दत्तगुरूंची आवडती - श्रावणी घेवडा भाजी (ghevda bhaji recipe in marathi)

सुप्रिया घुडे
सुप्रिया घुडे @cook_SupriyaGhude97
वसई

श्री गुरुचरित्र : अध्याय त्रेपन्नावा : अवतरणिका
घेवडा उपटोनिया दरिद्रियाचा । कुंभ दिधला हेमाचा ।
वर्णिला प्रताप श्रीगुरुचा । अष्‍टादशाध्यायांत ॥३६॥
कितीही श्रीमंती असली तरी शक्य असेल तर घेवडा वेल लावावा. श्रीमंती देवापुढे कधीच नसते, दत्तगुरु जेवण्यास येतात, घरची घेवडा भाजी खातात.
घेवडा भाजी करावी, घेवडा कथा वाचावी, कमी असते ते वाढते.
घेवडा भाजी दत्तगुरूंना नैवेद्य म्हणून दाखविली जाते. म्हणून गुरु पौर्णिमा विशेष रेसिपीज #gpr साठी श्रावणी घेवडा भाजी बनवली आहे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

अर्धा तास
४ व्यक्तींसाठी
  1. ५० ग्राम श्रावणी घेवडा
  2. 1बटाटा
  3. 1कांदा
  4. 2हिरव्या तिखट मिरच्या
  5. 2 चमचेगूळ पावडर
  6. 2 चमचेकिसलेलं खोबरं
  7. कढीपत्ता - तेल - हिंग - मोहरी - जिरं - हळद (फोडणीसाठी)
  8. 1/2 चमचालाल तिखट मसाला
  9. 2 चमचेगोडा मसाला
  10. 1/2 चमचागरम मसाला
  11. चवीनुसारमीठ
  12. 1/4 वाटीपाणी (शिजवताना हबका मारण्यासाठी)

कुकिंग सूचना

अर्धा तास
  1. 1

    श्रावणी घेवड्याच्या शेंगा स्वछ धुवून घ्यायच्या. मग हाताने खुडून घ्यायच्या. सुरीने कापू हि शकता पण गवार, फरसबी, घेवड्या च्या शेंगा हाताने खुडलेल्या भाजीची चव चांगली लागते. शेंगा खुडताना जवळ जवळ तुकडे करायचे. आणि दोन्ही बाजूने तंतू / रेषा खेचून काढायच्या. सर्व शेंगांचे तुकडे पाण्यात भिजत ठेवायचे. कांदा - मिरच्या - बटाटा कापून घ्यायचे.

  2. 2

    कढईत तेल गरम करून कढीपत्ता - हिंग - मोहरी - जिरं - हळद ची फोडणी द्यायची. मिरची आणि कांदा परतून घ्यायचा. तिखट आणि गोडा मसाला घालून तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं. बटाटा ऍड करून ढवळून २ मिनिटांसाठी झाकून ठेवायचं. मग शेंगांचे तुकडे घालून चवीनुसार मीठ घालायचं. थोडासा पाण्याचा हबका मारायचा आणि झाकून १० मिनिटांसाठी भाजी शिजायला द्यायची. मध्ये एकदा तळाला लागू नये म्हणून ढवळून घ्यायची.

  3. 3

    १० मिनिटांनी भाजी बऱ्यापैकी आवळलेली दिसेल. यात गूळ पावडर, १ चमचा खोबरं आणि गरम मसाला घालून ढवळायचं. पुन्हा झाकून शिजायला ठेवायची.
    साधारण अजून पाच मिनिटांत भाजी व्यवस्थित शिजलेली असेल. एक चमचा खोबरं वरून भुरभुरवून घेवडा भाजी सर्व्ह करायची.

  4. 4

    पुण्यात हॉस्टेल मध्ये असताना खाणावळीतून हि भाजी सर्रास मिळायची, तेव्हा मला ती भाजी बिल्कुल आवडत नव्हती. परंतु वरील पद्धतीने बनवलेली भाजी अत्यंत चविष्ट लागते. Generally घेवडा भाजी शक्यतो कोणाला खायला आवडत नाही, परंतु अशा पद्धतीने बनवली तर बोट चाटत खाल्ली जाईल :)
    ~ सुप्रिया घुडे

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स (7)

Cook Today
सुप्रिया घुडे
रोजी
वसई
🇮🇳👰Independent Women👩🏻‍💻Software Programmer👯Traveller👸Explorer👰Foodie👱Artist📖Book Lover / Reader📝Lifetime Learner🇮🇳
पुढे वाचा

टिप्पण्या (7)

Similar Recipes