शिंगाड्याच्या पीठाची खीर...उपवास स्पेशल (shingadyacha pitachi kheer recipe in marathi)

Preeti V. Salvi
Preeti V. Salvi @cook_20602564

#cpm6
याआधी १३ खीर रेसिपी मी कुकपॅड वर पोस्ट केल्यात . आता ही उपवासाची शिंगाड्याच्या पीठाची खीर..माझ्या आजीला आवडायची खूप..मला तर प्रचंड आवडते.. उपवासाचे पदार्थ खाऊन अँसिडिटी झाली किंवा पोटात आग पडली असेल तर आजी म्हणायची शिंगड्याची खीर पी मस्त थंडगार वाटेल.आजीचा सोमवारी उपवास असायचा त्यामुळे सोमवारी शिंगाड्याची खीर किंवा शिरा हमखास व्हायचाच...खरंच खूप छान लागते आणि थंडगार असते आणि पौष्टिक सुद्धा.मला साखर घालून ही आवडते ,गुळ घालूनही आणि खजूर घालूनही आवडते.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

५ मिनिटे
  1. 1 टेबलस्पूनशिंगाड्याचे पीठ
  2. 1 टीस्पूनसाजूक तूप
  3. 1 कपदूध
  4. 2 टीस्पूनसाखर
  5. 1/2 टीस्पूनड्राय फ्रूट स्लाइस
  6. चिमुटभरवेलची पूड

कुकिंग सूचना

५ मिनिटे
  1. 1

    शिंगाड्याचे पीठ तुपावर छान परतून घेतले.

  2. 2

    त्यात हळूहळू दूध घालून ढवळले,नाहीतर गुठळ्या होतात.साखर घातली,छान ऊकळी आणली.

  3. 3

    चिमुटभर वेलची पूड घातली..आवडत असेल तर घालावी,नाही घातली तरी चालेल.ड्राय फ्रूट स्लाइस करून घातले.खीर तयार आहे.

  4. 4

    सर्व्हिंग बाउल मध्ये काढून घेतली.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Preeti V. Salvi
Preeti V. Salvi @cook_20602564
रोजी

Similar Recipes