पुलाव (नारळाचे दूध वापरून) (pulav recipe in marathi)

Rajashri Deodhar
Rajashri Deodhar @RBD12072012

#cpm4
मॅगझीन week4
मी कधी कधी व्हेज पुलाव नारळाचे दूध घालून करते चव फारच छान येते त्याची रेसिपी पोस्ट करत आहे.

पुलाव (नारळाचे दूध वापरून) (pulav recipe in marathi)

#cpm4
मॅगझीन week4
मी कधी कधी व्हेज पुलाव नारळाचे दूध घालून करते चव फारच छान येते त्याची रेसिपी पोस्ट करत आहे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

1/2 तास
2-3 सर्व्हिंग्ज
  1. 1 कपबासमती तांदूळ
  2. 2 कपनारळाचे दूध
  3. 1 टेबलस्पूनतूप
  4. 1 टेबलस्पूनतेल
  5. खडा मसाला- दालचिनी, लवंग, काळी मिरी, वेलची, तमालपत्र
  6. 1 कपउभा चिरलेला कांदा
  7. 2हिरवी मिरची उभ्या चिरून
  8. 1 टेबलस्पूनआलं लसूण पेस्ट
  9. 1/4 कपचिरलेले गाजर
  10. 1/4 कपचिरलेला बटाटा
  11. 1/4 कपचिरलेली फरसबी
  12. 1/4 कपचिरलेला फ्लॉवर
  13. 1/4 कपमटार दाणे
  14. चवीनुसारमीठ
  15. 1/4 कपकाजूचे काप
  16. 1/4 कपउभा चिरलेला कांदा
  17. आवश्यकतेनुसार तेल

कुकिंग सूचना

1/2 तास
  1. 1

    तांदूळ धुवून 20 मिनिटे बाजूला ठेवावे. कांदा मिरची गाजर फरसबी फ्लॉवर बटाटा चिरून घ्या. कुकरमध्ये तेल तूप घालून त्यात खडा मसाला घालावा आलं लसूण पेस्ट कांदा मिरची घालून 2 मिनिटे परतावे.

  2. 2

    गाजर फरसबी फ्लॉवर बटाटा मटार दाणे आणि मीठ घालून एकत्र करावे. तांदूळ नारळाचे दूध घालून एकत्र करावे.

  3. 3

    कुकरचे झाकण लावून 1 शिट्टी करून गॅस बंद करावा. एका पॅनमध्ये तेल गरम करून त्यात काजू थोडे मीठ परतून बाजूला काढून ठेवावे

  4. 4

    आता पॅनमध्ये तेल घालून कांदा गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत परतून घ्या. कुकर गार झाल्यावर पुलाव सव्र्हिग प्लेटमध्ये काढून घ्या.

  5. 5

    परतलेले काजू कांदा घालून पुलाव रायता पापड लोणचे बरोबर सर्व्ह करावा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Rajashri Deodhar
Rajashri Deodhar @RBD12072012
रोजी
I Love cooking.. 😋
पुढे वाचा

Similar Recipes