तिळगुळाची वडी (tilgulachi vadi recipe in marathi)

Pallavi
Pallavi @Pallavi0705

खमंग खुसखुशीत तिळगुळ वडी
#EB9 #week9

तिळगुळाची वडी (tilgulachi vadi recipe in marathi)

खमंग खुसखुशीत तिळगुळ वडी
#EB9 #week9

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

२० मिनीटे
४ माणसे
  1. 1 वाटीतिळकुट (तिळ भाजुन कुट करुन)
  2. 1/2 वाटीशेंगदाणे कुट
  3. 3/4 वाटीचिरलेला साधा गुळ
  4. 2 चमचेसुखे खोबरे किस
  5. 1/4 चमचाखसखस भाजुन
  6. 2 चमचेतुप
  7. 2 चमचेपाणी

कुकिंग सूचना

२० मिनीटे
  1. 1

    एका कढईमधे १ चमचा तुप घालुन चिरलेला गुळ घालायचा

  2. 2

    गुळ वितळला की त्यात १/२ चमचा तुप आणि २ चमचे पाणी घालुन एक कढ काढायचा

  3. 3

    कढ आला की गॅस बंद करुन त्यात तिळकुट,शेंगदाणे कुट घालुन एकत्र ढवळुन गोळा करुन घ्यायचा

  4. 4

    गुळ कढईमधे घालायच्या आधि एका ट्रेला किंवा ताटाला १/२ चमचा तुप लावुन ठेवायचे.
    तयार गोळा ह्या ताटात ठेवुन वाटीने पसरुन थापुन घेऊन सारखे करायचे

  5. 5

    त्यावर सुखे खोबरे किस आणि खसखस भुरभुरावयची

  6. 6

    किंचीत गार झाल्यावर सुरीने वड्या पाडुन घ्यायच्या

  7. 7

    पूर्ण गार झाले की वड्या सोडवुन बंद डब्यात ठेवायच्या

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Pallavi
Pallavi @Pallavi0705
रोजी

Similar Recipes