कोलंबी बिर्याणी (kolambi biryani recipe in marathi)

कोलंबी बिर्याणी (kolambi biryani recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
खालील प्रमाणे तयारी करावी.
- 2
कोलंबी साफ करून स्वच्छ धुवून निथळत ठेवावी.उभा कांदा चिरून घ्या,टोमॅटो चिरून घ्या.बटाटे चिरून घ्या.कोथिंबीर,पुदीना बारीक चिरून घ्या.
- 3
कोलंबीमधे लालतिखट,हळद,
आललसुणमिरची पेस्ट,बिर्याणी मसाला,2टेबलस्पून लिंबाचा रस,मीठ घालून मॅरीनेट करायला 15/20 मिनिटे ठेवणे.(ह्या मापासाठी 2टेबलस्पून बिर्याणी मसाला वापरला,) - 4
कांदा लाल होईस्तो तळून घ्यावा नि बाजूला ठेवा.बटाटे तळून घ्या.
- 5
एका पातेल्यात 1टेबलस्पून तेल घाला नी त्यामधे खडे मसाले घाला,शहाजीरे घाला नीतांदूळ च्या चौकट पाणी घालून उकळत ठेवा.पाणी उकळले की त्यात धुतलेले तांदूळ घाला. साधारण 10/12 मिनीटात 80 %शिजेल आता भात चाळणीत ओता निथळून घ्या.
- 6
आता एका 1 टेबलस्पून कढईत तेल टाका नि त्यात मॅरीनेटेड कोलंबी नि टोमॅटो घाला नि दहा मिनिटे शिजवून घ्या. थोडीशी ओलसर असेल तशीच राहू द्या.
- 7
ज्या पातेल्यात बिर्याणी लावणार त्या पातेल्यात 2 टेबलस्पून तेल घाला(कांदा तळलेले घालावे),वरील केलेली कोलंबी घाला,बटाटे घाला नि तळलेला कांदा पाऊण घाला नि चांगले मिसळून घ्या. आता ह्यावर कोथिंबीर नी पुदीना सारखा पसरवा नी वर अर्धा भात टाका नि त्यावर थोडा कांदा घाला परत भात टाका नि वरती परत तळलेला कांदा घाला,नंतर दोन चमचे तुप सगळी कडे थोडे थोडे घाला.शेवटी भात जरा घट्ट दाबा म्हणजे वाफ बाहेर येणार नाही.
- 8
पातेल्या खाली तवा ठेवा म्हणजे बिर्याणी लागणार नाही.वर झाकणा खाली ओला नॅपकिन ठेवा नि वर झाकण ठेवा. 5मिनिटे मोठा गॅस ठेवा नि नंतर 25/40 मिनीटे गॅस मध्यम ठेऊन वाफ येऊ द्या.
- 9
कोलंबी दम बिर्याणी तयार आहे.कांदा, लिंबू नि काकडी सोबतीला द्या. एकदम झकास लागते तुम्ही करून बघाच.
Top Search in
Similar Recipes
-
कोलंबी दम बिर्याणी (kolambi dum biryani recipe in marathi)
#cm#आमच्या कडची माझ्या हातची ही फेवरेट डिश आहे .सगळेच खुष तुम्ही करून बघाच नि हा बिर्याणी मसाला घरी करा तुम्ही कधीच बाहेरचा मसाला वापरणार नाही. Hema Wane -
कोलंबी बिर्याणी (kolambi biryani recipe in marathi)
#EB12 #W12 कोलंबीचे सर्वच प्रकार खुपच टेस्टी असतात त्यातलीच कोलंबी बिर्याणी ही आमच्या घरात सगळ्यांची आवडती डिश हि रेसिपी करताना घरभर बिर्याणीचा घमघमाट पसरलेला असतो तसेच तळलेल्या कांद्याचा पुदिनाचा कोलंबी च्या सुंगधी वातावरणानेच भुक जास्तच चाळवते. चला तर हि बिर्याणी झटपट बघुया व जेवायलाच बसुया चला Chhaya Paradhi -
-
व्हेजीटेबल बिर्याणी (vegetabble biryani recipe in marathi)
माझ्या मैत्रीणी नॉनव्हेज नि व्हेज पण खाणार्या मग काय व्हेज साठी व्हेजीटेबल बिर्याणी. छानच होते तुम्ही जरूर करून बघा. Hema Wane -
हैदराबादी चिकन दम बिर्याणी (chicken dum biryani recipe in marathi)
#br#आमच्या कडे सर्वाना आवडणारा पदार्थ आज जरा वेगळी केलेय नेहमी पेक्षा.छान झाली होती बिर्याणी. तुम्ही पण करून बघा. Hema Wane -
दम बिर्याणी (biryani recipe in marathi)
#बिर्याणीचिकन दम बिर्याणी माझ्या मुलीची ऑल टाइम फेवरेट बिर्याणी आहे. Preeti V. Salvi -
-
मटण बिर्याणी (Mutton Biryani Recipe In Marathi)
#CHOOSETOCOOK#आमच्या कडे चिकन बिर्याणी आम्ही जास्त करतो क्वचित मटण बिर्याणी करतो बघा कशी करायची ते. Hema Wane -
कोळंबी बिर्याणी (kolambi biryani recipe in marathi)
#KS1 थीम 1 कोकण रेसिपी क्र. 5.मी चिकन बिर्याणी, अंडा बिर्याणी करून बघितल्या. आज घरी कोळंबी असल्याने बिर्याणी करून बघण्यासाठी मी थोडी शिल्लक ठेवली होती.खूप छान बिर्याणी झाली होती. तुम्ही नक्की करून बघा. Sujata Gengaje -
-
कोळंबी बिर्याणी (kolambi biryani recipe in marathi)
#EB12 #W12कोळंबी बिर्याणी....अहाहा... नुसतं नाव ऐकल की तोंडाला पाणी सुटतं...आणि खाल्ल्यावर जो आनंद मिळतो तो काय वर्णावा... Preeti V. Salvi -
व्हेज बिर्याणी(veg biryani recipe in marathi)
बिर्याणी चे अनेक प्रकार आहेतत्यात मी व्हेज बिर्याणी केली आहे साधी सोपी करून बघाच Prachi Manerikar -
कोळंबी बिर्याणी (kolambi biryani recipe in marathi)
#wdrसंडे वीकएंड म्हंटला कि घरातले सगळेच काहीतरी चमचमीत आणि झणझणीत बनव म्हणून फर्माईश करतात. म्हणूनच वीकएंड स्पेशल म्हणून कोलंबी बिर्याणी चा बेत केला. खूप छान झाली बिर्याणी. रेसिपी खाली देत आहे. Poonam Pandav -
-
मसाला अंडा बिर्याणी (Masala anda biryani recipe in marathi)
#MBR बिर्याणी कोणतीही असो मसाला हा वापर करावाच लागतो त्यामुळे त्या बिर्याणीला एक विशिष्ट सुगंध आणि चव येते आज आपण मसाला अंडा बिर्याणी बनवणार आहोत यात आपण खडा मसाला तर वापरणार आहोत सोबत काही नेहमीच मसालेही वापरणार आहे चला तर मग बनवूयात. Supriya Devkar -
तिरंगा कोळंबी बिर्याणी (tiranga kolambi biryani recipe in marathi)
#Tri#तिरंगा कोळंबी बिर्याणीही बिर्याणी बनवायला जास्त मेहनत करावी लागत नाही झटपट होणारी अशी बिर्याणी आहे तुम्ही पण बनवून नक्की बघा तुम्हाला खूप आवडेल. आरती तरे -
शाही मटर पनीर बिर्याणी(shahi mutter paneer biryani recipe in marathi)
#बिर्याणीबिर्याणी आमच्या घरी सर्वाच्या आवडीची म्हणून आज पनीर बिर्याणी. Nilan Raje -
पौष्टिक बिर्याणी (poshtik biryani recipe in marathi)
# तांदूळ रेसिपी.आहारतज्ज्ञ असल्याने मी सगळ्यांना आरोग्यदायी ठरेल अशी स्वादिष्ट डिश बनवण्यावर भर दिला. कमी तेल, फायबर युक्त, प्रतिकार क्षमता वाढवणारे मसाल्याचे पदार्थ असलेल्या बिर्याणी चा तुम्ही पण आस्वाद घ्या. Radhika Gaikwad -
इंडो कोलंबी चायनीज फ्राईड राईस (indo kolambi chinese fried rice recipe in marathi)
मी ह्याला इंडो नाव दिलेय कारण कोलंबी मी माझ्या पध्दतीने करून त्यात घातली आहे .अशी घातली कि भाताची चव छान होते नि त्याला थोडा झेजवान लुक येतो .तर बघा करून असा नक्की आवडेल . Hema Wane -
व्हेज दम बिर्याणी (veg dum biryani recipe in marathi)
#cm ही रेसिपी मला माझ्या लाडक्या आईने जेव्हा माझं लग्न झालं तेव्हा शिकवली होती आमच्या घरातल्या सर्वांची खूप फेवरेट रेसिपी आहे कारण याच्यामध्ये माझ्या आईचं प्रेम आहे... Pooja Farande -
काश्मिरी केसर बिर्याणी (kashmiri kesar biryani recipe in marathi)
#बिर्याणीमाझ्या घरातील सगळ्यांची आवडती डिश म्हणजे काश्मिरी केसर बिर्याणी.प्रत्येक रविवारी ही डिश करण्याची फर्माइश असते आणि मी ती हवशेने बनवते. Shubhangi Ghalsasi -
स्मोकी फ्लेवर्ड चिकन बिर्याणी (smooky flavour chicken biryani recipe in marathi)
#GA4#week16#smokyflavouredchikenbiryaniबिर्याणी किंवा चिकन बिर्याणी ही एक फ्लेवर्ड डिश आहे जी 'तांदूळ, सुवासिक मसाले आणि चिकन तर कधीकधी भाज्यांबरोबर बनविली जाते. सर्वांची फेव्हरेट असलेली बिर्याणी कशी बनवायची ते बघूया😘 Vandana Shelar -
हैदराबाद चिकन दम बिर्याणी (Hyderabad Chicken Dum Biryani recipe in marathi)
मी हैदराबादला स्थायिक आहेहैदराबादची बिर्याणी जगप्रसिद्ध आहेम्हणून मी बिर्याणी बनवलीमाझ्या मुलाची आवडती आहे बिर्याणी#MPP Preeti Vishwas Pandit -
पनीर बिर्याणी (paneer biryani recipe in marathi)
#br बिर्याणी स्पेशलअंडा बिर्याणी, चिकन बिर्याणी माझी करून झाली.म्हणून मी आज पनीर बिर्याणी केली. खूप छान झालेली.तुम्ही नक्की करून बघा. Sujata Gengaje -
चिकन बिर्याणी.. (chicken biryani recipe in marathi)
#लंच#चिकनबिर्यानीचिकन बिर्याणी नॉनव्हेज खाणाऱ्यांसाठी ऑल टाइम फेवरेट.... पण कधीकधी बिर्याणी बनवायला खूप कंटाळा येतो. कारण यांची प्रोसेस खूपच लेंदी असते. पण आज मी तुम्हाला कुकर मध्ये बिर्याणी कशी करायची ते सांगणार आहे.कुकरमध्ये केल्याने जवळजवळ आपला अर्धा वेळ वाचतो..तेव्हा नक्की ट्राय करा कुकर मधील *चिकन बिर्याणी*... 💃 💕 Vasudha Gudhe -
हैद्राबादी एग बिर्याणी (egg biryani recipe in marathi)
#br माझी all time favourite एग बिर्याणी. खाली दिलेली पाककृती जी कधीच fail होत नाही 🤗 सुप्रिया घुडे -
-
व्हेज बिर्याणी (veg biryani recipe in marathi)
#br बिर्याणी हा शब्द उच्चारताच आपल्या डोळ्यासमोर रंगीबेरंगी बिर्याणी दिसते . त्यात रंगीबेरंगी भाज्या, केशर, बिर्याणी मसाला असल्याने खूपच टेस्टी, यमी, यमी लागते. मी येथे व्हेज बिर्याणी तयार केली आहे. चला तर कशी तयार करायची ते पाहूयात. Mangal Shah -
कोलंबी बिर्याणी (kolambi biryani recipe in marathi)
#cooksnap आज Ujwala Rangnekar ताईंची रेसिपी... कोलंबी बिर्याणी बनवली..... खूप छान झाली. थोडा स्मोकी इफेक्ट दिला एवढेच. कोलंबी घरात सर्वांची आवडती... ती कशी ही बनवा... पण बिर्याणी म्हटले की इतर काहीही जोडीला नको... अगदी मनसोक्त... मन भरे पर्यंत खाल्ली जाते. आणि आजची रेसिपी तशीच जबराट झाली... सगळी फस्त... Dipti Warange -
कोळंबी बिर्याणी (kombdi Biryani recipe in marathi)
Prawns Biryani(कोळंबी बिर्याणी)माझे माहेर मुंबईचे असल्यामुळे मला समुद्रातले वेगवेगळ्या प्रकारचे मासे खूप आवडतात. कोलंबीचे अनेक प्रकार करता येतात. कोळंबी फ्राय,कोळंबी मसाला,कोळंबी करी.कोळंबी टाकून भाताचे पण अनेक प्रकार करता येतात. माझा आवडता पदार्थ Prawns Biryani(कोळंबी बिर्याणी) करत आहे. rucha dachewar
More Recipes
टिप्पण्या (3)