कसूरी मेथीचे थेपले आणि दही (Kasuri Methiche Thepla Recipe In Marathi)

Ujwala Rangnekar
Ujwala Rangnekar @Ujwala_rangnekar

उन्हाळ्याची चाहूल लागताच जीवाला थंडावा देणारे काही तरी खायला हवे. कोणत्याही पदार्था सोबत दही असलं तर उष्णतेचा त्रास जाणवत नाही. उन्हाळ्यात जास्त गरम आणि मसालेदार खाणं नको वाटतं. गॅसच्या समोर तासंतास उभे राहून दोन चार पदार्थ करणं पण नको वाटतं. म्हणून सहज सोपे असे घरातील उपलब्ध असलेल्या कसूरी मेथीचे ठेपले बनवले, दही बरोबर खायला खूप छान लागतात. अगदी झटपट बनवता येतात.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

२० मिनिटे
४ जणांसाठी
  1. 2 वाट्यागव्हाचे पीठ
  2. 1/2 वाटीकसूरी मेथी
  3. 2 टीस्पूनतिखट पूड
  4. 1 टीस्पूनहळद
  5. 2 टीस्पूनधणे जीरे पावडर
  6. 1 टीस्पूनहिंग
  7. 1 टीस्पूनतिळ
  8. 1 टीस्पूनओवा
  9. मीठ चवीनुसार
  10. 1 टीस्पूनतेल पीठ मळताना लावायला
  11. तूप पराठ्यांना लावायला (ऐच्छिक)
  12. दही

कुकिंग सूचना

२० मिनिटे
  1. 1

    माझ्या कडे असलेल्या फूड प्रोसेसरच्या पाॅट मधे गव्हाचे पीठ, कसूरी मेथी, हिंग, धणे जीरे पावडर, चवीनुसार मीठ, तिखट पूड, हळद, तिळ, ओवा आणि थोडं तेल घालून मिक्स केले.

  2. 2

    त्यात थोडे थोडे पाणी घालून पीठ मळून घेतले. तूम्ही हे पीठ हाताने पण मळू शकता.

  3. 3

    पीठाचा मध्यम आकाराचा गोळा घेऊन चपाती सारखा, पण जास्त जाड नाही आणि जास्त पातळ नाही असा ठेपला लाटून घेतला. तव्यावर दोन्ही बाजूंनी खरपूस भाजून त्यावर तूप लावून ठेपला परत जरा भाजून घेतला.

  4. 4

    खमंग खरपूस ठेपल्यांच्या बरोबर दही सर्व्ह केले. मस्त खमंग असे ठेपले आणि दही खायची मजा काही औरच असते.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Ujwala Rangnekar
Ujwala Rangnekar @Ujwala_rangnekar
रोजी

टिप्पण्या

pihu pooja
pihu pooja @cook_38105088
खूप छान वाटले करून बघितले मी

Similar Recipes