झणझणीत मुगाची उसळ (moongachi usal recipe in marathi)

Preeti V. Salvi
Preeti V. Salvi @cook_20602564

मी अनिता देसाई मॅडम ने बनवलेली मुगाची उसळ ही रेसिपी कुकस्नॅप केली .एकदम मस्त झणझणीत केली.गरम मसाला ऐवजी मी गोड मसाला वापरला.खूप छान टेस्टी झाली.

झणझणीत मुगाची उसळ (moongachi usal recipe in marathi)

मी अनिता देसाई मॅडम ने बनवलेली मुगाची उसळ ही रेसिपी कुकस्नॅप केली .एकदम मस्त झणझणीत केली.गरम मसाला ऐवजी मी गोड मसाला वापरला.खूप छान टेस्टी झाली.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१०-१५ मिनिटे
४-५
  1. २५० ग्राम मोड आलेले मूग
  2. 2कांदे
  3. 2टोमॅटो
  4. 1/4 कपकोथिंबीर
  5. 1/4 कपकिसलेल खोबर
  6. 2 टेबलस्पूनतेल
  7. 1 टीस्पूनजीरे मोहरी
  8. १/८ टीस्पून हिंग
  9. 1/4 टीस्पूनहळद
  10. 2 टेबलस्पूनतिखट
  11. 1/२ टेबलस्पून धना पावडर
  12. 1 टेबलस्पूनगोडा मसाला
  13. 5-6कडीपत्ता पाने
  14. 1/2 टीस्पूनमीठ
  15. 1लिंबू

कुकिंग सूचना

१०-१५ मिनिटे
  1. 1

    मोड आलेले मूग कुकर मधून शिजवून घेतले.कांदा टोमॅटो कोथिंबीर चिरून घेतले.

  2. 2

    कढईत तेल घालून तापल्यावर जीरे मोहरी हिंग कडीपत्ता यांची खमंग फोडणी केली.त्यात कांदा गुलाबीसर होईपर्यंत परतला.

  3. 3

    आता हळद तिखट गोड मसाला धने पावडर,टोमॅटो थोडी कोथिंबीर खोबरे घालून टोमॅटो शिजेपर्यंत परतले.गरम पाणी आवश्यकतेनुसार घातले म्हणजे छान तर्री येईल.

  4. 4

    आता शिजवलेले मूग आणि मीठ घालुन उकळी आणली.वरून कोथिंबीर घातली.

  5. 5

    गरम गरम उसळ सर्व्हिंग बाउल मध्ये काढली.लिंबाची फोड आणि चिरलेल्या कोथिंबिरी ने गार्निष केली. गरम फुलक्यांसोबत फस्त केली.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Preeti V. Salvi
Preeti V. Salvi @cook_20602564
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes