भरलेली कारली (bharleli karle recipe in marathi)

Hema Wane
Hema Wane @hemawane_5557

#fdr
#भरलेली कारली म्हटले की मला माझ्या ऑफिसच्या
मैत्रीणीची आठवण प्रकर्षाने येते. म्हणूनच ही रेसिपी मैत्रीणीना समर्पित केली आहे .खर तर कडु कारले तुपात तळले साखरेत घोळले तरी कडु ते कडुच.पण तुम्ही अशी भाजी करून बघा नक्की खुप आवडेल सर्वाना.चला तर बघुया कशी करायची ते.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30मिनिटे
2 सर्व्हिंग्ज
  1. 5-6छोटी कारली
  2. 1 टीस्पूनचिंचेचा कोळ
  3. 1 टीस्पूनमीठ
  4. कारली भरण्यासाठी👇
  5. 3 टेबलस्पूनओले खोबरे
  6. 2 टेबलस्पूनशेंगदाणे कुट
  7. 2 टेबलस्पूनकोथिंबीर बारीक चिरून
  8. 1 टीस्पूनलाल तिखट
  9. 1 टीस्पूनगोडा मसाला
  10. 1/2 टीस्पूनहळद
  11. 1/2मीठ
  12. 1 टेबलस्पूनगुळ
  13. 2-3 टेबलस्पूनतेल

कुकिंग सूचना

30मिनिटे
  1. 1

    कारली स्वच्छ धुवून कारल्याना मधे काप द्या.कारली पाण्यात मीठ नि चिंचेचा कोळ घालून 10 मिनीटे उकळून घ्या.

  2. 2

    खालीलप्रमाणे सर्व एकत्र करून घ्या.कांदा, कोथिंबीर चिरून घ्या. हे सर्व मिसळून घ्या.
    कारली पाण्यातून काढून त्यातील बिया काढून घ्या.

  3. 3

    कारल्यामधे तयार केलेले मिश्रण घाला थोडे उरले तर तसेच ठेवा.

  4. 4

    तव्यावर 2टेबलस्पून तेल टाकून भरलेली कारली त्यावर ठेवा नी झाकण ठेऊन 5/7 मिनिटे शिजवा मग उलटी करा नी शिजवा. नंतर उरलेला मसाला ही तव्यावर टाका वाटल्यास परत तेल टाका नि छान परतून घ्या.

  5. 5

    बर्याच दा मसाला बाहेर निघतो तर शेवटी परत मसाला कारल्यात भरा.

  6. 6

    चमचमीत चटकदार भरलेली कारली तयार आहेत.चपातीबरोबर खुप छान लागतात.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Hema Wane
Hema Wane @hemawane_5557
रोजी

Similar Recipes