चकली (chakli recipe in marathi)

Smita Kiran Patil
Smita Kiran Patil @myrecipe_2249
Sanpada Navi Mumbai

#DIWALI 2021
आपण प्रत्येकाला विचारले की दिवाळी मध्ये तुझा आवडता फराळ कोणता तर सगळ्यांच्या तोंडून अगदी लहान मोठ्यांच्या सुद्धा चकली हा पदार्थ येईल चकली शिवाय दिवाळीचा फराळ अपूर्ण आहे

चकली (chakli recipe in marathi)

#DIWALI 2021
आपण प्रत्येकाला विचारले की दिवाळी मध्ये तुझा आवडता फराळ कोणता तर सगळ्यांच्या तोंडून अगदी लहान मोठ्यांच्या सुद्धा चकली हा पदार्थ येईल चकली शिवाय दिवाळीचा फराळ अपूर्ण आहे

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

४५ मिनिट
चार लोकांसाठी
  1. चकलीच्या एक किलोच्या भाजणी साठीचे साहित्य
  2. 1 किलोतांदूळ
  3. 1/2 किलोहरभऱ्याची डाळ
  4. १२५ ग्राम उडदाची डाळ
  5. 100 ग्रॅमपोहे
  6. 100 ग्रॅमसाबुदाणा
  7. 1 चमचाधने,जीरे
  8. यापैकी आपण चार वाट्या पिठाची चकली बनवण्याचे प्रमाण
  9. 2 वाटीपाणी
  10. 4 चमचेलाल तिखट
  11. मीठ चवीप्रमाणे
  12. 2 टीस्पूनतीळ
  13. 2 टीस्पूनओवा
  14. 4 टेबलस्पूनतेल मोहन साठी

कुकिंग सूचना

४५ मिनिट
  1. 1

    चकलीची भाजणी करताना डाळ तांदूळ वेगळेवेगळे धुऊन निथळून घ्यावे घरात फॅन खाली सुकवून घ्यावे. तांदूळ सुकल्यानंतर 5 ते 6 मिनिटं कढई गॅसवर ठेवून भाजून घ्यावेत आपल्याला जास्त खरपूस पण भाजायचे नाही. नंतर हरभऱ्याची डाळ भाजून घ्यावी नंतर उडीद डाळ पोहे साबुदाणा सर्व भाजून घ्यावे यामध्ये धने जीरे टाकून हे पिठ गिरणीतून दळून आणावे ही झाली चकलीची भाजणी

  2. 2

    आता यातील चार वाट्या पीठ घ्या यामध्ये चार मोठे चमचे तेल गरम करून घाला आणि सर्व पिठाला चोळून घ्या दोन वाट्या पाणी उकळत ठेवा आणि या पीठा मध्ये हे उकळेल पाणी ओतून झाकून ठेवा थोडे थंड झाल्यावर यामध्ये लाल तिखट मीठ ओवा तिळ धने-जीरे पावडर हळद हे सर्व मसाले मिसळून घट्ट पीठ मळून घ्यावे

  3. 3

    हे पीठ दहा पंधरा मिनिटे तसेच झाकून ठेवावं

  4. 4

    गॅसवर कढई मध्ये तेल ओतून तापत ठेवावे आणि चकलीच्या साच्यामध्ये पीठ मळून घेऊन भरून घ्यावे आणि चकल्या पाडाव्यात

  5. 5

    मिडीयम गॅसवर चकल्या खरपूस तळून घ्याव्यात मध्ये-मध्ये चकल्या उलटाव्यात दोन्ही बाजूंनी चकली छान तळून घ्या

  6. 6

    थंड झाल्यावर खायला द्या

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Smita Kiran Patil
Smita Kiran Patil @myrecipe_2249
रोजी
Sanpada Navi Mumbai

टिप्पण्या

Similar Recipes