पारंपारिक तांदुळाची खीर (Tandalachi Kheer Recipe In Marathi)

Varsha Ingole Bele
Varsha Ingole Bele @varsha_1966
Nagpur

#RRR .. तांदुळाचे पदार्थ करताना मी केलेली आहे, अतिशय चविष्ट अशी तांदळाची खीर.. ही खीर पुरी सोबत खूपच छान लागते हा पारंपरिक पदार्थ असून वेगवेगळ्या प्रकारे केला जातो.

पारंपारिक तांदुळाची खीर (Tandalachi Kheer Recipe In Marathi)

#RRR .. तांदुळाचे पदार्थ करताना मी केलेली आहे, अतिशय चविष्ट अशी तांदळाची खीर.. ही खीर पुरी सोबत खूपच छान लागते हा पारंपरिक पदार्थ असून वेगवेगळ्या प्रकारे केला जातो.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30-40 मिनिट
3 सर्व्हिंग्ज
  1. 1/4 कपसुगंधी तांदूळ
  2. 750मिली दूध
  3. 3/4 कपसाखर
  4. 1 टीस्पूनतूप
  5. 2 टेबलस्पून सुका मेवा काप
  6. 1 टेबलस्पूनकिसमिस
  7. 1 टेबलस्पूनचारोळी
  8. 12 टीस्पूनवेलची पूड
  9. केसर
  10. 1 टेबलस्पूनखोबरे किस

कुकिंग सूचना

30-40 मिनिट
  1. 1

    सुगंधी तांदूळ स्वच्छ निवडून दोन-तीन वेळा पाण्याने धुऊन घ्यावे. आणि साधारण पाऊण किंवा एक तास भिजत घालावे. त्यानंतर ते पाण्यातून काढून घ्यावे.

  2. 2

    आता हे तांदूळ गॅसवर,पॅनमध्ये थोडेसे तूप टाकून मिनिटभर भाजून घ्यावे. हे भाजलेले तांदूळ थोडे थंड झाल्यावर मिक्सरच्या पॉट मध्ये टाकावे.

  3. 3

    मिक्सर मधून हे थोडे जाडसर बारीक करावे. आणि नंतर पाऊ न कप पाणी टाकून पुन्हा एकदा फिरवून घ्यावे म्हणजे त्याची पेस्ट तयार होईल.

  4. 4

    एका पॅनमध्ये थोडेसे तूप टाकून त्यामध्ये सुकामेवा आणि किसमिस किंचित परतून घ्यावे त्याचप्रमाणे थोड्याशा दुधामध्ये केसर टाकून घ्यावे.

  5. 5

    हे करेपर्यंत एका बाजूला गॅसवर एका पसरट पॅनमध्ये दूध तापवायला ठेवावे. दुधाला चांगल्या चार-पाच उकळ्या आल्यानंतर, त्यामध्ये तयार केलेली तांदळाची पेस्ट टाकावी.

  6. 6

    आता हे टाकलेले तांदूळ दुधामध्ये शिजवावे. साधारण आठ ते दहा मिनिट मध्यम आचेवर हे शिजवावे. तांदूळ शिजल्याची खात्री पटल्यावर त्यात तुपामध्ये परतलेला सुकामेवा टाकावा. चारोळी आणि केसराचे दूधही टाकावे. चांगले मिक्स करून पुन्हा एक उकळी येऊ द्यावी. त्यानंतर त्यात साखर टाकावी.

  7. 7

    आता साखर विरघळेपर्यंत फिरवत राहावे. तांदूळ बुडाला लागणार नाही, याची काळजी घ्यावी नंतर त्यात वेलची पूड आणि खोबऱ्याचा कीस टाकावा.

  8. 8

    आता गॅस बंद करावा. आपली पारंपरिक तांदळाची खीर तयार आहे. ही खीर थंड झाल्यावर आणखी घट्ट होते. त्यामुळे जास्त घट्ट होऊ देऊ नये.

  9. 9

    आता ही खीर, देवाला नैवेद्य दाखवून पुरी सोबत सर्व्ह करावी. हो, आणि वरून तूप घालावे, खिरीवर.. खूप छान लागते. थंड किंवा गरम कशीही छानच लागते.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Varsha Ingole Bele
Varsha Ingole Bele @varsha_1966
रोजी
Nagpur

Similar Recipes