सेव्हन कप बर्फी (Seven Cup Burfi Recipe In Marathi)

Mangal Shah
Mangal Shah @mangal51
Nashik

#SSR श्रावण महिना म्हटला की घरोघरी पदार्थांची रेलचेल सुरू असते. तिखट व गोड अनेक पदार्थ बनवले जातात. आज मी गोड पदार्थ बनवला .कर्नाटकी प्रकार आहे व बनवण्यास सोपा आहे . अत्यंत चवदार व लुसलुशीत लागते . याची खासियत म्हणजे सात वस्तूंमध्ये ही बर्फी तयार होते. पाहुयात काय सामग्री लागते ते ....

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30 मिनिटे
6 सरविंग्स
  1. सर्व वस्तू 100 ग्रॅम प्रमाणे - 1 कप बेसन पीठ
  2. 1 कपdesicated कोकोनट
  3. 1 कपकाजू पावडर
  4. 1 कपतूप
  5. 150 ml दूध
  6. 200 ग्रॅमसाखर
  7. 1/2 टीस्पूनवेलची पूड

कुकिंग सूचना

30 मिनिटे
  1. 1

    प्रथम सर्व वस्तू एकत्र करून घेऊयात.

  2. 2

    गॅस वर एका पॅनमध्ये डाळीचे पीठ टाकून सिम गॅस वर तीन ते चार मिनिट परतून घ्या. नंतर डेसिकेटेड कोकोनट टाकून थोडेसे परता काजूची पावडर टाका. हलकेसे परतून घ्या.

  3. 3

    नंतर त्यात तूप टाका व साखर टाकून पुन्हा ढवळून त्यात दूध टाका.

  4. 4

    सर्व मिश्रण एकत्र करून सिम गॅसवर घट्टसर होई पर्यंत परता व शेवटी वेलचीपूड टाकून मिक्स करून घ्या.

  5. 5

    घट्टसर गोळा तयार झाल्यावर एका ताटाला तुपाचा हात लावून घ्या व त्यावर हे मिश्रण टाकुन वाटीने थापून घ्या.

  6. 6

    थंड झाल्यावर त्याच्या वड्या पाडा. अत्यंत चवदार लागते. दहा ते पंधरा दिवस टिकते हा कर्नाटकी प्रकार आहे.

  7. 7

    अशाप्रकारे श्रावण महिन्यासाठी एक आगळी वेगळी सेव्हन कप बर्फी तयार केली. खूपच सुरेख लागते... तुम्हीही नक्की करून पहा....

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Mangal Shah
Mangal Shah @mangal51
रोजी
Nashik
I am passionate about cooking variety of food dishes. I have been cooking different variety of dishes for the past 40 years at home as well as in local contests. I have won many prizes in cooking competitions in Nashik and have also presented on TV cooking show.
पुढे वाचा

Similar Recipes