिटं
5 सर्व्हिंग्ज
  1. 1 कपमैदा
  2. 1/4 कप +2 टेबलस्पून दूध
  3. 1/4 कप+ 1 टेबलस्पूनदही
  4. 1/2 कपपिठीसाखर
  5. 1/4 टीस्पूनव्हॅनिला इसेन्स
  6. चिमुटभरमीठ
  7. 1/2 टीस्पूनबेकिंग पावडर
  8. 1/4 टीस्पूनबेकिंग सोडा
  9. 1/4 कपबटर मेल्ट करून
  10. 1/4 कपबदाम,पिस्ता काप, चेरिज

कुकिंग सूचना

35 मिनिटं
  1. 1

    सर्वप्रथम सहा इंचाचे केकचे भांडे Asahi kesai India company चे बटर पेपर लावून तयार करून घेणे

  2. 2

    चाळणी मध्ये मैदा पिठीसाखर सोडा बेकिंग पावडर आणि मीठ टाकून दोनदा चाळून घेणे.

  3. 3

    दुसऱ्या पातेल्यामध्ये दही तेल टाकून व्यवस्थित मिक्स करणे यामध्येच दूध टाकून मिक्स करणे सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर वरील जाळून घेतलेले सर्व साहित्य टाकून बॅटर तयार करणे.

  4. 4

    ड्रायफ्रूट्स चे काप मैद्यामध्ये घोळवुन तयार केक च्या बॅटर मध्ये टाकून मिक्स करणे आवडत असल्यास व्हॅनिला इसेन्स टाकू शकता. गार्निशिंगसाठी काहि ड्रायफ्रूट्स चे काप वरच्या साईडला टाकने. मी बदाम,पिस्ता,चेरीज काप वापरले आहेत.

  5. 5

    ज्या कढई मध्ये केक बेक करायचा आहे ति कढई मिडीयम आचेवर पाच मिनिटासाठी फ्री-हीट करून घेणे. फ्रि हीट झालेल्या कढईमध्ये एक स्टॅन्ड ठेवून तयार केकचे भांडे ठेवावे. आणि मंद आचेवर तीस मिनिटे केक बेक करावा.

  6. 6

    तीस मिनिटानंतर सुरी किंवा टूथ पीक च्या मदतीने केक चेक करावा. व्हॅनिला ड्राय फ्रूट केक तयार आहे.. गरम चहा सोबत हा केक खूप छान लागतो.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Ashwinii Raut
Ashwinii Raut @cook_25215530
रोजी
Pune

टिप्पण्या

Similar Recipes