मसाले भात (Masale Bhat Recipe In Marathi)

Chhaya Paradhi
Chhaya Paradhi @Chhaya12_1962
Kalyan

#RR2 #महाराष्ट्राची पारंपारीक फेमस डिश लग्न समारंभ किंवा इतर कार्यक्रमात मसाले भात आर्वजुन केला जातो व दही, कोशिंबीर, पापड, लोणचे, मठ्ठया सोबत चविने खाल्लाही जातो . सर्व भाज्या , काजु मिक्स करून गोडामसाल्याचा कमी तिखट असा बनवला जातो. चला तर आपल्या घरात नेहमीच बनणारा मसाले भात त्याची झटपट रेसिपी बघुया

मसाले भात (Masale Bhat Recipe In Marathi)

#RR2 #महाराष्ट्राची पारंपारीक फेमस डिश लग्न समारंभ किंवा इतर कार्यक्रमात मसाले भात आर्वजुन केला जातो व दही, कोशिंबीर, पापड, लोणचे, मठ्ठया सोबत चविने खाल्लाही जातो . सर्व भाज्या , काजु मिक्स करून गोडामसाल्याचा कमी तिखट असा बनवला जातो. चला तर आपल्या घरात नेहमीच बनणारा मसाले भात त्याची झटपट रेसिपी बघुया

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

२०-२५ मिनिटे
४-५ जणांसाठी
  1. १०० ग्रॅम बासमती तांदुळ
  2. ६० ग्रॅम मिक्स भाज्या(फ्लावर, मटार, गाजर, टोमॅटो)
  3. 1कांदा उभा चिरलेला
  4. २५ ग्रॅम पनीर तुकडे
  5. 1 टेबलस्पुनकाजु तुकडा
  6. 2 टेबलस्पुनकोथिंबीर
  7. 1दालचिनी
  8. 1मोठी वेलची
  9. 2-3हिरवी वेलची
  10. 2तमालपत्रे
  11. 4-5काळीमिरी दाणे
  12. 1/2 टिस्पुनजीरे
  13. 2 पिंचहिंग
  14. 5-6कडिपत्त्याची पाने
  15. 1मिरची बारीक कापलेली
  16. 1/4 टिस्पुनहळद
  17. 1 टिस्पुनतिखट
  18. 1 टेबलस्पुनगोडा मसाला
  19. 1-2 टेबलस्पुनसाजुक तुप
  20. 1-2 टेबलस्पुनतेल
  21. चविनुसारमीठ
  22. 1 टेबलस्पुनआलेलसुण पेस्ट
  23. 1 टिस्पुनधनेजिरे पावडर

कुकिंग सूचना

२०-२५ मिनिटे
  1. 1

    मसाले भात बनवण्यासाठी लागणारी पुर्वतयारी करून ठेवु, बासमती तांदुळ स्वच्छ धुवुन २० मिनिटे भिजत घाला, सर्व भाज्या बारीक चिरून ठेवा, कांदा, कोथिंबिर, मिरची चिरून ठेवा, पनीरचे तुकडे करून ठेवा, फोडणीसाठी खडा मसाला काढुन ठेवा. कढईत तेल व साजुक तुप गरम झाल्यावर खडे मसाले जीरे, कडिपत्ता, मिरची परतुन घ्या हिंग टाका

  2. 2

    नंतर त्यात उभा चिरलेला कांदा, आलेलसुण पेस्ट सर्व कापलेल्या भाज्या, हळद, कोथिंबीर परतुन नंतर टोमॅटो, काजु, तिखट, गोडामसाला धनेजिरे पावडर टाकुन परता

  3. 3

    नंतर त्यात भिजलेला तांदुळ मिक्स करून २-४ मिनिटे परता नंतर गरमपाणी व कोथिंबिर चविनुसार मीठ मिक्स करून झाकण ठेवा१०-१५ मिनिटे

  4. 4

    नंतर मसाले भात शिजत आल्यावर त्यात पनीर मिक्स करा भात परतुन परत२ मिनिटे झाकण ठेवा व गॅस बंद करा ५ मिनिटांनी झाकण काढुन मसाले भात चमच्याने हलक्या हाताने परता म्हणजे मसाले भात मोकळा होईल

  5. 5

    प्लेट मध्ये गरम गरम मसाले भात वरून तुपाची धार कोथिंबिर पेरून सोबत काकडी टॅमाटो स्लाइज, नाचणी पापड, मिरगुंडी, दही देऊन सर्व्ह करा

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Chhaya Paradhi
Chhaya Paradhi @Chhaya12_1962
रोजी
Kalyan

Top Search in

Similar Recipes