वाघाट्याची भाजी (Vaagaatyachi Recipe in marathi)

Varsha Ingole Bele
Varsha Ingole Bele @varsha_1966
Nagpur

#रान भाजी...#बारस , द्वादशी..स्पेशल.. रान भाजी.. विदर्भात आमचेकडे याला वाघाटे म्हणतात.. खरे म्हणजे ही भाजी बाजारात फक्त आषाढी एकादशी आणि द्वादशीलाच मिळते. वारकरी संप्रदायात या भाजीला फार महत्व आहे. ग्रामीण भागात द्वादशीला नैवैद्यात या भाजीला मानाचे स्थान आहे... शिवाय औषधी गुण आहेत या भाजीमध्ये... थोडी कडवट चव असलेली..पण गुणी अशी ही भाजी..

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30 मिनिट
2 सर्व्हिंग्ज
  1. 1/2 पाववाघाटे
  2. 2 टेबलस्पूनतूर डाळ
  3. 1कांदा
  4. 1 टेबलस्पूनतेल
  5. 1/2 टीस्पूनजीरे मोहरी
  6. 1 टीस्पूनआले लसूण पेस्ट
  7. 1/2 टीस्पूनहळद
  8. 1 टीस्पूनतिखट
  9. 1/2 टीस्पूनधणे पूड
  10. चवीनुसारमीठ
  11. कोथिंबीर

कुकिंग सूचना

30 मिनिट
  1. 1

    वाघट्याची भाजी करताना आधी स्वच्छ धुवून घ्यावे. त्यानंतर त्याला बत्त्याने फोडून, म्हणजे त्याचे तुकडे करून घ्यावे. कारण ते कडक असल्यामुळे, विळी किंवा सुरीने कापल्या जात नाही. त्यानंतर त्याच्या बिया काढून टाकाव्यात. किंवा दुसऱ्या पद्धतीने, आधी वाघा टे उकळून घ्यावे आणि नंतर त्यातील बिया काढून टाकाव्यात. आणि त्याचे तुकडे करून घ्यावे. भाजीत टाकण्यासाठी तुरीची डाळ दोन तीन तास भिजत घालावी.

  2. 2

    मी आधी वाघाट्याचे फोडून, बिया काढून तुकडे केलेत. आणि नंतर पाण्यात टाकून चांगले नरम होईपर्यंत उकळून घेतले. त्यामुळे त्याचा कडवट चव निघून जाते.

  3. 3

    फोटोत दाखवल्याप्रमाणे त्याचा रंग बदलतो. आता भाजी करण्यासाठी, गॅसवर एका कढईत तेल टाकून गरम झाल्यावर त्यात जीरे मोहरी टाकावी.

  4. 4

    कांदा आणि आले लसूण पेस्ट टाकून ती परतून घ्यावे. आता त्यात हळद तिखट मीठ आणि धणे पावडर टाकावी.

  5. 5

    चांगले मिक्स करून नंतर त्यात भिजलेली तुरीची डाळ टाकावी. डाळ शिजण्यासाठी थोडे पाणी घालून झाकण ठेवून वाफ आणावी. 4-5 मिनिट

  6. 6
  7. 7

    आता.5-7 मिनिट शिजल्यानंतर त्यात वरून कोथिंबीर टाकावी.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Varsha Ingole Bele
Varsha Ingole Bele @varsha_1966
रोजी
Nagpur

टिप्पण्या (20)

J A
J A @cook_113799737
भाजीमध्ये वाघाटे कधी टाकायचे?
भाजीमध्ये वाघाटे च केव्हा टाकायचे ते लिहायला विसरलात तुम्ही😄. पण रेसिपी छान आहे.

Similar Recipes